नांदेड जिल्ह्यात शेततळ्यांमुळे खरीप उत्पादनात वाढ

शेततळ्यांमुळे खरीप पिकांच्या उत्पादनात वाढ
शेततळ्यांमुळे खरीप पिकांच्या उत्पादनात वाढ

नांदेड ः नांदेड जिल्ह्यात मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत २ हजार ४४ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. शेततळ्यातील संरक्षित पाणीसाठ्यामुळे पावसाच्या खंड काळात अनेक शेतकऱ्यांना खरीप पिकांना पाणी देता आले. त्यामुळे उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांचा फायदा झाला. या संदर्भात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी माहिती दिली.

नांदेड जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ९५५ मिमी आहे, परंतु गेल्या काही वर्षांपासून अनियमित, अपुरा पाऊस तसेच प्रदीर्घ खंडकाळ यामुळे शेती पिकांच्या उत्पादनामध्ये मोठी घट येत आहे. कमी पावसामुळे दुष्काळी स्थिती उद्भभवत आहे. दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी विशेषतः पावसाच्या खंड काळात पिकांच्या वाढीच्या तसेच परिपक्वतेच्या अवस्थेत पिकांना संरक्षित सिंचन देण्यासाठी मागेल त्याला शेततळे योजना ही लाभदायक ठरत आहे. या शेततळ्यांमुळे पावसाच्या पाण्याचा उपयोग संरक्षित सिंचन, फलोत्पादन व पूरक कृषी उद्योगासाठी (मत्स्योत्पादन) होतो. शेततळे कार्यक्रमाचा विविध विस्तार योजनांशी सांगड घालून संरक्षित सिंचनामुळे पिकाचे उत्पादनात वाढ होत आहे.

मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यामध्ये ४ हजार शेततळ्यांची कामे करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातून ११ हजार ८१३ अर्ज आले होते. त्यापैकी ७ हजार ८०१ शेतकऱ्यांचे अर्ज पात्र ठरले. पात्र अर्जांपैकी ६ हजार ५२३ शेततळ्यांचे कार्यारंभ आदेश देण्यात आले होते. आजवर २ हजार ४४ शेतकऱ्यांच्या शेततळ्याची कामे पूर्ण झाली आहेत.रामपूर प. शहापूर (ता. देगलूर) येथील शेतकरी विजय कोकणे यांनी २०१८ च्या मे महिन्यामध्ये मध्ये शेततळ्याचे काम पूर्ण केले. खरीप हंगामामध्ये कोकणे यांना ५ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी केली. परंतु जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये पाण्याचा ताण बसला. या परिस्थिती त्यांनी शेततळ्यामधून पाणी दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com