नांदेड, परभणी, हिंगोलीमधील मतदारसंघांत २२० उमेदवार रिंगणात

नांदेड, परभणी, हिंगोलीमधील मतदारसंघांत २२० उमेदवार रिंगणात
नांदेड, परभणी, हिंगोलीमधील मतदारसंघांत २२० उमेदवार रिंगणात

नांदेड ः विधानसभा निवडणुकीसाठी नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील १६ मतदारसंघातील २४२ उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे एकूण २२० उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत.

नांदेड जिल्ह्यातील ९ मतदारसंघात छाननीनंतर एकूण ३२७ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. परंतु, १९३ उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे आता एकूण १३४ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. किनवट मतदारसंघात २५ पैकी १० जणांनी माघार घेतली असून एकूण १५ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. हदगाव मतदासंघात ३० पैकी १५ जणांनी माघार घेतल्याने १५ उमेदवार राहिले आहेत. भोकर मतदारसंघात ९१ पैकी ८४ जणांनी माघार घेतल्यामुळे आता ७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. 

नांदेड उत्तर मतदारसंघात ५६ पैकी ३२ जणांनी माघार घेतल्यामुळे २४ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. नांदेड दक्षिण मतदारसंघात ६२ पैकी २४ जणांनी माघार घेतली असून ३८ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. लोहा मतदारसंघात २१ पैकी ११ जणांनी माघार घेतली असून १० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. नायगाव मतदारसंघात १९ पैकी ८ जणांनी माघार घेतल्यामुळे ११ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. देगलूर मतदारसंघात १४ पैकी ५ जणांनी माघार घेतल्यामुळे ९ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. मुखेड मतदारसंघात ९ पैकी ४ जणांनी माघार घेतल्याने ५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

परभणी जिल्‍ह्यातील चार विधानसभा मतदारसंघातील एकूण ८१ उमेदवारांपैकी २८ उमेदवारांनी माघार घेतली असून ५३ उमेदवार निवडणुकीच्‍या रिंगणात आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी परभणी जिल्ह्यातील जिल्‍ह्यातील ४ मतदारसंघात एकूण ८१ पैकी ५३ उमेदवार निवडणुकीच्‍या रिंगणात राहिले आहेत. जिंतूर मतदारसंघातील १७ उमेदवारांपैकी ४ उमेदवारांनी माघार घेतली असून १३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. परभणी मतदारसंघातील एकूण २७ पैकी १२ उमेदवारांनी माघार घेतली असून १५ उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. गंगाखेड मतदारसंघातील एकूण २३ पैकी ८ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले असून एकूण १५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. 

पाथरी- मतदारसंघातील एकूण १४ पैकी ४ उमेदवारांनी माघार घेतली असून एकूण १० उमेदवार निवडणूक लढवणार आहेत.    हिंगोली जिल्ह्यातील ३ मतदारसंघातील ५४ पैकी २१ उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे ३३ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. हिंगोली मतदारसंघात १६ पैकी २ जणांनी माघार घेतल्यामुळे १४ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. कळमनुरी मतदारसंघात १७ पैकी १० जणांनी माघार घेतल्यामुळे ७ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. 

वसमत मतदासंघात २१ पैकी ९ जणांनी माघार घेतल्यामुळे १२ जण रिंगणात आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण निवडणूक लढवत असलेल्या भोकर मतदासंघात ९१ उमेदवाराचे अर्ज वैध ठरले होते. परंतु, ८४ उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे आता ७ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. वसमतमध्ये २१ पैकी ९ जणांनी माघार घेतल्यामुळे १२ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com