Agriculture news in marathi Nanded district crop insurance server down on last day | Agrowon

नांदेड जिल्ह्या अखेरच्या दिवशी पिकविम्याचा सर्व्हर डाऊन

टीम अॅग्रोवन
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

नांदेड : पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गंत पीक विमा प्रस्ताव सादर करण्याच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी (ता.३१) महा ई सेवा (जनसुविधा केंद्र) केंद्रांवर सर्व्हर डाऊनची समस्या कायम होती

नांदेड : पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गंत पीक विमा प्रस्ताव सादर करण्याच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी (ता.३१) महा ई सेवा (जनसुविधा केंद्र) केंद्रांवर सर्व्हर डाऊनची समस्या कायम होती. त्यामुळे शेतकऱ्यांना ताटकळत थांबावे लागले. अनेक बॅंकांनी ऑफलाइन पीकविमा प्रस्ताव स्विकारण्यास असहकार्य केले. त्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय झाली. शेतकऱ्यांची नड लक्षात घेऊन जनसुविधा चालकांकड़ून शेतकऱ्यांची लूट सुरु असल्याचे पहायला मिळाले.

दरम्यान, शुक्रवारी सकाळी  ११ वाजेपर्यंत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ९ लाख १० हजार, परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ६ लाख २१ हजारांवर, हिंगोली जिल्ह्यात २ लाख ५४ हजारांवर पीकविमा प्रस्ताव सादर केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

यंदा कोरोनाच्या साथीमुळे पीकविमा प्रस्तावासाठी अखेरच्या दिवशी होणारी गर्दी अनेक ठिकाणी दिसली नाही. गेल्या आठवडभरापासून सर्व्हर डाऊनणे, ग्रामीण भागातील जनसुविधा केंद्रांवर नेटवर्क नसणे, राष्ट्रीय पीकविमा पोर्टलवरील फार्मर कॉर्नरव्दारे थेट विमा प्रस्ताव दाखल करता न येणे, आदी कारणांमुळे शेतकऱ्यांची हेळसांड झाली. 

जनसुविधा केंद्रांच्या संख्येत वाढ झाली.  तरीही अखेरच्या दिवशी होणारी गर्दी टाळण्यासाठी बॅंकांनी विमा प्रस्ताव स्विकारण्याचे आदेश जिल्हाप्रशासनातर्फे देण्यात आले होते. परंतु, अनेक बॅंकांची नकार घंटा कायम असल्याने शेतकऱ्यांना जनसुविधा केंद्रांवर जाऊन विमा प्रस्ताव दाखल करण्याशिवाय पर्याय नव्हता. अखेरच्या दिवशी सर्व्हरवर लोड आल्यामुळे खूप वेळ लागत 
होता. 

मुदत वाढविण्याची मागणी

अनेक केंद्र चालकांनी शेतकऱ्यांचे प्रस्ताव एकत्रित घेतले. रात्री उशीरा ते ऑनलाइन भरल्यानंतर पावती दिली जाईल, असे सांगितले. परंतु, प्रत्येक प्रस्तावांसाठी २०० ते ३०० रूपये घेतल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. विविध कारणांनी पीकविमा योजनेतील सहभागापासून शेतकरी वंचित राहण्याची शक्यता लक्षात घेऊन विमा प्रस्ताव सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.


इतर ताज्या घडामोडी
सार्वजनिक पैदास कार्यक्रमांचे प्रमाण...फळपिकातील नव्या जातींच्या पैदास कार्यक्रमांचे...
नगरमध्ये पीककर्ज वितरणात जिल्हा बॅंकच...नगर ः नगर जिल्ह्यात खरीप हंगामात आत्तापर्यंत खरीप...
`रानभाज्या खा, रोगप्रतिकार शक्ती वाढवा`सोलापूर : माहिती असलेल्या पालेभाज्या, फळभाज्या...
वेळीच ओळखा टोमॅटोमधील विकृतीभाजीपाला पिके ही अन्य पिकांच्या तुलनेत नाजूक...
गिरणा नदीवरील बलून बंधारे प्रकल्पाला...जळगाव  : केंद्र सरकारचा प्रायोगीक प्रकल्प...
परभणी जिल्ह्यात ऊस लागवडीत दुपटीने वाढपरभणी  ः जिल्ह्यात सन २०१९-२० मध्ये ३० हजार...
सहकारी साखर कारखान्यांनी रुग्णालय...कऱ्हाड, जि. सातारा : कोरोनाचे संकट हे अख्या जगावर...
शेतीच्या डेटा विज्ञानाबाबत जागृकतेची...परभणी :  डेटा विज्ञान तसेच कृत्रिम...
कृषी सल्ला (कोकण विभाग)हवामान अंदाज ः मुंबई येथील प्रादेशिक हवामान...
सांगलीत डाळिंब उत्पादक पीकविम्याच्या...सांगली : जिल्ह्यात पाच मंडळांत अतिपावसाने...
खानदेशातील अनेक भागात तुरळक पाऊसजळगाव  ः जिल्ह्यात रविवारी (ता.९) अनेक भागात...
रानभाज्यांकडे नागरिकांचा वाढता कलयवतमाळ : जिल्ह्याच्या डोंगररांगा व शेतशिवारात...
सातवा वेतन लागू करा, महागाई भत्ता द्या...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नगरमध्ये आले चार ते पाच हजार रूपये...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या...
नगर जिल्ह्यात चार लाख टन कांदा चाळीतचनगरः गतवर्षी लेट खरीप, उन्हाळी कांद्याचे क्षेत्र...
नाशिकमध्ये लसणाची आवक साधारण; दरही...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...
सोलापुरात ढोबळी मिरची, वांगी, काकडीला...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
मे ते जून दरम्यानचे वीज बिल माफ करा :...कोल्हापूर : मे ते जून दरम्यानचे वीज बिल माफ न...
पुणे बाजार समितीत व्यवहार सुरळीत...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
बुलडाण्यात २८२ शेतकऱ्यांनी राबवला रेशीम...बुलडाणा : जिल्ह्यात सन २०१५-१६ पासून सहकार व...