agriculture news in Marathi Nampur market committee register wrong rate onion Maharashtra | Agrowon

नामपूर बाजार समितीत कांद्याला किमान दर १३०, नोंद मात्र ५०० रुपयांची 

टीम अॅग्रोवन
रविवार, 16 मे 2021

सोमवारी (ता. १०) सटाणा तालुक्यातील नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाऱ्याने गोल्टी कांद्याला १६० रुपये क्विंटलप्रमाणे बोली लावली असताना बाजार समितीने याच दिवशी किमान दर ५०० रुपये राहिल्याची नोंद केली आहे.

नाशिक : सोमवारी (ता. १०) सटाणा तालुक्यातील नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाऱ्याने गोल्टी कांद्याला १६० रुपये क्विंटलप्रमाणे बोली लावली असताना बाजार समितीने याच दिवशी किमान दर ५०० रुपये राहिल्याची नोंद केली आहे. त्यामुळे बाजार समितीच्या कामकाजावर शंका उपस्थित करण्यात येत आहे. प्रत्यक्ष लिलाव व बाजार समितीत दराच्या नोंदी वेगवेगळ्या असल्याने शेतकऱ्यांची दिशाभूल होत आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी, की सोमवार द्याने (ता. सटाणा) येथील शेतकरी सतीश कापडणीस यांनी १७ क्विंटल गोल्टी कांदा विक्रीस आणला होता. सकाळच्या सत्रात या कांद्याला प्रतिक्विंटल १३० रुपये बोली लागली, तर दुपारच्या सत्रात पुन्हा लिलावात १६० रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बोली लागली. मग ही नचांकी नोंद असताना बाजार समितीत ५०० रुपये किमान दराची नोंद असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जिल्हा उपनिबंधक कार्यालय व पणन विभागाला खोटी माहिती पुरवली जाते की काय, याबाबत शंका उपस्थित होत आहे. 

एकीकडे राज्यातील बाजार समित्यांची आवक व दरासंबंधी माहिती महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या संकेतस्थळावर अद्यावत असते. मात्र नामपूर बाजार समितीची माहिती का नाही, असे अनेक प्रश्‍न या संशयाला कारण ठरत आहेत. 

बाजार समितीच्या कामकाजासंबंधी उपस्थित प्रश्‍न 

  • लिलाव झाल्यानंतर सौदा पट्टीवर रकाना असताना शेतकऱ्याचे नाव, गाव असा उल्लेख का केला जात नाही? 
  • लिलावात बोलले जाणारे किमान दर व बाजार समितीने जाहीर केलेला किमान दर यात तफावत का? 
  • माहिती समोर असताना शेतकरी खोटे बोलतात, असा सभापती आरोप नेमका कुणासाठी करतात? 

खोट्या माहितीची नोंद अन् सभापती अनभिज्ञ 
बाजार समितीचे सभापती शांताराम निकम यांना संपर्क केला असता शेतकऱ्याने पत्रकारांना खोटी माहिती दिल्याचे सांगितले. यावर तुम्ही शेतकऱ्याला खोडले का नाही, असे विचारले असता त्यांनी बोलणे टाळले अन् सचिवांकडे फोन दिला. यावर सचिव संतोष गायकवाड यांनी सांगितले, की माल खराब असल्यास कमी दर मिळतो. त्यामुळे माध्यमात चर्चा होत असल्याने नीचांकी दराची नोंद टाकत नाही यापुढे टाकू.’’ मात्र सभापती याबाबत अनभिज्ञ असताना शेतकऱ्यांवर आरोप कुणासाठी करतात, असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. 

प्रतिक्रिया
गोल्टी कांद्याचा आकार व रंग याची मला कल्पना आहे. मात्र रास्त दर न देता मातीमोल दराने बोली लागल्याने मी माल दिला नाही. किलोला १२ रुपये खर्च असताना दीड रुपया बोली लागते, हे दुर्दैवी आहे. 
- सतीष कापडणीस, कांदा उत्पादक, द्याने, ता. सटाणा 

नामपूर बाजार समितीत १ रुपये ६० पैसे किलोने कांदा विकला असताना किमान ५ रुपये किलोचे दर दाखविले. शेतकऱ्यांचे दुर्दैव हे आहे, जे लोक खोटे बोलतात त्यांच्याच दारात परत कांदा विक्री करावी लागणार आहे. शासनाचा बाजार समित्या व व्यापारी वर्गावर अंकुश नाही. 
- अभिमन पगार, जिल्हा उपाध्यक्ष, राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना 


इतर अॅग्रो विशेष
विदर्भात मुसळधारेची शक्यता पुणे : उत्तरेकडे मॉन्सून गेल्यानंतर राज्यातील...
दूधप्रश्‍नी शेतकरी आक्रमक; राज्यभरात...नगर ः दुधाला दर मिळावा यासाठी गुरुवारी (ता. १७)...
‘द्राक्ष क्लस्टर’मध्ये नाशिकचा समावेश नाशिक : केंद्र सरकारने देशभरात विविध ५३ पिकांचे...
सूक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजनेला गती...पुणे ः पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजना...
कोकणसह कोल्हापुरात पावसाने दाणादाण पुणे : कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड,...
पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विम्याचे...सोलापूर ः राज्यातील फळबागांसाठी असलेल्या...
सिंधुदुर्ग पूरस्थितीच्या उंबरठ्यावरसिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार...
राज्यात कांदा प्रतिक्विंटल ५०० ते २३००...अकोल्यात प्रतिक्विंटल ६०० ते १६०० रुपये अकोला ः...
खानदेशातील आवार प्रगतीवर स्वारआवार (ता.जि. जळगाव) हे कापूस, दादर ज्वारीसाठी...
राज्यात २१८ तालुक्यांमध्ये दमदार पाऊस;...पुणे ः जूनच्या पहिल्या पंधरवड्यात राज्यातील २१८...
राज्यात खरीप पेरणी तीन टक्केनगर ः राज्यात यंदा आतापर्यंत खरिपाची सरासरीच्या...
दूधप्रश्‍नी आज राज्यभर किसान सभेचे...नगर ः दुधाला दर मिळावा यासाठी गुरुवारी (ता. १७)...
विदर्भात पावसाचा जोर वाढणारपुणे : राज्यातील बहुतांशी भागात उन्हासह अंशतः...
अनेक वर्षांपासून जपली आले उत्पादकता अन्...आले पिकातील दरांत दरवर्षी चढउतार होते. मात्र...
भाजीपाला बीजोत्पादनातील ‘मास्टर’जिद्द, हिंमत, अभ्यास, ज्ञान घेण्याची वृत्ती व...
कोकण, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता पुणे : कोकण ते अरबी समुद्राच्या दरम्यान कमी...
पूर्वविदर्भात जोरदार पाऊस पुणे : राज्यातील काही भागांत पावसाचा दणका सुरूच...
जालन्यातील ऊस संशोधन केंद्र उभारणीला...पुणे ः ऊस शेतीच्या विकासासाठी विदर्भ,...
दूध दरांसाठी ग्रामसभांच्या ठरावाची...नगर : राज्यात दुधाला दर दिला जात नसल्याने दूध...
आता शेतकरीच करणार पीकपाहणी पुणे ः तलाठ्याकडून गावशिवारात प्रत्यक्ष पाहणी...