नांदेड, परभणी, हिंगोलीतून पीकविम्याचे १८ लाख प्रस्ताव

नांदेड, परभणी, हिंगोलीतून १८ लाख पीकविमा प्रस्ताव
नांदेड, परभणी, हिंगोलीतून १८ लाख पीकविमा प्रस्ताव

नांदेड ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदा खरीप हंगामात मंगळवारी (ता. ३१) सकाळी सहा वाजेपर्यंत नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील १८ लाख ७७ हजार ८२२ शेतकऱ्यांनी आॅनलाइन पीकविमा प्रस्ताव सादर केले. यासंदर्भात कृषी विभागाच्या सूत्रांनी माहिती दिली. नांदेड जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या १ लाख ५५ हजार २५० ने संख्या जास्त आहे. परभणी, हिंगोली जिल्ह्यात विमा योजनेतील शेतकऱ्यांचा सहभाग कमी आहे.  

पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत यंदा सोमवार (ता. ३०) पर्यंत जनसुविधा केंद्र आणि बॅंकांमध्ये केवळ आॅनलाइन प्रस्ताव स्वीकारण्यात आले. स्वयंघोषणा पीक पेरापत्रक स्वीकारल्यामुळे एक समस्या मार्गी लागली; परंतु आॅनलाइन सातबारा, होल्डिंग प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना तलाठ्यांकडे येरझारा माराव्या लागल्या. जनसुविधा केंद्र सर्व्हर तसेच पीकविमा वेब पोर्टलची गती सुरवातीच्या काळात चांगली होती; परंतु वेब पोर्टलची गती धीमी झाल्यामुळे वैयक्तिकरित्या विमा अर्ज भरता न आल्यामुळे जनसुविधा केंद्रावर गर्दी झाली.;परंतु तेथे सर्व्हर डाउनमुळे वेळ लागला.

नांदेड जिल्ह्यात यंदा मंगळवारी सकाळपर्यंत एकूण ११ लाख २१ हजार ३५७ शेतकऱ्यांनी पीकविमा अर्ज भरले आहेत. गतवर्षी ९ लाख ६६ हजार १०७ शेतकऱ्यांनी पीकविमा भरला होता. यंदा गतवर्षीच्या तुलनेत यंदा पीकविमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या १ लाख ५५ हजार २५० ने जास्त आहे. सध्या नांदेड जिल्ह्याचा बीडनंतर राज्यात दुसरा क्रमांक आहे. परभणी जिल्ह्यात मंगळवारपर्यंत ५ लाख २० हजार ३४१ शेतकऱ्यांनी विमा अर्ज भरले.

गतवर्षी ६ लाख ९७ हजार ७१७ शेतकऱ्यांनी विमा प्रस्ताव दाखल केले होते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा परभणी जिल्ह्यात विमा प्रस्तावांची संख्या १ लाख ७७ हजार ३७६ ने कमी आहे. हिंगोली जिल्ह्यातील २ लाख ३६ हजार १२४ शेतकऱ्यांनी पीकविमा प्रस्ताव सादर केले. गतवर्षी २ लाख ५३ हजार २०६ शेतकऱ्यांनी विमा प्रस्ताव भरले होते. गतवर्षीच्या तुलनेत सध्या विमा अर्ज भरलेल्या शेतकऱ्यांची संख्या १७ हजार ८२ ने कमी आहे. या तीन जिल्ह्यांत एकूण १८ लाख ७७ हजार ८२२ शेतकऱ्यांनी विमा प्रस्ताव भरले आहेत. गतवर्षी १९ लाख १७ हजार ३० शेतकरी पीकविमा योजनेत सहभागी झाले होते.

आॅनलाइन सातबारा, होल्डिंग प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे तलाठ्याकडे गर्दी झाल्याने चकरा माराव्या लागल्या. त्यानंतर ई-सेवा केंद्रावर सर्व्हर चालत नसल्याने खूप वेळ लागला. चार ते पाच दिवस येरझाऱ्या मारून सोयाबीनचा विमा अर्ज भरला. अजून बरेच शेतकरी विमा भरायचे राहिले आहेत. त्यांच्यासाठी मुदतवाढ देणे आवश्यक आहे. - ज्ञानेश्वर माटे, अर्धापूर, जि. नांदेड

गतवर्षी आमच्या भागात नुकसान होऊनही परतावा न मिळाल्यामुळे यंदा विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण कमी आहे. जनसुविधा केंद्रावर सर्व्हरच्या समस्येमुळे पीकविमा भरण्यासाठी तीन दिवस लागले. - बालासाहेब हिंगे, मजलापूर, जि. परभणी.

जुलैच्या सुरवातीलाच सोयाबीन, कपाशीचे विमा अर्ज भरले. त्यामुळे अडचणी आल्या नाहीत. - सुभाष डुकरे, विरेगाव, जि. हिंगोली

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com