परभणी बाजार समितीमध्ये कापूस दरात सुधारणा
परभणी बाजार समितीमध्ये कापूस दरात सुधारणा

हिंगोली, नांदेड, परभणी बाजार समितीत नवीन हळदीची आवक

हिंगोली ः हिंगोली, नांदेड, परभणी जिल्ह्यातील बाजार समित्याअंतर्गतच्या हळद मार्केटमध्ये यंदाच्या हंगामातील हळदीची आवक सुरू झाली आहे. गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर हळदीचे दर प्रतिक्विंटल १० हजार रुपयेपर्यंत पोचले. मंगळवारी (ता. ९) हळदीचे दर प्रतिक्विंटल ५ हजार ६०० ते ८ हजार ८९५ रुपये होते, असे बाजार समित्यांतील सूत्रांनी सांगितले.

हिंगोली, नांदेड, परभणी जिल्ह्यात सध्या हळद काढणी सुरू आहे. दुष्काळी स्थितीमुळे यंदा हळद उत्पादनात घट येत आहे. या तीन जिल्ह्यतील हळदीच्या प्रमुख बाजारपेठांमध्ये यंदाच्या हंगामातील नवीन हळदीची आवक सुरू झाली आहे. हिंगोली येथील संत नामदेव हळद मार्केटमध्ये हळदीची मोठ्या प्रमाणावर आवक सुरू आहे. त्यामुळे आठवड्यातील सोमवार, बुधवार, शुक्रवार असे तीन दिवस हळदीची आवक घेतली जात आहे.

सोमवारी (ता. ८) हिंगोली येथे हळदीची ३ हजार क्विंटल आवक झाली होती. त्या वेळी प्रतिक्विंटल ६ हजार २५० ते ७ हजार ५ रुपये दर मिळाले. वसमत (जि. हिंगोली) येथील हळद मार्केटमध्ये शनिवारी (ता. ६) गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर हळदीला प्रतिक्विंटल ५ हजार ६०० ते १० हजार २०७ रुपये दर मिळाले. नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुढीपाडव्याला २ हजार ८७४ क्विंटल हळदीची आवक होती. त्या वेळी प्रतिक्विटंल ५ हजार १ ते १० हजार १ रुपये दर मिळाले. सोमवारी (ता. ८) हळदीची ८ हजार क्विंटल आवक झाली असताना प्रतिक्विंटल ६ हजार ५०० ते ८ हजार ८९५ रुपये दर मिळाले, असे सचिव बी. ए. संगेकर यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com