agriculture news in marathi In Nanded district, the cultivation of corona hampered farming activities | Agrowon

नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या विळख्याने शेती मशागतीची कामे रखडली

टीम अॅग्रोवन
रविवार, 16 मे 2021

नांदेड : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने ग्रामीण भागाला व्यापल्याने ऐन पेरणीच्या तोंडावर मशागतीची कामे रखडली आहेत.

नांदेड : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने ग्रामीण भागाला व्यापल्याने ऐन पेरणीच्या तोंडावर मशागतीची कामे रखडली आहेत. कोरोनाबाधितांची संख्या गावात वाढली. त्यामुळे अनेकांना रुग्णालये गाठावे लागले. इतरांना विलगीकरणात राहावे लागले. यामुळे पेरणीपूर्व मशागतीची कामे जिल्ह्यात रेंगाळली आहेत. या सोबतच बाजार बंदमुळे पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना चणचण जाणवत आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जिल्हा ढवळून निघाला आहे. जिल्ह्यात दररोज दोन हजारांवर रुग्ण बाधित होऊ लागले. यात सर्वाधिक रुग्ण ग्रामीण भागातील होते. या काळात संसर्गाला आळा घालण्यासाठी प्रशासनाने अनेक गावांच्या सीमा बंद कराव्या लागल्या होत्या. परिणामी, जून महिना जवळ येऊनही शेतकऱ्यांना पेरणीपूर्व कामे करण्यासाठी अडचण निर्माण झाली.

कोरोनाचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात अनेकांना झाला. एका घरातील एक व्यक्ती बाधित झाला, तर इतर सर्वच लोकांना त्यांची झळ पोहोचू लागली. परिणामी, अख्खे घर यात गुंतल्याने शेती कामे जागावर राहिली. तर शेतीमालही घरीच पडून राहिला. 

हाती असलेले पैसे तर खर्च झाले. परंतु शेतीमाल तसेच नगदी पैसे देणाऱ्या भाजीपाल्याचे दरही कोसळल्याने शेतकऱ्यांना आर्थिक अडचण निर्माण झाली. कोरोनाच्या विक्राळ परिस्थितीमुळे शासनाने लागू केलेल्या लॉकडाउनचा फटका ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात बसला. परिणामी, पेरणीपूर्वी करण्यात येणारी नांगरणी, वखरणी, काडी-कचरा जमा करणे आदी कामे अद्याप शिल्लक आहेत. 

खतांची दरवाढ अडचणीची

संसर्गाची साखळी तुटावी, या साठी लॉकडाउन लागू करण्यात आला. त्याचा फटका बळिराजाला मोठ्या प्रमाणात बसला. अशातच आता खतांच्या किमती वाढत आहे. त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी आर्थिक अडचणीचा ठरणार असल्याची शक्यता आहे.

खतांच्या किमतीबाबत शासनाकडून ठोस माहिती उपलब्ध होत नसल्याने शेतकरी संभ्रमात आहेत. तर खत विक्रेते मात्र नवीन एमआरपीनुसार खताची विक्री करत आहेत. रासायनिक खतांसह इंधनाचे दर वाढल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.


इतर बातम्या
तुरळक ठिकाणी मुसळधार शक्य पुणे : कोकणसह राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस...
कोकण, मराठवाड्यात जोरदार पावसाची हजेरी पुणे : राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर कमी झाला...
पेरणीची घाई नको : कृषी आयुक्तालयपुणेः राज्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर...
मॉन्सूनला पोषक वातावरण पुणे : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) वेगाने प्रवास...
दूध दरातील कापतीने शेतकऱ्यांची परवड औरंगाबाद: महिनाभरातच दुधाच्या दरात तब्बल ११...
सातव्या वेतन आयोगासाठी महामंडळांमधील...नगर : राज्यातील विविध महामंडळांमधील अधिकारी-...
पीककर्ज व्याज सवलत योजनेचे पालकत्व...पुणेः शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने तीन...
राज्यातील प्रकल्पांमध्ये केवळ २१ टक्के...पुणे ः मे आणि जून महिन्यात पाण्याची मागणी...
कमी दराने कांदा खरेदी सुरूच नाशिक : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
रत्नागिरी, संगमेश्‍वर, राजापूरला ...रत्नागिरी : सलग दुसऱ्या दिवशी रत्नागिरी...
दूध दरासाठी गुरुवारी आंदोलन नगर : लॉकडाउनचा गैरफायदा घेत दूध उत्पादक...
चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्यांना...वडाळी जि. अकोला : या हंगामाला सुरुवात होताच...
पशुचिकित्सा व्यावसायिक संघटना करणार...नागपूर : पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेच्या...
जागोजागी होणारी लुट थांबवा, ...नगर : ‘‘राज्यात जागोजागी प्रत्येक क्षेत्रात...
‘घटनादुरुस्ती करून आरक्षण देणे  हाच...कोल्हापूर : घटनादुरुस्ती करून मराठा आरक्षण देणे...
कोकणातील डच, पोर्तुगाल वखारींचे होणार...पुणे : भारतातील आंतरराष्ट्रीय सागरी व्यापारासाठी...
गोसीखुर्द प्रकल्प पूरनियंत्रणासाठी ...मुंबई ः गोसीखुर्द प्रकल्प पूरनियंत्रणाबाबत...
प्रकल्पग्रस्तांच्या जमिनींना पाच पट...नाशिक : देशातील पहिला सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग...
आरक्षण देण्याची राज्यकर्त्यांची इच्छाच...पुणे : मराठा समाजाला आरक्षण देण्याची राजकीय...
नांदेडमध्ये थकीत ‘एफआरपी’साठी धरणेनांदेड : ऊस गाळप होऊनही पैसे न दिल्याने...