नांदेड जिल्ह्यात हरभऱ्याचा पीक पेऱ्याचा ऑनलाइन सातबारा मिळेना

 In Nanded district, the crop of Gram is not getting online satbara
In Nanded district, the crop of Gram is not getting online satbara

नांदेड : सन २०१९-२० च्या हंगामात आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत हरभरा खरेदीसाठी राज्य पणन महासंघातर्फे (मार्केटिंग फेडरेशन) मंगळवार (ता. २५) पासून शेतकरी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. परंतु, त्यासाठी आवश्यक हरभऱ्याचा पीक पेरा असलेला ऑनलाइन सातबारा उतारा मिळत नाही. त्यामुळे नोंदणी करणे शक्य होत नाही. असे उतारे शेतकऱ्यांना देण्यासाठी तहसीलदारांना आदेश द्यावे, अशी मागणी जिल्हा पणन अधिकारी सुधीर पाटील यांनी जिल्हाअधिकारी डॉ. विपिन ईटनकर यांच्याकडे केली.

जिल्ह्यात यंदा हरभऱ्याच्या क्षेत्रात तिप्पटीने वाढ झाली आहे. अनेक भागांत सुरुवातीला पेरणी केलेल्या हरभऱ्याची काढणी सुरू झाली आहे. आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडतर्फे राज्य पणन महासंघामार्फत जिल्ह्यांमध्ये नांदेड (अर्धापूर), हदगाव, किनवट, बिलोली, देगलूर, मुखेड या सहा खरेदी केंद्रांवर मंगळवार (ता. २५) पासून नोंदणी सुरू करण्यात आली. ऑनलाइन सातबारा उताऱ्यावर हरभऱ्याचा पेरा असल्याशिवाय शेतकऱ्यांची नोंदणी करू नये, अशा सूचना नाफेडच्या प्रधान कार्यालयातर्फे देण्यात आल्या आहेत. 

दरम्यान, पीक पेरा असेलला ऑनलाइन ७-१२ उतारा मिळत नाही. त्यामुळे शेतकरी हमीभावाने हरभरा विक्रीसाठी नोंदणी करण्यापासून वंचित राहत आहेत. नोंदणी करण्यासाठी आलेले शेतकरी जिल्हा पणन अधिकारी कार्यालयाकडे विचारणा करून ऑनलाइन सातबारा उताऱ्यावर हरभऱ्याचा पीक पेरा  नसल्याच्या तक्रारी करत आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com