agriculture news in Marathi names excluded even information of hailstorm given Maharashtra | Page 2 ||| Agrowon

गारपिटीची माहिती देऊनही नावे वगळली 

टीम अॅग्रोवन
रविवार, 7 मार्च 2021

जिल्ह्यात अकोट तालुक्यात १८ फेब्रुवारीला दुपारी गारपीट, पाऊस झाला. गारपिटीमुळे केळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. 

अकोला ः जिल्ह्यात अकोट तालुक्यात १८ फेब्रुवारीला दुपारी गारपीट, पाऊस झाला. गारपिटीमुळे केळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही माहिती शेतकऱ्यांनी ४८ तासांच्या आत विमा कंपनीला ई-मेलद्वारे कळविली. मात्र, शेतकऱ्यांची नावे गाळण्यात आली आहेत. याला विमा प्रतिनिधी जबाबदार असून तातडीने बदलावा, अन्यथा उपोषण करू असा इशारा अकोट तालुक्यातील ग्रामपंचायतींकडून प्रशासनाला देण्यात आला आहे. 

याबाबत पणज बोचरा, रुईखेड ग्रामपंचायतींच्या सरपंचांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले, की १८ फेब्रुवारीला गारपीट झाली. याबाबत ४८ तासांच्या आत शेतकऱ्यांनी माहिती दिली. परिसरातील जवळपास ४०० शेतकऱ्यांनी ई-मेल केले आहेत. परंतु केवळ १५ शेतकऱ्यांची नावे आली आहेत. इतरांची नावे गहाळ करण्यात आली. विमा कंपनी शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहे. 

मागील वर्षी १० मे २०२० ला वादळामुळे केळी, संत्रा पिकांचे नुकसान झाले होते. या घटनेची पालकमंत्री बच्चू कडू यांनी पाहणी करून १०० टक्के नुकसानभरपाईचे आदेश दिले होते. विमा प्रतिनिधींनी पंचनामा केला असता हेक्टरी २०० ते ७०० रुपयांपर्यंत मदत दिल्या गेली. काही मोजक्या शेतकऱ्यांना २० ते २२ हजार रुपये भरपाई देण्यात आली. याबाबत तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता विमा प्रतिनिधीकडून शेतकऱ्यांना योग्य वागणूकही मिळाली नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. 

...तर विमा न भरण्याचा निर्धार 
कंपनीच्या नियमानुसार नुकसान झाल्यावर पंचनामा करण्यासाठी विमा कंपनी व शेतकरी यांच्यामधील दुवा म्हणून थर्ड पार्टीची निवड करण्यात येते. परंतु विमा कंपनीच्या हिताकरिता संबंधित प्रतिनिधी थर्ड पार्टीला सर्व्हे करण्यासाठी बोलवत नाहीत. अशा प्रकारच्या कारभारामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. विमा कंपनीने तातडीने कारभार न सुधारल्यास यापुढे विमा न काढण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केल्याचे ग्रामपंचायतींच्या निवेदनात म्हटले आहे. 


इतर बातम्या
अकोला जिल्हा परिषदेत खांदेपालटाची चर्चा अकोला : जिल्हा परिषदेत सत्तारूढ असलेल्या वंचित...
खरीप हंगामाच्या तोंडावर ...यवतमाळ : गेल्या दशकात जिल्ह्यातील शेतकरी कधी...
अमरावतीत शासकीय दूध योजनेच्या संकलनात ...अमरावती : कोरोनामुळे हॉटेल आणि दुग्धजन्य पदार्थ...
‘आंबेओहोळ’ची घळभरणी अंतिम टप्यात उत्तूर, जि. कोल्हापूर : आरदाळ-उत्तूर (ता. आजरा)...
म्हैसाळ योजनेतून सांगोल्यासाठी पाणी...सांगोला, जि. सोलापूर : सांगोला वितरिका क्रमांक...
सहा कारखान्यांनी उरकले गाळप; ९७ लाख ३८... सातारा : जिल्ह्यातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात...
खरिपासाठी नगरमध्ये साडेसहा लाख हेक्टर...पुणे नगर : नगर जिल्ह्यात यंदा खरिपासाठी यंदा ६...
परभणीतील शेतकऱ्यांना ८३ कोटींचा विमा...परभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत सन...
विदर्भात उद्यापासून वादळी पावसाचा इशारा पुणे : विदर्भासह संपूर्ण राज्यात उन्हाचा चटका...
गटशेतीच्या पायावर ‘एफपीसी’चा कळस पुणे : राज्यात अल्प व अत्यल्प भूधारक शेतक-यांना...
तोडणीला परवडेना टोमॅटो औरंगाबाद : जिल्ह्यातील गंगापूर, कन्नड तालुक्यातील...
ग्रामसभा करणार तेंदुपत्याची विक्री गडचिरोली : पेसा (पंचायत एक्स्टेंशन टू शेडूल...
ग्रामीण रुग्णांसाठी जिल्हा परिषद...सोलापूर ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा...
कृषी पणन मंडळाकडून आॅनालाइन आंबा...पुणे ः कोरोना संकटातही आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या...
अखेर मोसंबी उत्पादकांना विमा परतावा...जालना : जिल्ह्यातील सहा हजारांवर मोसंबी...
राहीबाई पोपेरे यांची वनस्पती संरक्षण...नाशिक : भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण...
कोरोनाबाबत डाॅ. सिंग यांनी सूचवलेला...नांदेड : कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी माजी पंतप्रधान...
कोरोना व्हॅक्सिनसाठी वयाची अट शिथिल...कोल्हापूर : भाजीपाला, दूध उत्पादक तसेच...
पुणे बाजार समितीत गर्दीला बसणार लगामपुणे : शहरात कोरोना संसर्गामुळे लावण्यात आलेल्या...
गोसीखुर्द धरणाच्या पाण्याचे ...चंद्रपूर : प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या...