agriculture news in Marathi, Nanded district aims to distribute crop loans of 25 thousand crores | Agrowon

नांदेड जिल्ह्यात अडीच हजार कोटींचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 23 एप्रिल 2019

नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील विविध बॅंकांना २०१९-२० या वर्षात शेतकऱ्यांना २ हजार ४५९ कोटी ३८ लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यामध्ये खरीप हंगामातील १ हजार ९६७ कोटी ५०४ रुपये आणि रब्बी हंगामातील ४९१ कोटी ८७६ रुपये पीककर्जाचा समावेश आहे. गतवर्षीपेक्षा यंदा पीककर्ज वाटपाच्या उद्दिष्टामध्ये ३५५ कोटी रुपयांनी वाढ करण्यात आली. दरम्यान, २०१८-१९ च्या खरीप आणि रब्बी हंगामात बॅंकांना देण्यात आलेले पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट अपूर्ण राहिले आहे.

नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील विविध बॅंकांना २०१९-२० या वर्षात शेतकऱ्यांना २ हजार ४५९ कोटी ३८ लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यामध्ये खरीप हंगामातील १ हजार ९६७ कोटी ५०४ रुपये आणि रब्बी हंगामातील ४९१ कोटी ८७६ रुपये पीककर्जाचा समावेश आहे. गतवर्षीपेक्षा यंदा पीककर्ज वाटपाच्या उद्दिष्टामध्ये ३५५ कोटी रुपयांनी वाढ करण्यात आली. दरम्यान, २०१८-१९ च्या खरीप आणि रब्बी हंगामात बॅंकांना देण्यात आलेले पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट अपूर्ण राहिले आहे.

२०१९-२० या आर्थिक वर्षात विविध बॅंकांना खरीप हंगामामध्ये १ हजार ९६७ कोटी ५०४ रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यामध्ये राष्ट्रीयीकृत बॅंकांना १ हजार ५११ कोटी ७३ लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेला २७७ कोटी १६ लाख रुपये, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला १७८ कोटी ६० लाख रुपये एवढ्या उद्दिष्टाचा समावेश आहे. यंदा खरीप पीककर्ज वाटपाच्या उद्दिष्टांमध्ये २८४ कोटी रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

रब्बी हंगामामध्ये यंदा ४९१ कोटी ८७ लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट बॅंकांना देण्यात आले आहे. यामध्ये राष्ट्रीयीकृत बॅंकांना ३७७ कोटी ९३ लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेला ६९ कोटी २९ लाख रुपये, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेला ४४ कोटी ६५ लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. रब्बी पीककर्ज वाटपाच्या उद्दिष्टामध्ये यंदा ७१ कोटी रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

२०१८-१९ मधील उद्दिष्ट अपूर्णच...
२०१८-१९ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील बॅंकांना खरीप हंगामात १ हजार ६८३ कोटी ४७ लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट होते; परंतु प्रत्यक्षात ६४३ कोटी ३८ लाख रुपये (३८.२२ टक्के) कर्जवाटप करण्यात आले. खरिपात जिल्हा बॅंकेने उद्दिष्टापेक्षा अधिक म्हणजेच १७९ कोटी ६४ लाख रुपये (११७.३५ टक्के) पीककर्ज वाटप केले; परंतु राष्ट्रीयीकृत बॅंकांनी ३२१ कोटी ५२ लाख रुपये (२४.८६) टक्के आणि महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेने १४२ कोटी २२ लाख रुपये (५९.९७ टक्के) पीककर्ज वाटप केले. रब्बी हंगामात जिल्हा बॅंकेला ३८ कोटी २१ लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट होते; परंतु बॅंकेने कर्ज वाटप केले नाही. राष्ट्रीयीकृत बॅंकांनी २१६ कोटी ९३ लाख रुपये (६७ टक्के), महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेने ३९ कोटी ७२ लाख रुपये (६७ टक्के) पीककर्ज वाटप केले.

नांदेड जिल्हा २०१९-२० पीककर्ज वाटप उद्दिष्ट (कोटी रुपये)
बॅंक पीक कर्ज
राष्ट्रीयीकृत बॅंका १८८९.३७ 
महाराष्ट्र ग्रामीण बॅंक ३४६.४६
जिल्हा सहकारी बॅंक २२३.२५

 

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली...नगर  ः जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी गोदावरी...
पूरबाधित क्षेत्रातील उसाचे व्यवस्थापन पुराच्या पाण्याचा कालावधी, पाण्याचा गढूळपणा आणि...
संत्रा फळपिकावरील तपकिरी कुज व्यवस्थापन लिंबू वर्गीय फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतो....
नत्राच्या दुहेरी समस्यांवर मात...जागतिक पातळीवर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी...
डाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया...सोलापूर  : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब...
जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन...जळगाव  ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
औरंगाबाद जिल्ह्यात पावसाअभावी टोमॅटोचे...औरंगाबाद :  जिल्ह्यातील टोमॅटोचे आगार...
अकोला जिल्ह्यातील पाच पशुवैद्यक दवाखाने...अकोला  ः जिल्हा परिषदेअंतर्गत चालविल्या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २३ धरणे भरलीसिंधुदुर्ग : मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील २३...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील अनेक...
दसरा, दिवाळीसाठी चांदवड तालुक्यात...नाशिक  : चांदवड तालुक्यातील शेतकरी दसरा,...
नगर जिल्ह्यातील वाहून गेलेल्या...नगर : पुराच्या पाण्याने वाहून गेलेल्या जमिनीचे...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे...सिंधुदुर्ग   ः अतिवृष्टीचा भाजीपाला...
महापुराच्या स्थितीतही ‘त्यांनी’ तीन...नवेखेड, जि. सांगली  : मसुचिवाडी (ता....
वसंतराव नाईक यांनी आधुनिक तंत्रज्ञान...पुसद, जि. यवतमाळ   ः देशातील...
सरकारला खरीप, रब्बीतील फरक कळत नाही :...पैठण, जि. औरंगाबाद  : राज्यातील शेतकऱ्यांची...
पूरग्रस्त भागातील घरांच्या दुरुस्तीसाठी...मुंबई  : पूरग्रस्त ग्रामीण भागातील वाहून...
पीक नुकसानभरपाई नको; संपूर्ण कर्जमाफीच...कऱ्हाड, जि. सातारा   ः महापुराने हुती...
नगर जिल्ह्यात ४०५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर  ः जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पावसाने...
उत्तर भारतात अतिदक्षतेचा इशारा; नद्या...नवी दिल्ली : दक्षिण भारतानंतर आता उत्तर भारतही...