agriculture news in marathi, Nanded district will allot 9,000 land health posters | Agrowon

नांदेड जिल्ह्यात नऊ हजार जमीन आरोग्यपत्रिकांचे होणार वाटप
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 18 जून 2019

नांदेड  : राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत पथदर्शी प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील १६ गावांतील ८ हजार ६४० शेतकऱ्यांची निवड झाली. गावशिवारातील सर्व विहितीखालील क्षेत्राचे माती परीक्षण करून त्यांना ९ हजार ८७ जमीन आरोग्यपत्रिका वितरित करण्यात येतील, अशी माहिती मिळाली. 

नांदेड  : राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत पथदर्शी प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील १६ गावांतील ८ हजार ६४० शेतकऱ्यांची निवड झाली. गावशिवारातील सर्व विहितीखालील क्षेत्राचे माती परीक्षण करून त्यांना ९ हजार ८७ जमीन आरोग्यपत्रिका वितरित करण्यात येतील, अशी माहिती मिळाली. 

या प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील १ गाव, या प्रमाणे एकूण १६ गावांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या १६ गावांतील एकूण खातेदार शेतकऱ्यांची संख्या ८ हजार ६४० आहे. त्यांचे एकूण विहितीखालील क्षेत्र १० हजार ५६६ हेक्टर आहे.
प्रत्येक शेतकऱ्यांच्या गाव शिवारात विविध ठिकाणी विहितीखालील क्षेत्रातून माती नमुने काढण्यात येतील. माती परीक्षणानंतर निवड शेतकऱ्यांना एकूण ९ हजार ८७ जमीन आरोग्यपत्रिका देण्यात येतील. 

नांदेड, अर्धापूर, मुदखेड, लोहा, कंधार, मुखेड, हदगाव, हिमायतनगर, भोकर, उमरी या १० तालुक्यांतील ५ हजार ८२२ शेतकऱ्यांच्या ७ हजार १३ हेक्टर विहितीखालील क्षेत्रातून ६ हजार ८९ मृदा नमुने काढण्यात येतील. या मृदा नमुन्यांचे परीक्षण नांदेड येथील जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी प्रयोगशाळेत केले जाईल.

देगलूर, बिलोली, नायगाव, धर्माबाद, किनवट, माहूर या सहा तालुक्यांतील २ हजार ८१८ शेतकऱ्यांच्या ३ हजार ५५३ हेक्टर क्षेत्रावरून २ हजार ९९८ मृदा नमुने काढण्यात येतील. त्यांचे परीक्षण सगरोळी येथील कृषी विज्ञान केंद्राच्या प्रयोगशाळेत केले जाईल, असे जिल्हा मृद सर्वेक्षण आणि मृदा चाचणी प्रयोगशाळेतील सूत्रांनी सांगितले.

तालुकानिहाय निवडलेल्या गावातील स्थिती

तालुका  गाव शेतकरी विहिती क्षेत्र मृदा नमुने 
नांदेड  किक्कर २८०  २४४ ३१०
अर्धापूर जांभरुन ३०९ ३३३  २८६
मुदखेड  शेंबोली ७००  ६४६ ६८०
लोहा खडकमांजरी ७४२ ६२५   ७४२
कंधार नवघरवाडी २७०  १६५   २७०
मुखेड हंगरगा  ४०५ ५४१ ५१०
हदगाव  बनचिंचोली ९१० १२०० ९१०
हिमायतनगर सरसम बु १४१७ २१६८ १४१७
भोकर भागापूर   ४२०  ६२५ ५९५
उमरी  नागठाणा ३६९ ४६६ ३६९
देगलूर   देगांव बु ६९५ ८८० ६९५
बिलोली सावळी ७८४   ९१४  ७८४
नायगाव श्रंचोली  ३४०  ५४७ ३४०
धर्माबाद  बाभळी  ४८४ ४६० ५३३
किनवट मानसिंग नाईकतांडा २५६ ३५१ २५६
माहूर मेट  २५९   ३९० -

 

टॅग्स

इतर बातम्या
बुलडाणा जिल्ह्यात केवळ ९ टक्के पीक...बुलडाणा ः वऱ्हाडात आजवरची स्थिती पाहली तर...
‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी   : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
ऊन-सावल्यांच्या खेळात पावसाची दडी;...पुणे : मॉन्सून सक्रिय नसल्याने राज्याच्या बहुतांश...
पीकविम्यासाठी आतापर्यंत साडेतीन लाख...पुणे  : पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी चालू...
कमी खर्चात वाइननिर्मितीचे तंत्र विकसित...पुणे : महाराष्ट्र विज्ञान वर्धिनीच्या आघारकर...
नांदेड जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदी डॉ....नांदेड ः नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या...
रस्त्यालगत हरितपट्ट्यांमध्ये मानवी...इंग्लंड आणि वेल्समध्ये दरवर्षी सुमारे ५ लाख...
वादळी वाऱ्याने भोपळा, कारल्याचे मांडव...नाशिक : जिल्ह्यात पावसाने समाधानकारक हजेरी...
वृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापनेबाबत...नाशिक : जागतिक द्राक्ष उत्पादनात नाशिकचा मोठा...
नांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
सांगली जिल्ह्यातील चारा छावण्या सुरू...सांगली ः शासनाच्या निर्णयानुसार १ ऑगस्टपासून चारा...
...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे  ः  केंद्र सरकारच्या वतीने झिरो...
पक्षांतरानंतर रिक्त जागांवर तरुणांना...नगर  : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये...
पुणे विभागात खरिपाचा ३६ टक्के...पुणे  ः जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अजूनही...
‘जलयुक्त’च्या पुरस्काराची गावांना...नगर  ः लोकसहभागातून जलयुक्त शिवार अभियान...
जनजागृतीसाठी अन्नसुरक्षा पंधरवडा...मुंबई  : राज्यात काही ठिकाणी होणारी दूध व...
भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील दूध...भंडारा   ः रेल्वेच्या माध्यमातून नागपूर...
अमरावती जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअमरावती   ः जिल्ह्यातील चौदाही...
समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या आर्थिक...अमरावती  : समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या...