agriculture news in marathi, Named Namdev memorial, various works will be done | Agrowon

नामदेव स्मारकासह विविध कामे मार्गी लावणार

टीम अॅग्रोवन
शनिवार, 1 सप्टेंबर 2018

सोलापूर : तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून पंढरपूरमध्ये लवकरच पुंडलिक मंदिर सुधारणा, म्हसोबा मंदिर ते महाद्वार घाट यादरम्यान पूलबांधणी आणि नामदेव स्मारकासह विविध कामे मार्गी लावली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.

सोलापूर : तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून पंढरपूरमध्ये लवकरच पुंडलिक मंदिर सुधारणा, म्हसोबा मंदिर ते महाद्वार घाट यादरम्यान पूलबांधणी आणि नामदेव स्मारकासह विविध कामे मार्गी लावली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.

मागील आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांनी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामांचा आढावा घेतला. या संदर्भात ते म्हणाले, ‘‘विकास आराखड्यातून रस्ते विकास, चंद्रभागा नदीवरील नवीन पूल, ६५ एकर जागेवर स्वच्छतागृहे, तोंडले-बोंडले येथील पूल, भंडीशेगाव येथील पूल आदी कामांचा समावेश आहे. त्यातील काही कामे प्रगतिपथावर आहेत. यामध्ये सुलभ स्वच्छतागृह बांधणी, पालखी तळावरील विकासकामे, चंद्रभागा नदीवरील घाटाच्या कामांचा समावेश आहे.``

‘‘चंद्रभागा वाळवंटातील पुंडलिक मंदिर आणि भोवतालच्या मंदिरांचा विकास करण्यात येणार आहे. या मंदिरांच्या परिसरात चंद्रकोरीचा आकार येईल यापद्धतीने काम होईल. म्हसोबा मंदिर ते महाद्वार घाट यादरम्यान लोखंडी पूल साकारण्याचा प्रस्ताव आहे. जागेची पाहणी करण्यात आली आहे. परंतु, आता येथे सिमेंटचा पूल बांधायचा की लोखंडी पूल, याबाबत निर्णय होणार आहे. बस स्टॅंडचे कॉँक्रिटीकरण केले जाणार आहे. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून या कामांना मंजुरी मिळणार आहे. वाखरी येथील पालखीतळाची जागा संपादित करण्यात येणार नाही. परंतु, या जागेवर आषाढी वारी काळासाठी आरक्षण ठेवण्यात आले आहे. या जागेवर शेती करता येईल; पण वारीच्या काळात जागामालकांना ही जागा मोकळी करून द्यावी लागेल. तेथे बांधकाम करता येणार नाही``, असेही भोसले यांनी सांगितले.


इतर बातम्या
पुणे विद्यापीठात पश्चिम विभागीय औषधी...पुणे  ः केंद्र सरकारच्या आयुष...
शिर्डीतील सामुदायिक विवाह सोहळ्यासाठीची...शिर्डी, जि. नगर  : साई सिद्धी चॅरिटेबल...
माळेगाव कारखान्यात सत्तापरिवर्तन;...माळेगाव, जि. पुणे  ः राज्यात लक्षवेधी...
नगर जिल्ह्यातील सहा केंद्रांवर तूर...नगर  ः जिल्ह्यात हमीभावाने तूर खरेदीसाठी आठ...
कर्जमाफीवरून विरोधक दुसऱ्या दिवशीही...मुंबई  ः भाजपने शेतकरी कर्जमाफी आणि महिला...
सातारा जिल्ह्यात ९० टक्के क्षेत्रावर...सातारा  ः जिल्ह्यात पोषक वातावरणामुळे रब्बी...
मसाला, सुगंधी वनस्पतीवर्गीय पिकांची...अकोला  ः ‘‘आपल्याकडील हवामान, जमीन हे मसाला...
मराठवाड्यात यंदा तुती लागवडीसाठी...औरंगाबाद : मराठवाड्यात गतवर्षी दुष्काळाचा...
संपूर्ण कर्जमुक्तीसाठी भाजपचे आंदोलन अकोला  : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने...
`म्हैसाळ`च्या उन्हाळी आवर्तनाकडे...सलगरे, जि. सांगली : म्हैसाळ पाणी योजनेचे कालवे...
अकोला झेडपी देणार आत्महत्याग्रस्त...अकोला  ः नापिकी, कर्जबाजारीपणामुळे जिल्ह्यात...
लातूर विभागात १४ लाख हेक्‍टरवर रब्बी...लातूर : विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयांतर्गत...
अमरावती जिल्ह्यात निवडणुकांचा बिगुलअमरावती  ः जिल्ह्यात एप्रिल ते जून या...
सूक्ष्म सिंचन योजनेचा सात वर्षानंतर...अकोला ः सूक्ष्म सिंचनाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना...
वऱ्हाडातील चार लाख शेतकरी...अकोला  ः राज्य शासनाने जाहीर केलेल्या...
मराठवाडा, खानदेशातील नऊ कारखान्यांची...औरंगाबाद  : येथील साखर सहसंचालक...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात ३३११...नांदेड : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
कोल्हापुरातील गूळ हंगाम अंतिम टप्प्यातकोल्हापूर : यंदाचा गूळ हंगाम अंतिम टप्प्यात येत...
जळगाव : कर्जमाफीसाठी ११३ शेतकऱ्यांचे...जळगाव  : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी...
कराडी येथे रेंजअभावी कर्जमाफी लाभार्थी...पारोळा, जि. जळगाव ः राज्य सरकारच्या महात्मा...