परभणी ः ‘‘परभणी जिल्हा परिषदेच्या यंदाच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात कृषी तसेच पशुसंवर्धन
ताज्या घडामोडी
नांदेडमध्ये हरभऱ्याला सर्वसाधारण ४५०० रुपये दर
नांदेड : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीतंर्गत येणाऱ्या नवामोंढा बाजारात सध्या नवीन हरभऱ्याची आवक सर्वसाधारण आहे.
नांदेड : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीतंर्गत येणाऱ्या नवामोंढा बाजारात सध्या नवीन हरभऱ्याची आवक सर्वसाधारण आहे. या हरभऱ्याला कमाल चार हजार ६००, किमान चार हजार ५८६, तर सरासरी ४ हजार ५०० रुपये दर मिळाल्याची माहिती बाजार समितीचे सचिव वामनराव पवार आमदुरेकर यांनी दिली.
जिल्ह्यात दोन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी झाली आहे. सध्या अनेक ठिकाणी नवीन हरभरा काढणी सुरु आहे. नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीतंर्गत नवा मोंढा बाजारात नवीन हरभरा आवक सुरु झाली आहे. मागील दहा दिवसात ७८५ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली. यास कमाल चार हजार ७११, किमान चार हजार ५५० तर सरासरी चार हजार पाचशे ८६ दर मिळाला.
हरभऱ्याला केंद्र शासनाचा किमान हमी दर ५१०० रुपये आहे. बाजारातही दरात चढ-उतार होत असल्यामुळे शेतकरी सावध झाले आहेत. नाफेडचे खरेदी केंद्रही जिल्ह्यात सुरु होणार आहे. त्यामुळे खुल्या बाजारात दर चढे राहतील, अशी माहिती व्यापारी शिवाजी खानसोळे यांनी दिली.
बुधवारी सर्वाधिक भाव
नवा मोंढा बाजारात बुधवारी (ता. १७) ११७ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली. यास कमाल कमाल चार हजार ७११, किमान चार हजार ५५० तर सरासरी चार हजार पाचशे ८६ रुपये दर मिळाला. तर शनिवारी (ता. २०) ७६ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली. यास कमाल चार हजार ६००, किमान पाच हजार ४५० तर सरासरी चार हजार ५८६ रुपये दर मिळाल्याची माहिती बाजार समितीकडून मिळाली.
- 1 of 1064
- ››