agriculture news in marathi, 'Nanded 44' varieties of hybrid cotton are reflected in Bt: Vice Chancellor | Agrowon

संकरित कपाशीचे ‘नांदेड ४४’ वाण बीटीमध्ये परावर्तित ः कुलगुरू ढवण
टीम अॅग्रोवन
बुधवार, 24 ऑक्टोबर 2018

परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेले संकरित कपाशीचे ‘नांदेड ४४’ हे वाण अनेक वर्षांच्या संशोधन चाचण्या घेऊन बीटीमध्ये परावर्तीत करण्यात आले आहे. खासगी वाणांच्या तुलनेत हे वाण अनेक बाबतीत सरस ठरणार आहे. त्यामुळे एके काळी शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय असलेले वाण परत एकदा शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरेल. सार्वजनिक क्षेत्रातील बीटी कपाशीच्या वाणांच्या बियाण्याचा बाजारपेठेतील वाटा येत्या काही वर्षात वाढतील, असा विश्वास कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी व्यक्त केला.

परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेले संकरित कपाशीचे ‘नांदेड ४४’ हे वाण अनेक वर्षांच्या संशोधन चाचण्या घेऊन बीटीमध्ये परावर्तीत करण्यात आले आहे. खासगी वाणांच्या तुलनेत हे वाण अनेक बाबतीत सरस ठरणार आहे. त्यामुळे एके काळी शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय असलेले वाण परत एकदा शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरेल. सार्वजनिक क्षेत्रातील बीटी कपाशीच्या वाणांच्या बियाण्याचा बाजारपेठेतील वाटा येत्या काही वर्षात वाढतील, असा विश्वास कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी व्यक्त केला.

सोमवारी (ता. २२) महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळ (महाबीज) आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित करण्यात आलेल्या संकरित कपाशीच्या नांदेड-४४ बीटी (बीजी २) आणि पीकेव्‍ही हायब्रीड-२ बीटी (बीजी २) या वाणांचा पीक प्रात्‍यक्षिक पाहणी कार्यक्रम परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील बलसा मध्‍यवर्ती प्रक्षेत्रावर आयोजित करण्‍यात आला होता.

या वेळी अध्‍यक्षस्‍थानी डॉ. अशोक ढवण होते. महाबीजचे व्‍यवस्‍‍थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख, संचालक वल्‍लभराव देशमुख, वनामकृविचे संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले, महाबीजचे महा‍व्‍यवस्‍थापक (उत्‍पादन) सुरेश पुंडकर, महाव्‍यवस्‍थापक (विपणन) रामचंद्र नाके, महाव्‍यवस्‍थापक (गुण नियंत्रण व संशोधन) डॉ. प्रफुल्‍ल लहाने, जिल्‍हा अधीक्षक कृषी अधिकारी बी. आर. शिंदे, कापूस विशेषज्ञ डॉ. खिजर बेग, महा‍बीज विभागीय व्‍यवस्‍थापक सुरेश गायकवाड, मध्‍यवर्ती प्रक्षेत्राचे प्रभारी अधिकारी डॉ. विलास खर्गखराटे, जिल्‍हा व्‍यवस्‍थापक गणेश चिरुटकर आदी उपस्थित होते.

डॉ. ढवण पुढे म्हणाले, सार्वजनिक क्षेत्रातील बीटी कपाशी ही ऐतिहासिक उपलब्धी आहे. खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बीटी कपाशीची प्रक्षेत्रावर लागवड करून तुलनात्मक नोंदणी घ्याव्यात.

ओमप्रकाश देशमुख म्हणाले, पुढच्या वर्षी नांदेड ४४ बीटी आणि पीकेव्ही हायब्रीड २ बीटी या कपाशीच्या वाणांच्या बियाण्यांची ५० ते ५५ हजार पाकिटे शेतकऱ्यांना उपलब्ध होतील.

श्री. नाके म्हणाले, फक्त महाबीजकडूनच या वाणांचे बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करुन दिले जाईल.

डॉ. वासकर म्हणाले, बीटी मध्ये परावर्तीत झाल्यामुळे नांदेड ४४ वाणांचा परत एकदा देशामध्ये दबदबा निर्माण होणार आहे.

 

इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादेत फ्लॉवर १८०० ते ३००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेतसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला...
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...