In Nanded district, sowing was completed on 80% of the area
In Nanded district, sowing was completed on 80% of the area

नांदेड जिल्ह्यात ८० टक्के क्षेत्रावर पेरणी

नांदेड जिल्ह्यात खरीप हंगामात ६ लाख ८९५ हेक्टरवर (८०.८९ टक्के) पेरणी झाली आहे. प्रमुख पिकांच्या पेरणी क्षेत्रामध्ये सोयाबीनची पेरणी २ लाख ९४ हजार २६५ हेक्टरवर (९५.१२ टक्के) तर कपाशीची लागवड १ लाख ९२ हजार ६३६ हेक्टर (७३.९५ टक्के) झाली आहे,

नांदेड ः नांदेड जिल्ह्यात खरीप हंगामात ६ लाख ८९५ हेक्टरवर (८०.८९ टक्के) पेरणी झाली आहे. प्रमुख पिकांच्या पेरणी क्षेत्रामध्ये सोयाबीनची पेरणी २ लाख ९४ हजार २६५ हेक्टरवर (९५.१२ टक्के) तर कपाशीची लागवड १ लाख ९२ हजार ६३६ हेक्टर (७३.९५ टक्के) झाली आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी दिली.

जिल्ह्यातील खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र ७ लाख ४२ हजार ८६१ हेक्टर आहे. शुक्रवार (ता. ३) पर्यंत भाताची १६९ हेक्टर (१९.७० टक्के), ज्वारीची २१ हजार ३१२ हेक्टर (४०.०२ टक्के), बाजरीची १० हेक्टर (३०.३० टक्के), मक्याची ४७१ हेक्टर (७२.५७ टक्के), तुरीची ५३ हजार ४६९ हेक्टर (८७.९६ टक्के), मुगाची १८ हजार ७२३ हेक्टर (६९.६२ टक्के), उडदाची १९ हजार १७९ हेक्टर (६७.६२ टक्के), तिळाची ३३१ हेक्टर (४१.४३ टक्के), कारळ्याची २१९ हेक्टर (४६.५० टक्के) पेरणी झाली आहे.

जिल्ह्यात तृणधान्याची एकूण २१ हजार ९९९ हेक्टरवर (३९.९७ टक्के), कडधान्याची ९१ हजार ३७१ हेक्टर (७८.४७ टक्के), गळित धान्याची २ लाख ९४ हजार ८८९ हेक्टरवर (९४.८६ टक्के) पेरणी झाली आहे. जिल्ह्यातील सोळा तालुक्यांत खरिपाच्या सर्वसाधारण क्षेत्राच्या ५१.५९ ते १०३.६० टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

तालुकानिहाय पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)
तालुका सर्वसाधारण क्षेत्र पेरणी क्षेत्र पेरणी टक्के
नांदेड २५७३६ १९४०५ ७५.४०
अर्धापूर १९२७१ ९९८१ ५१.७९
मुदखेड १८८२२ ११३४० ६०.२५
हदगाव ८०२२३ ७२७८२ ८५.१८
माहूर ३३८१६ ३२६९९ ९६.७०
किनवट ७७१५६ ६७४०० ८७.३६
हिमायतनगर ३३७९० २८७८२ ८५.१८
भोकर ४७२६९ ३९३५४ ८३.२६
उमरी ३१७१३ २७५०१ ८६.७२
धर्माबाद २७९८१ २८९८७ १०३.६०
नायगाव ४६५४९ २९३९७ ६३.५१
बिलोली ४४८७१ ४१४४३ ९२.३६
देगलूर ५०४१८ ४२७७७ ८५.१४
मुखेड ७५४०९ ४६३८१ ६१.५१
कंधार ६०३४२ ५१३७७ ८५.१४
लोहा ६९४९५ ५११०१ ७३.५३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com