agriculture news in marathi, nanasaheb patil says production sector losses under the name of liberalization, pune, maharashtra | Agrowon

उदारीकरणाच्या नावाखाली उत्पादन क्षेत्राचे नुकसान : नानासाहेब पाटील
टीम अॅग्रोवन
सोमवार, 17 जून 2019

पुणे   : देशात १९९१ मध्ये उदारीकरणाद्वारे आपण जगाला बाजारपेठ खुली करून देत असताना आयात शुल्क शून्यावर आणले, त्यामुळे आपल्याकडील उद्योगधंद्याचा पाया ढासळण्यास सुरवात झाली. उदारीकरणाच्या नावाखाली आपण उत्पादन क्षेत्राचे न भरून येणारे नुकसान केले, अशी टीका कृषी विभागाचे माजी अतिरिक्त मुख्य सचिव नानासाहेब पाटील यांनी केली. 

भारत इंडिया फोरमच्या स्थापनेनिमित रविवारी (ता. १६) आयोजित चर्चासत्राप्रसंगी श्री. पाटील बोलत होते. या वेळी अध्यक्षस्थानी लेखक, पत्रकार विनय हर्डीकर, तसेच सह्याद्री फार्मचे व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे उपस्थित होते.  

पुणे   : देशात १९९१ मध्ये उदारीकरणाद्वारे आपण जगाला बाजारपेठ खुली करून देत असताना आयात शुल्क शून्यावर आणले, त्यामुळे आपल्याकडील उद्योगधंद्याचा पाया ढासळण्यास सुरवात झाली. उदारीकरणाच्या नावाखाली आपण उत्पादन क्षेत्राचे न भरून येणारे नुकसान केले, अशी टीका कृषी विभागाचे माजी अतिरिक्त मुख्य सचिव नानासाहेब पाटील यांनी केली. 

भारत इंडिया फोरमच्या स्थापनेनिमित रविवारी (ता. १६) आयोजित चर्चासत्राप्रसंगी श्री. पाटील बोलत होते. या वेळी अध्यक्षस्थानी लेखक, पत्रकार विनय हर्डीकर, तसेच सह्याद्री फार्मचे व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे उपस्थित होते.  

श्री. पाटील म्हणाले की, ‘‘आपल्याकडील शेतीवरील भार अधिक आहे. शेतीतील लोकसंख्या इतर उद्योगांत आणणे हे आपल्यापुढे मोठे आव्हान आहे. शेतीतील होत असलेले तुकडे आणि त्यातून मिळणारे उत्पन्न तोकडे पडत असल्यामुळे शेतीतील समस्या वाढत आहे. शेतकऱ्यांना चांगले बियाणे, नवे तंत्रज्ञान, व्याजाचा कमी दर असलेला कर्जपुरवठा, यांत्रिकीकरण अशा सुविधा देण्यासाठी राज्यकर्त्यांनी प्रयत्न करायला हवेत.’’

‘‘जगाच्या बाजारपेठेत जे विकेल ते पिकविण्याकडे शेतकऱ्यांना नेण्याची आवश्यकता आहे. हे काम संघटित समूह, कंपन्या, चांगल्या पद्धतीने करू शकतात. शहर आणि ग्रामीण असा वाद न करता काम केल्यास निश्चितपणे विकास होईल. यातून प्रक्रिया उद्योगाचे जाळे उभे राहील, अशा पद्धतीची धोरणे राबवून शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून शेतीवर पडत असलेला अतिरिक्त भार कमी होण्यास मदत होईल,’’ असे श्री. पाटील यांनी सांगितले. 

श्री. शिंदे म्हणाले की, ‘‘पारंपरिक शेतीचे चित्र हे पूर्णपणे अंधातरी आहे. जागतिक पातळीबरोबर देशाची बाजारपेठ काबीज करण्यासाठी समूह शेती हाच त्यावर योग्य उपाय आहे. अन्यथा, त्याच पिकांबाबत होणारी आंदोलने यात बदल होताना दिसणार नाही. चीनने त्यामध्ये योग्य तो बदल केला आणि कृषी उत्पादने निर्यातीमध्ये आज ते आपल्यापुढे आहेत. भारतात आज द्राक्षाची उलाढाल पंधरा हजार कोटींची आहे. निर्यातीच्या माध्यमातून आपण ती ५० हजार कोटींपर्यंत वाढवू शकतो. जगाच्या तुलनेत आपल्याला हे उत्पादन परवडणारेही आहे. याकरिता शेतीला तंत्रज्ञानाची जोड देऊन शेतमालाच्या उत्पादनाबरोबर उत्पादकतावाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, तरच आपण जागतिक बाजारपेठेत टिकाव धरू शकतो.’’

श्री. हर्डीकर यांनी फोरम संदर्भातील विवेचन केले. रमेश जाधव यांनी प्रास्तविक केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी दीपक चव्हाण, नीलेश शेजवळ प्रयत्नशील होते. सूत्रसंचालन डॉ. दिनेश भोसले यांनी केले.

इतर ताज्या घडामोडी
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २८...
सांगली जिल्ह्यातील ४६८ गावांमधील...सांगली  : जिल्ह्यात ४६८ गावांमधील गावठाणांचा...
लातूर, उस्मानाबाद, जालना, बीड...लातूर : लातूर, उस्मानाबाद, जालना आणि बीड...
अकोला जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअकोला ः पावसाचा खंड आणि त्यातच दिवसाचे...
जलसंधारण कामासाठी जलशक्ती योजना :...वाल्हे, जि. पुणे  : राज्यात जलयुक्त...
अनधिकृत बंधारे काढण्यासाठी ‘स्वाभिमानी’...नगर  : भंडारदरा धरणापासून ते ओझर...
बचत गटांना प्रोत्साहनासाठी ‘हिरकणी...सोलापूर  : राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक...
केरळच्या धर्तीवर काजू प्रक्रिया ...रत्नागिरी  ः परदेशी चलन मिळवून देणाऱ्या काजू...
`गोकुळ` मल्टिस्टेटमुळे शेतकऱ्यांचा...मुंबई : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
संगमनेर तालुक्यातील लिंबू बागांना घरघर संगमनेर, जि. नगर : दर्जेदार कागदी लिंबांच्या...
दूध वाहतुकीतून रेल्वेला ६ कोटी १२ लाख...दौंड, जि. पुणे  : दौंड रेल्वे स्थानकावरून...
कृषक विकिरण केंद्रातून अमेरिका, ...नाशिक  : जिल्ह्यातील लासलगाव येथील कृषक...
आसाम, बिहारमध्ये पुराचे ११४ बळीनवी दिल्ली: आसाम आणि बिहारमध्ये पुराचे थैमान...
सौरऊर्जेमुळे शेतकऱ्यांना मुबलक वीज...कोल्हापूर ः शेतकऱ्यांना दिवसा व उद्योगांना स्वस्त...
उशिरा पेरणीसाठी पीक नियोजन आतापर्यंत पडलेला पाऊस व पुढे येणारा पाऊस याचा...
परभणी जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टरवर...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदार लवकरच...सोलापूर : कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक विद्यमान...
पीकविमा प्रश्‍न आठ दिवसांत सोडवा : `...सोलापूर : शेतकऱ्यांनी विमा काढावा, यासाठी...
विमा कंपन्यांविरोधात किसान सभेचा तीन...औरंगाबाद : पंतप्रधान पीकविमा योजनेतील सदोष तरतुदी...
बागलाणात खरीप हंगामातील पिके धोक्यात नाशिक : या वर्षी बागलाण तालुक्यातील रोहिणी, मृग व...