नांदेड जिल्ह्यात बॅंकांकडून ३२.१२ टक्केच पीक कर्जवाटप

नांदेड : जिल्ह्यातील बॅंकांची शेतकऱ्यांना पीक कर्जवाटप करण्याबाबतची उदासिनता कायम आहे. गेल्या पाच महिन्याच्या कालावधीत उद्दिष्टाच्या केवळ ३२.१२ टक्के पीक कर्जवाटप करण्यात आले.
 In Nanded district, only 32.12 per cent crop loan was disbursed by banks
In Nanded district, only 32.12 per cent crop loan was disbursed by banks

नांदेड : रब्बी हंगाम जवळ येऊन ठेपलेला असतांना खरिप पीक कर्जाचे वाटप करण्यासाठी महिनाभराचा कालावधी शिल्लक आहे. जिल्ह्यातील बॅंकांची शेतकऱ्यांना पीक कर्जवाटप करण्याबाबतची उदासिनता कायम आहे. गेल्या पाच महिन्याच्या कालावधीत उद्दिष्टाच्या केवळ ३२.१२ टक्के पीक कर्जवाटप करण्यात आले.

केवळ जिल्हा बॅंकेने १४०.४७ टक्के पीक कर्जवाटप केले. महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेने ५९.७१ टक्के वाटप केले. तर राष्ट्रीयकृत (व्यापारी) आणि खाजगी बॅंका अत्यंत पिछाडीवर आहेत. या बॅंकानी केवळ १२.७८ टक्के वाटप केले. कोरोना साथीमुळे बॅंकांमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी यंदा पीककर्ज मागणीसाठी २ लाख ६८ हजार शेतकऱ्यांनी अर्ज केले.

विविध क्षेत्रातील बॅंकांनी मिळून बुधवार (ता.२६) पर्यंत एकूण १ लाख ५ हजार २८८  शेतकऱ्यांना ६३२ कोटी १६ लाख ९ हजार रुपये (३१.१२ टक्के) पीक कर्जवाटप केले. अजून १ लाख ६२ हजार ७१२ शेतकरी अद्याप पीककर्जापासून वंचित आहेत. दरम्यान, गेल्या आठवडाभरात १७ हजार ७२५ शेतकऱ्यांना ११५ कोटी ९९ लाख ३८ हजार रुपये वाटप केले. 

यंदा सर्व बॅंकांना एकूण २ हजार ३१ कोटी ६७ लाख ७० हजार रुपयांचे पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट आहे. त्यात जिल्हा बॅंकेला १८५ कोटी ७४ लाख ८२ हजार रुपये, व्यापारी बॅंकांना १ हजार ५५७ कोटी ६७ लाख ३८ हजार रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेला २८८ कोटी २५ लाख ५० हजार रुपयांचे उद्दिष्ट आहे.

बुधवार (ता.२६) अखेर जिल्हा बॅंकेने ५५ हजार १७५ शेतकऱ्यांना २६० कोटी ९१ लाख ९८  हजार रुपये, व्यापारी आणि खाजगी बॅंकांनी २३ हजार १६२ शेतकऱ्यांना १९९ कोटी १३  लाख १८ हजार रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेने २६  हजार ९५१ शेतकऱ्यांना १७२ कोटी १० लाख ९३  हजार रुपयांचे वाटप केले. 

चालू थकबाकीदार शेतकऱ्यांना नुतनीकरण करण्यासाठी अनावश्यक कागदपत्राची मागणी करु नये, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. परंतु, अनेक बॅंका त्याकडे कानाडोळा करत आहेत. बॅंकांच्या कार्यपध्दती बद्दल शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. 

चालू बाकी असल्यामुळे कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. यंदा पीककर्जासाठी बॉंन्ड पेपर, अन्य बॅंकांचे नोड्युज आदी कागदापत्रांनी मागणी बॅंकेने केली. तब्बल महिनाभरातनंतर गेल्या आठवड्यात खात्यावर कर्जाची रक्कम जमा केली. -अरुण जाधव, कुडली, ता.देगलूर, जि.नांदेड.

बँकनिहाय पीककर्ज वाटप 

बॅंक उद्दिष्ट वाटप रक्कम (कोटी रूपये) टक्केवारी शेतकरी संख्या
जिल्हा बॅंक  १८५.७४ २६०.९१ १४०.४७  ५५१७५
व्यापारी, खाजगी बॅंका १५५७.६७ १९९.१३  १२.७८ २३१६२
महाराष्ट्र ग्रामीण बॅंक २८८.२५  १७२.१०  ५९.७१ २६९५१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com