agriculture news in marathi In Nanded district Heavy rain | Agrowon

नांदेड जिल्ह्यात  वादळी पाऊस 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 4 मे 2021

नांदेड : शहरासह जिल्ह्यात रविवारी (ता. २) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास मेघ गर्जनेसह पाऊस झाला. वादळी पावसाने फळबागांसह भाजीपाल्यांचे नुकसान झाले. भोकर तालुक्यात वीज पडून पाच शेळ्या ठार झाल्या. 

नांदेड : शहरासह जिल्ह्यात रविवारी (ता. २) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास मेघ गर्जनेसह पाऊस झाला. वादळी पावसाने फळबागांसह भाजीपाल्यांचे नुकसान झाले. भोकर तालुक्यात वीज पडून पाच शेळ्या ठार झाल्या. यामुळे नागरिकांना मात्र उष्णतेपासून थोडा गारवा मिळाला. 

मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे नागरिक उष्णतेने हैराण झाले आहेत. मात्र, रविवारी सायंकाळी वादळी पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला. त्यामुळे नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते.

शनिवारी (ता.१) सायंकाळी जोरदार वारे आणि विजांचा कडकडाट झाला. काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचाही पाऊस पडला. रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अचानक वादळवाऱ्याला सुरुवात झाली आणि सुमारे पंधरा मिनिटे चांगलाच पाऊस बरसला. 

जिल्ह्यात फळबागांसह, भाजीपाल्यांचे नुकसान झाले आहे. विशेषतः अर्धापूर, मारतळा, लोहा, उस्माननगर, बरबडा, मुदखेड आणि भोकरमध्ये सर्वाधिक नुकसान झाले. नांदेड तालुक्यातील निळा शिवारात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. भोकर तालुक्यातील पोमनाळा येथील शेतकरी बाबु यशवंत सूर्यवंशी यांच्या दोन, तर गोविंद रामा मोरे यांच्याही दोन शेळ्या वीज पडून दगावल्या आहेत. 
 


इतर बातम्या
वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा पुणे : अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या ‘तौत्के’...
पावसासाठी पोषक वातावरण पुणे : चक्रीवादळामुळे पश्‍चिम महाराष्ट्रात वेगाने...
पश्‍चिम महाराष्ट्रातही पाऊस पुणे ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा फटका पुणे, कोल्हापूर...
विदर्भ, मराठवाड्यात पाऊसअमरावती/औरंगाबाद : ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे विदर्भ...
कापूस बियाणे विक्री २० मेपासून करा : ‘...नागपूर : विदर्भ, खानदेश विभागांत शेजारच्या...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे ...येवला, जि. नाशिक : कृषी बियाणे रासायनिक खते,...
कोकण किनारपट्टीला चक्रीवादळाचा दणका रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा...
तूर, मूग, उडदाची आयात खुली नागपूर : केंद्र सरकारने हंगामापूर्वी तूर, उडीद...
धूळवाफ पेरणीत लॉकडाउनचा खोडा सांगली ः शिराळा तालुक्यात वारंवार झालेल्या...
आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन करा ः...नागपूर : गेल्या वर्षीचा महापूर लक्षात घेऊन...
कुकडीच्या पाण्यासाठी  पारनेरकर एकवटले निघोज, ता. पारनेर : कुकडीच्या पाण्याबाबत पुणे...
पेट्रोल, खतांच्या दरवाढीविरोधात ...मुंबई : पेट्रोल शंभरी पार केल्यानंतर केंद्राने...
गडहिंग्लजमध्ये शेतकऱ्यांकडे नऊ टन...गडहिंग्लज, जि. कोल्हापूर : यंदाच्या खरीप हंगामात...
कीटकनाशके विक्रीबाबत तरतुदींचे पालन करा अकोला ः या खरीप हंगामात बियाणे, खते, कीटकनाशके...
परभणीत पीककर्जाच्या उद्दिष्टात ४८६...परभणी ः जिल्ह्यात चालू आर्थिक वर्षात (२०२१-२२)...
कोरोना रुग्णालयांचा वीज,  ऑक्सिजन...मुंबई : अरबी समुद्रातील तौक्ते चक्रीवादळामुळे...
मॉन्सूनपूर्व कामांना प्राधान्य द्यावे ः...भंडारा : मॉन्सून कालावधीत अचानक उद्‌भवणाऱ्या...
कोरोनाचे नियम पाळून  बाजार समित्या सुरू...नाशिक : जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव...
नगर जिल्ह्यात खरीपपूर्व मशागतीच्या...नगर : एकीकडे कोरोनाचे सावट असताना ग्रामीण भागातील...
लोहा, माहूर तालुक्यांना विम्याची रक्कम...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत खरीप...