गारपिटीची माहिती देऊनही नावे वगळली 

जिल्ह्यात अकोट तालुक्यात १८ फेब्रुवारीला दुपारी गारपीट, पाऊस झाला. गारपिटीमुळे केळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
grampanchayat letter
grampanchayat letter

अकोला ः जिल्ह्यात अकोट तालुक्यात १८ फेब्रुवारीला दुपारी गारपीट, पाऊस झाला. गारपिटीमुळे केळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही माहिती शेतकऱ्यांनी ४८ तासांच्या आत विमा कंपनीला ई-मेलद्वारे कळविली. मात्र, शेतकऱ्यांची नावे गाळण्यात आली आहेत. याला विमा प्रतिनिधी जबाबदार असून तातडीने बदलावा, अन्यथा उपोषण करू असा इशारा अकोट तालुक्यातील ग्रामपंचायतींकडून प्रशासनाला देण्यात आला आहे. 

याबाबत पणज बोचरा, रुईखेड ग्रामपंचायतींच्या सरपंचांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले, की १८ फेब्रुवारीला गारपीट झाली. याबाबत ४८ तासांच्या आत शेतकऱ्यांनी माहिती दिली. परिसरातील जवळपास ४०० शेतकऱ्यांनी ई-मेल केले आहेत. परंतु केवळ १५ शेतकऱ्यांची नावे आली आहेत. इतरांची नावे गहाळ करण्यात आली. विमा कंपनी शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहे. 

मागील वर्षी १० मे २०२० ला वादळामुळे केळी, संत्रा पिकांचे नुकसान झाले होते. या घटनेची पालकमंत्री बच्चू कडू यांनी पाहणी करून १०० टक्के नुकसानभरपाईचे आदेश दिले होते. विमा प्रतिनिधींनी पंचनामा केला असता हेक्टरी २०० ते ७०० रुपयांपर्यंत मदत दिल्या गेली. काही मोजक्या शेतकऱ्यांना २० ते २२ हजार रुपये भरपाई देण्यात आली. याबाबत तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता विमा प्रतिनिधीकडून शेतकऱ्यांना योग्य वागणूकही मिळाली नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे.  ...तर विमा न भरण्याचा निर्धार  कंपनीच्या नियमानुसार नुकसान झाल्यावर पंचनामा करण्यासाठी विमा कंपनी व शेतकरी यांच्यामधील दुवा म्हणून थर्ड पार्टीची निवड करण्यात येते. परंतु विमा कंपनीच्या हिताकरिता संबंधित प्रतिनिधी थर्ड पार्टीला सर्व्हे करण्यासाठी बोलवत नाहीत. अशा प्रकारच्या कारभारामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. विमा कंपनीने तातडीने कारभार न सुधारल्यास यापुढे विमा न काढण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केल्याचे ग्रामपंचायतींच्या निवेदनात म्हटले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com