आज महाराष्ट्रातील कोरडवाहू शेतीतील समस्या वाढत आहेत.
बातम्या
नांदेड जिल्ह्यात प्रस्थापितांनी सत्ता राखली
नांदेड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत, यात अनेक ठिकाणी प्रस्थापितांनी सत्ता राखलीय तर काही ठिकाणी सत्तापरिवर्तन झाले आहे. ९०७ ग्रामपंचायतींसाठी मतदान झालेल्या काही ठिकाणचा निवडणूक निकाल हाती येणे बाकी आहे.
नांदेड : नांदेड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत, यात अनेक ठिकाणी प्रस्थापितांनी सत्ता राखलीय तर काही ठिकाणी सत्तापरिवर्तन झाले आहे. ९०७ ग्रामपंचायतींसाठी मतदान झालेल्या काही ठिकाणचा निवडणूक निकाल हाती येणे बाकी आहे.
जिल्ह्यात शुक्रवारी (ता. १५) जानेवारीला ९०७ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक झाली होती. या निवडणुकीचा निकाल सोमवारी (ता. १८) जाहीर झाला. यात अनेक ठिकाणी प्रस्थापितांनी सत्ता राखली आहे. तर काही ठिकाणी सत्तापरिवर्तन झाले आहे. राजकीय पक्षांनीही अनेक ठिकाणी आपली ग्रामपंचायत निवडून आल्याचा दावा केला आहे. यात भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या संस्थानिक आघाड्यांनी आपले सर्वाधिक उमेदवार निवडून आल्याचा दावा केला आहे. दरम्यान सकाळी दहा वाजता सर्व तहसीलच्या ठिकाणी निवडणूक निकालाची प्रक्रिया सुरू झाली. यात अर्ध्या तासानंतर निकाल हाती आले.
चुरस झालेल्या ठिकाणी निकालाकडे लक्ष लागले होते. पावडेवाडी, विष्णुपुरी, मालेगाव, तुप्पा या ग्रामपंचायतीकडे विशेष लक्ष होते. यासोबतच लोहा तालुक्यातील माळाकोळी, कापसी बु., वाका, नायगाव तालुक्यातील बरबडा, मांजरम, नरसी. मुखेड तालुक्यातील मुक्रामाबाद, राजुरा, देगलूर तालुक्यातील खानापूर, हाणेगाव, बिलोली तालुक्यातील कासराळी, सगरोळी, हदगाव तालुक्यातील तामसा, निवघा बाजार, मनाठा, बनचिंचोली आदी ठिकाणी प्रस्थापितांनी सत्ता राखली आहे. दुपारी तीन पर्यंत अनेक गावांचा निकाल बाकी होता. संवेदनशील गावांचा निकाल बाकी ठेवल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. विजयी उमेदवारांनी अनेक ठिकाणी विजयी मिरवणुका काढल्या. तर पराभूत उमेदवार मात्र हिरमुसले होते. दरम्यान शासकीय तंत्रनिकेतनच्या मतमोजनी केंद्रावर जिल्हाधिकारी डॉ. विपीन, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, तहसीलदार श्री. अंबेकर आदींनी भेट देऊन मतदान मतमोजणी प्रक्रियेची पाहणी केली.
- 1 of 1543
- ››