agriculture news in marathi, nana patole comment on chief minister, mumbai, maharashtra | Agrowon

मुख्यमंत्री महोदय, पूरस्थिती गांभीर्याने घ्या : नाना पटोले

टीम अॅग्रोवन
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

मुंबई : मुख्यमंत्री महोदय, राज्याची पूरस्थिती गांभीर्याने घ्या, तेही जमत नसेल तर पुरात वाहून जाणाऱ्यांना 'तुमच्या' गांभीर्याने घेण्याचा निकष लागू होतो का ते सांगा. किमान ज्या राज्याने तुम्हाला मुख्यमंत्रिपदावर बसविले त्या राज्याला तरी गांभीर्याने घेऊन तातडीने उपाययोजना करा व लोकांचे जीव वाचवा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रचार प्रमुख नाना पटोले यांनी केले.
 

मुंबई : मुख्यमंत्री महोदय, राज्याची पूरस्थिती गांभीर्याने घ्या, तेही जमत नसेल तर पुरात वाहून जाणाऱ्यांना 'तुमच्या' गांभीर्याने घेण्याचा निकष लागू होतो का ते सांगा. किमान ज्या राज्याने तुम्हाला मुख्यमंत्रिपदावर बसविले त्या राज्याला तरी गांभीर्याने घेऊन तातडीने उपाययोजना करा व लोकांचे जीव वाचवा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रचार प्रमुख नाना पटोले यांनी केले.
 

येथे शुक्रवारी (ता.९) आयोजित पत्रकार परिषदेत श्री. पटोले म्हणाले, की मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेत मग्न असताना राज्यातील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून देण्याचा प्रयत्न आम्ही केला होता. मात्र यवतमाळ येथील पत्रकार परिषदेत एका प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, की ‘मी नाना पटोलेंना गांभीर्याने घेत नाही’. दुसरा बाजीराव पेशवा हे देखील अठरापगड जातींना गांभीर्याने घेत नव्हते. ते संकटात असताना त्यांना मदतीचा हात देत नव्हते. तसेच मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा राज्यातील जनतेला गांभीर्याने घेत नाहीत. 

मुख्यमंत्र्यांनी जर वेळीच कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याशी संपर्क करून आलमट्टी धरणातील पाणी सोडण्याची विनंती केली असती, तर पूरस्थिती एवढी भयंकर झाली नसती. मुख्यमंत्री पूरस्थितीवर उपाययोजनांबाबत फोनवरून सूचना दिल्या आहेत, असे उत्तर ठिकठिकाणी देत होते. मुख्यमंत्र्यांनी उंटावरून शेळ्या न हाकता प्रत्यक्ष काम हाती घेऊन प्रशासनाला योग्य त्या सुचना दिल्या असत्या तर एवढे बळी गेले नसते. मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या असत्या तर एवढे बळी गेले नसते. सर्वत्र गंभीर परिस्थिती दिसत असूनही योग्य वेळ आल्यावर राष्ट्रीय आपत्ती जाहीर करू, असे उत्तर मुख्यमंत्री देतात. त्यामुळे वास्तव डोळ्यांसमोर असून देखील मुख्यमंत्र्यांना राष्ट्रीय आपत्ती जाहीर करण्यास कोणता मुहूर्त हवा आहे, असा सवालही श्री. पटोले यांनी केला.  

संतापजनक गोष्ट म्हणजे मुख्यमंत्र्यांनी शासन आदेश काढून ज्या घरांमध्ये दोन दिवस पाणी होते केवळ त्यांनाच दहा किलो धान्य देण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुरात सर्वस्व गमावलेल्या जनतेची खिल्ली उडवण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे आता आम्ही पूरग्रस्त भागाचा दौरा करून तेथील जनतेच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे श्री. पटोले यांनी सांगितले.


इतर ताज्या घडामोडी
ठिबक सिंचनातील पंप निवडीसाठी तांत्रिक...महाराष्ट्रामध्ये शेतकरी कापूस, हळद, ऊस, संत्रा,...
वारणा, गोकुळ दूध संघांकडून दरात वाढकोल्हापूर : जिल्हा दूध संघ (गोकुळ) आणि वारणानगर...
नाशिक : अतिवृष्टीनंतर कपाशीवर करपाचा...नाशिक : अतिवृष्टीमुळे सातत्याने कपाशी लागवडीमध्ये...
कृषी संशोधन केंद्रे पांढरा हत्ती ठरू...भंडारा ः सर्वाधिक रोजगार शेतीमधून उपलब्ध होऊ शकतो...
मधमाश्या, मित्रकीटक वाचविण्यासाठी...नाशिक: मधमाश्यांची संख्या जगभरात तसेच भारतातही...
बाधितांसाठी मागितले दहा कोटी अन्‌...आटपाडी, जि. सांगली ः अवकाळी पावसामुळे आटपाडी...
शेतकरी संघटनेचे गुरुवारी निर्बंधमुक्ती...नगर ः संपूर्ण कर्जमाफी करून राज्यातील शेतकऱ्यांचा...
पुणे : फळपीक विमा योजना असून नसल्यासारखीपुणे : फळपिकांना हवामानाच्या धोक्यापासून संरक्षण...
गडहिंग्लजमध्ये ज्वारीचे क्षेत्र एक हजार...गडहिंग्लज, जि. कोल्हापूर : अतिवृष्टी आणि अवकाळी...
बाजारपेठेवर आधारित पीकपद्धतीचा अवलंब...नगर  : ‘‘कमी पाणी व जास्त पाणी, अशा दोन...
नवीन वर्षात ७५० ग्रामपंचायतींच्या...पुणे : येत्या नवीन वर्षात जुलै ते डिसेंबर २०२० या...
हिंगोली जिल्ह्यात रब्बीची ७६ हजार...हिंगोली : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात सोमवार...
पुण्यात पालेभाज्यांसह कांद्याच्या आवकेत...पुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
गहू, हरभरा पिकांसाठी एकात्मिक...या वर्षी परतीच्या पावसाचे प्रमाण अधिक राहिल्याने...
शेती उत्पादन वाढीसाठी मधमाश्‍यांचा मोठा...नाशिक: मधमाश्‍यांचे संगोपन करून त्यांच्या...
कृत्रिम रेतनावर नियंत्रण योग्यचपुणे : कृत्रिम रेतन करताना शास्त्रोक्त...
कडधान्यवर्गीय बियाणे उत्पादकांना अनुदान...अकोला  ः कडधान्यवर्गीय पिकांच्या पायाभूत...
अमरावती ‘एसआयटी’कडूनही अजित पवार निर्दोषमुंबई : नागपूर विभागातील सिंचन घोटाळ्यापाठोपाठ...
नांदेड जिल्ह्यात कृषी योजनेंतर्गत १...नांदेड : जिल्हा परिषदेच्या कृषी...
पुणे विभागात गळीत हंगामात १८ साखर...पुणे : गळीत हंगाम सुरू होऊन जवळपास दीड महिना होत...