नांदेड जिल्ह्यात ८८.४९ टक्के क्षेत्रावर खरीप

नांदेड जिल्ह्यात ८८.४९ टक्के क्षेत्रावर खरीप
नांदेड जिल्ह्यात ८८.४९ टक्के क्षेत्रावर खरीप

नांदेड : जिल्ह्यात यंदाच्या खरिप हंगामात शुक्रवार (ता.९) पर्यंत ७ लाख ५१ हजार २२२ हेक्टरवर (८८.४९ टक्के) पेरणी झाली आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात ८ लाख ४८ हजार ९२७ हेक्टरवर पेरणी नियोजित आहे. सोयाबीन (१५१.६१ टक्के), मका (२१७.१९ टक्के) या पिकांची नियोजित क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रावर, तर कपाशी (६७.५६), भात (७०.९०), ज्वारी (३६.३२), तूर (९५.८०), मूग (८४.९५), उडीद (४८.९५), तीळ (२७.०५), कारळ (७०.८५) आणि सूर्यफुलाची (१.०२) टक्के पेरणी झाली. या पिकांची सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

नायगाव (१०३.३८ टक्के), बिलोली (१४३.२६) , देगलूर (१३१.४७), मुखेड (११४.२१), धर्माबाद (१०४. ३२), उमरी (१०३.०६) या सहा तालुक्यांत सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी झाली. नांदेड (९७.५३ टक्के), अर्धापूर (७९.९०), मुदखेड (६१.५४), लोहा (६४.७७ ), कंधार (८४.०३), किनवट (८५.५६), माहूर (६०.५३), हदगाव (९०.७१), हिमायतनगर (९७.३३), भोकर (६३.९२) या दहा तालुक्यांमध्ये सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

तालुकानिहाय पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये) नांदेड २८७३०, अर्धापूर २०५७३, मुदेखड ११४१९, हदगाव ७८३२३, माहूर ३६१८२, किनवट ७६७४४, भोकर ४५५४२, उमरी २९६३३, धर्माबाद ३०२०३, नायगाव ४६१३१, बिलोली ४४९१५, देगलूर ५२५२८, मुखेड ३६१८२, कंधार ६५६६९, लोहा ७०८९६

पीकनिहाय पेरणी क्षेत्र (हेक्टर)

पीक पेरणी क्षेत्र
सोयाबीन  ३६६२०८
कपाशी २३०६१२
तूर  ७११४४
मूग २२७६५
उडीद २२६५६
भात   ८९९
ज्वारी   ३५४६१
मका ११७५
तीळ ३९६
कारळ  २९९
सूर्यफूल ११

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com