महाराष्ट्र, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर गुन्हे दाखल करा ः नाना पटोले

नाना पटोले
नाना पटोले

सांगली  : राज्यातील आपत्ती व्यवस्थापनाला पावसाबाबत सूचना देऊनही त्यांनी दुर्लक्ष केले. मुख्य सचिवांना नोटीस देऊनही कसूर केली. आता महाराष्ट्र व कर्नाटकचे मुख्यमंत्री एकमेकांना दोष देत आहेत. या दोघांविरुद्ध ३०२ चे गुन्हे दाखल करावेत, यासाठी याचिका दाखल करणार असल्याची माहिती अखिल भारतीय किसान काँग्रेसचे अध्यक्ष माजी खासदार नाना पटोले यांनी दिली.

येथे आयोजित पत्रकार परिषदेत श्री. पटोले बोलत होते. ते म्हणाले की, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात नऊ दिवस महापुराचे तांडव सुरू आहे. शासन यंत्रणा अपयशी ठरली आहे. हा केवळ राजकीय आरोप नसून वस्तुस्थिती आहे. अतिवृष्टीबाबत २ तारखेपासून सातत्याने आपत्ती व्यवस्थापनाला सूचना केल्या आहेत. तरीही, त्यांनी मुद्दामहून दुर्लक्ष केले. मुख्यमंत्री फडणवीस महाजनादेश दौऱ्यावर होते. पाच तारखेला राज्याच्या मुख्य सचिवांना आम्ही नोटीसदेखील दिली. आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार तत्काळ कारवाई केली नाही, तर सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येते.

२००५ च्या महापुरावेळी दिवंगत नेते पतंगराव कदम, आर. आर. पाटील यांनी आलमट्टी धरणातील पाणीसाठ्याबाबत कर्नाटकला कळवून प्रसंगी ते फोडण्याचा इशारा दिला होता. आता महाराष्ट्र व कर्नाटकात भाजपचेच सरकार आहे. तरीही, दोन्ही मुख्यमंत्री एकमेकांना दोष देत आहेत. त्यामुळे या प्रकरणात दोघांवर ३०२ चे गुन्हे दाखल करावेत, यासाठी याचिका दाखल करण्याची तयारी केली आहे.

श्री. पटोले म्हणाले, ‘‘पूरग्रस्तांना मदतीसाठी अन्य जिल्ह्यांतून मदत येत असताना ‘आरएसएस’ने स्वत:चे लेबल त्यावर लावून ते वाटप केले आहे. पूरग्रस्तांना बाहेर काढण्यासाठीदेखील ज्या भागातून मतदान मिळाले तेथे बोट प्रथम पाठवली गेली असल्याच्या तक्रारी आहेत. सांगली-कोल्हापुरातील पूरस्थिती हाताळण्यासाठी सैन्याकडे सर्व जबाबदारी द्यायला हवी होती. या संकटाला राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित केले तरच पूरग्रस्तांना न्याय मिळू शकतो.’’  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com