नाणार प्रकल्प रद्द झाल्याची अधिसूचना जारी

नाणार प्रकल्प रद्द झाल्याची अधिसूचना जारी
नाणार प्रकल्प रद्द झाल्याची अधिसूचना जारी

मुंबई: नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्प रद्द झाल्याची अधिसूचना अखेर शासनाच्या राजपत्रात प्रकाशित करण्यात आली आहे. उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे उपसचिव डॉ. ना. को. भोसले यांनी यासंदर्भातील परिपत्रक जारी केले आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या सातबारावर असलेले एमआयडीसीचे शिक्के हक्के हटविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी शनिवारी नाणार प्रकल्पासंबंधीच्या भूसंपादन प्रक्रियेची अधिसूचना रद्द करण्यास सहमती दर्शविली होती. त्यानंतर ही प्रक्रिया विनाअधिसूचित करण्यात आल्याची घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली होती. शनिवारी रात्री उशिरा ही अधिसूचना रद्द झाल्याची नोंद राजपत्रात प्रकाशित करण्यात आली. १८ मे २०१७ रोजी नाणार प्रकल्पासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील कारसिंगवेवाडी, सागवे, विल्ये, दत्तवाडी, पालेकरवाडी, कात्रादेवी, कारिवणे, चौके, नाणार, उपळे, पडवे, साखर, तारळ व गोठीवरे तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गिर्ये, रामेश्वर येथील जमिनीचे भूसंपादन करण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली होती. १४ गावांतील सुमारे पंधरा हजार एकर जमिनी यासाठी अधिसूचित करण्यात आल्या होत्या. परंतु ही अधिसूचना विनाअधिसूचित झाली असून तीराजपत्रात प्रकाशित करण्यात आली आहे. प्रकल्पक्षेत्रातील १४ ग्रामपंचायतींच्या ग्रामस्थांनी प्रकल्पाविरोधी ठराव मंजूर केले होते. तसेच कोकणातील सर्व आमदार व खासदारांनी प्रकल्पाला विरोध केला होता. स्थानिक जनतेने भूसंपादनापूर्वी आवश्यक अशी जमीन मोजणी होऊ दिली नव्हती. शेतकऱ्यांच्या वाढत्या विरोधामुळे अखेर हा प्रकल्प रद्द करण्याची घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com