Agriculture news in Marathi, Nanded district bank new president Dr. Sunil Kadam | Agrowon

नांदेड जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदी डॉ. सुनील कदम
टीम अॅग्रोवन
सोमवार, 15 जुलै 2019

नांदेड ः नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदासाठी शनिवारी (ता. १३) झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. सुनील कदम हे विजयी झाले. या संदर्भात पीठासीन अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) प्रवीण फडणीस यांनी माहिती दिली. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष दिनकर दहिफळे यांचा कार्यकाळ संपल्यामुळे अध्यक्ष पद रिक्त झाले होते. 

नांदेड ः नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदासाठी शनिवारी (ता. १३) झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. सुनील कदम हे विजयी झाले. या संदर्भात पीठासीन अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) प्रवीण फडणीस यांनी माहिती दिली. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष दिनकर दहिफळे यांचा कार्यकाळ संपल्यामुळे अध्यक्ष पद रिक्त झाले होते. 

त्यामुळे नवीन अध्यक्षाच्या निवडीसाठी शनिवारी (ता. १३) जिल्हा बॅंकेच्या सभागृहामध्ये संचालक मंडाळाची विशेष सभा बोलावण्यात आली होती. या वेळी जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) प्रवीण फडणीस पीठासीन अधिकारी म्हणून उपस्थित होते. अध्यक्षपदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या विहित मुदतीत राष्ट्रवादीचे डॉ. सुनील श्यामराव कदम व हरिहरराव भोसीकर या दोघांनी अर्ज दाखल केले. विहित मुदतीत कुणीही माघार न घेतल्यामुळे गुप्त पद्धतीने मतदान घेण्यात आले. 

विशेष सभेस बॅंकेचे २१ पैकी २० संचालक उपस्थित होते. मतमोजनीनंतर डॉ. कदम यांना ११, तर श्री. भोसीकर यांना ९ मते मिळाल्याचे स्पष्ट झाले. पीठासीन अधिकारी श्री. फडणीस यांनी डॉ. कदम यांची अध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर केले. निवडणूक प्रक्रियेसाठी बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कदम, सहायक निबंधक ए. डी. चव्हाण, संजय कार्लेकर, मुकेश सावळेश्वरकर, आर. एम. कांबळे आदींनी सहकार्य केले.

इतर बातम्या
नगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली...नगर  ः जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी गोदावरी...
नत्राच्या दुहेरी समस्यांवर मात...जागतिक पातळीवर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी...
डाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया...सोलापूर  : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब...
जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन...जळगाव  ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
औरंगाबाद जिल्ह्यात पावसाअभावी टोमॅटोचे...औरंगाबाद :  जिल्ह्यातील टोमॅटोचे आगार...
अकोला जिल्ह्यातील पाच पशुवैद्यक दवाखाने...अकोला  ः जिल्हा परिषदेअंतर्गत चालविल्या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २३ धरणे भरलीसिंधुदुर्ग : मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील २३...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील अनेक...
दसरा, दिवाळीसाठी चांदवड तालुक्यात...नाशिक  : चांदवड तालुक्यातील शेतकरी दसरा,...
नगर जिल्ह्यातील वाहून गेलेल्या...नगर : पुराच्या पाण्याने वाहून गेलेल्या जमिनीचे...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे...सिंधुदुर्ग   ः अतिवृष्टीचा भाजीपाला...
महापुराच्या स्थितीतही ‘त्यांनी’ तीन...नवेखेड, जि. सांगली  : मसुचिवाडी (ता....
वसंतराव नाईक यांनी आधुनिक तंत्रज्ञान...पुसद, जि. यवतमाळ   ः देशातील...
सरकारला खरीप, रब्बीतील फरक कळत नाही :...पैठण, जि. औरंगाबाद  : राज्यातील शेतकऱ्यांची...
पूरग्रस्त भागातील घरांच्या दुरुस्तीसाठी...मुंबई  : पूरग्रस्त ग्रामीण भागातील वाहून...
पीक नुकसानभरपाई नको; संपूर्ण कर्जमाफीच...कऱ्हाड, जि. सातारा   ः महापुराने हुती...
नगर जिल्ह्यात ४०५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर  ः जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पावसाने...
पूरग्रस्तांना एक हेक्टरसाठी मिळणार...मुंबई : राज्यात विविध भागांत आलेल्या...
राज्याचा पाणीसाठा ६१ टक्क्यांवर;...पुणे : जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला...
‘दावणीची दौलत’ चाऱ्याअभावी खचली; दक्षिण...कोल्हापूर/ सांगली : बारमाही पाण्याने भरलेल्या...