agriculture news in marathi, nana patole says doing agitation with farmers, bhandara, maharashtra | Agrowon

शेतकऱ्यांचे देशव्यापी संघटन उभारून आंदोलन करणार : पटोले
टीम अॅग्रोवन
सोमवार, 17 सप्टेंबर 2018

भंडारा   : आजवर सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. याविरोधात शेतकऱ्यांचे देशव्यापी संघटन उभारून लढा पुकारला जाईल, अशी ग्वाही काँग्रेस किसान आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी खासदार नाना पटोले यांनी दिली.

भंडारा   : आजवर सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. याविरोधात शेतकऱ्यांचे देशव्यापी संघटन उभारून लढा पुकारला जाईल, अशी ग्वाही काँग्रेस किसान आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी खासदार नाना पटोले यांनी दिली.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नाना पटोले यांची किसान आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर नुकतीच नियुक्‍ती केली. त्यानंतर प्रथमच त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांबाबत पटोले म्हणाले, की सरकारने शेतकऱ्यांना पीकविमा सक्‍तीचा केला. ज्या शेतकऱ्यांची इच्छा नाही, अशा शेतकऱ्यांना विमा हप्ता भरण्यास सांगण्यात आले. परंतु, नुकसानभरपाई देताना मात्र सरकार व विमा कंपन्यांनी आपले हात वर केले. त्यामुळे शेतकरी नुकसानभरपाई मिळण्यापासून वंचित राहिले.

कर्जमाफी योजना राबवतानाही सरकारकडून शेतकऱ्यांवर अन्याय करण्यात आला आहे. आता पक्षाने आपल्यावर राष्ट्रीयस्तरावरील जबाबदारी दिली आहे. यापुढे देशभरात दौरे करून सर्व शेतकऱ्यांना सरकारच्या चुकीच्या निर्णयाची माहिती दिली जाणार आहे. शेतकऱ्यांचे मोठे संघटन उभारून सरकारविरोधात आंदोलन केले जाईल, असेही त्यांनी सांगितले. या वेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

इतर ताज्या घडामोडी
वाशीम जिल्ह्यात रब्बीत होणार एक लाख...वाशीम : जिल्ह्यात या रब्बी हंगामासाठी एक लाख...
खानदेशातील बाजारांमध्ये ज्वारीची आवक...जळगाव : अतिपावसामुळे खानदेशात ज्वारीचे आतोनात...
कापूस वेचणीला परप्रांतीय मजुरांचा आधारअकोला : अकोट तालुक्यातील ग्राम तरोडा व परिसरात...
अमरावती जिल्ह्यात २४५० कोटींचे नुकसानअमरावती : मॉन्सुनोत्तर पावसामुळे जिल्ह्यात तीन...
नाशिक जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्टरवर...नाशिक : ऑक्टोबर महिन्यातील पावसामुळे जिल्ह्यातील...
 बारामती उपविभागात ४३ हजार हेक्टरवरील...पुणे ः मॉन्सूनोत्तर पावसाने बारामती...
मराठवाड्यात ४१ लाख ४९ हजार हेक्टरवरील...औरंगाबाद  : अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील ४१...
पुणे बाजार समितीत ‘आंबेमोहर’च्या दरात...पुणे  ः आंबेमोहर तांदळासाठी प्रसिद्ध...
सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी...सोलापूर  ः कोरड्या आणि ओल्या दुष्काळामुळे...
नगर : रब्बी ज्वारीचा १ लाख ९१ हजार...नगर  ः मॉन्सूनोत्तर पाऊस जोरात झाला असला तरी...
सातारा जिल्ह्यात रब्बीची १३ टक्के...सातारा  : जिल्ह्यात पावसाने उघडीप दिल्याने...
शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत...अर्धापूर, जि. नांदेड  : शेतकऱ्यांच्या...
शिवसेनेची गुरुवारी तुरंबे येथे ऊस परिषदकोल्हापूर  : येत्या गळीत हंगामासाठी ऊस दर...
आंदोलनाचा दणका; केळी पीकविमा...अकोला  ः २०१८-१९ या वर्षात केळी उत्पादक...
ऊस दराबाबत आज कोल्हापुरात बैठककोल्हापूर : यंदाच्या ऊस दरावर सकारात्मक तोडगा...
शिवसेनाप्रमुखांचा आज स्मृतिदिनमुंबई  : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा...
पीकविम्यासाठी पुण्यात चौथ्या दिवशीही ...पुणे  ः गेल्या वर्षीचा खरीप पीकविमा न...
औरंगाबादमध्ये कोबी १००० ते १८०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
ढगातील हिमकणांच्या निर्मितीची प्रक्रिया...एकत्रित प्रकारच्या ढगांमध्ये हवेच्या उभ्या...
किमान तापमानात घसरण, थंडीला सुरुवातमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा...