नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत पीकविम्याचे २३ लाख ३० हजारांवर प्रस्ताव

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत पीकविम्याचे २३ लाख ३० हजारांवर प्रस्ताव
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत पीकविम्याचे २३ लाख ३० हजारांवर प्रस्ताव

नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेतंर्गत यंदाच्या खरीप हंगामामध्ये नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी २३ लाख ३० हजार ४५६ पीकविमा प्रस्ताव सादर केले. या तीन जिल्ह्यांतील एकूण ११ लाख ४० हजार २०६ हेक्टरवरील पिकांसाठी ५४५ कोटी ३२ लाख ३६ हजार ९२३ रुपये एवढे विमा संरक्षण घेतले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी एकूण ९४ कोटी ५ लाख ४९ हजार २६ रुपये एवढा विमा हप्ता भरला.

विमा संरक्षण घेण्यासाठी सुरवातीला २४ जुलैपर्यंतची मुदत होती. त्यानंतर दोनवेळा मुदत वाढ देण्यात आली. गुरुवार (ता. ३१)अंतिम मुदत होती. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जनसुविधा केंद्रांवर ११ लाख ७३ हजार २२०, बॅंकामध्ये ११ हजार ७१६ कर्जदार आणि २९६ बिगरकर्जदार शेतकऱ्यांनी, पीकविमा पोर्टवर शेतकऱ्यांनी २९२ पीकविमा प्रस्ताव सादर केले.

सर्व ठिकाणचे मिळून एकूण ११ लाख ८५ हजार ५२४ प्रस्ताव सादर करण्यात आले. एकूण ५ लाख ७३ हजार ९४४.७५ हेक्टरवरील पिकांसाठी २५६ कोटी ७० लाख १४ हजार ५२ रुपयांचे विमा संरक्षण घेतले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी ४८ कोटी ५१ लाख १६ हजार ७४४ रुपयांचा विमा हप्ता भरला.

परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकूण ८ लाख ५ हजार ६२ पीकविमा प्रस्ताव सादर केले. एकूण ४ लाख १५ हजार ४३५ हेक्टरवरील पिकांसाठी १८९ कोटी २१ लाख ९५ हजार ३९४ रुपयांचे संरक्षण घेतले. त्यासाठी ३२ कोटी ७५ लाख ८१ हजार ९४३ रुपयांचा विमा हप्ता भरला. 

हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकूण ३ लाख ३९ हजार ३३० पीकविमा प्रस्ताव सादर केले. यामध्ये जनसुविधा केंद्रांवर ३ लाख २० हजार २९४, बॅंकांमध्ये कर्जदार शेतकऱ्यांनी १६ हजार ४४ प्रस्ताव सादर केले. एकूण १ लाख ५० हजार ८२६ हेक्टवरील पिकांसाठी ९७ कोटी ४० लाख २७ हजार ४७६ रुपयांचे विमा संरक्षण घेतले. त्यासाठी शेतकऱ्यांनी १२ कोटी ७८ लाख ४० हजार ३३९ रुपये विमा हप्ता भरला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com