Agriculture news in marathi Nanded, Parbhani and Hingoli Districts with guaranteed purchase of tour 66 thousand quintal | Agrowon

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत हमीभावाने ६६ हजारांवर क्विंटल तुरीची खरेदी

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 24 मार्च 2020

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये २३ खरेदी केंद्रांवर शुक्रवार(ता. २०)पर्यंत एकूण ९ हजार १६४ शेतकऱ्यांची ६६ हजार ७२ क्विंटल एवढ्या तुरीची खरेदी करण्यात आली आहे. 

नांदेड : केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत हमीभावाने राज्य सहकारी पणन महासंघ आणि विदर्भ सहकारी पणन महासंघ अंतर्गत नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये २३ खरेदी केंद्रांवर शुक्रवार(ता. २०)पर्यंत एकूण ९ हजार १६४ शेतकऱ्यांची ६६ हजार ७२ क्विंटल एवढ्या तुरीची खरेदी करण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी खरेदी केंद्रावरील गर्दी कमी करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.

प्रत्येक केंद्रावरून दररोज ५ ते १० शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे केंद्रांवर तूर घेऊन येण्यासाठी सांगितले जात आहे. त्यामुळे तूर खरेदीची गती काहीशी मंदावली आहे, असे सूत्रांनी सांगितले.

नांदेड जिल्ह्यात जिल्हा पणन अधिकारी कार्यालयाअंतर्गत नांदेड, हदगाव, किनवट, मुखेड येथील केंद्रावर आणि विदर्भ सहकारी महासंघाच्या भोकर, धर्माबाद, नायगाव येथील केंद्रावर तूर खरेदी केली जात आहे. जिल्हा पणन अधिकारी कार्यालयाअंतर्गत ८ हजार ७८७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. शुक्रवार (ता. २०) पर्यंत २ हजार २३४ शेतकऱ्यांची ९ हजार ९१९.९५ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली, असे जिल्हा विपणन अधिकारी सुधीर पाटील यांनी 
सांगितले. 

जिल्ह्यात विदर्भ सहकारी पणन महासंघातर्फे १ हजार ५३४ शेतकऱ्यांची ७ हजार ५८९.५ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. राज्य सहकारी पणन महासंघअंतर्गत जिल्हा पणन अधिकारी कार्यालयातर्फे परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, सेलू, पाथरी, सोनपेठ, पालम, पूर्णा या सात केंद्रावर मिळून एकूण २२ हजार ४३४ शेतकऱ्यांनी आणि हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कन्हेरगाव, कळमनुरी, वसमत, जवळाबाजार, सेनगाव, साखरा येथील केंद्रांवर मिळून एकूण १३ हजार ९४७ शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली आहे. 

पणन अधिकारी कार्यालयाअंतर्गत परभणी जिल्ह्यात १ हजार २८५ शेतकऱ्यांची ११ हजार ८८३.५७ क्विंटल आणि हिंगोली जिल्ह्यात २ हजार ३९७ शेतकऱ्यांची २३ हजार ५७५.९० क्विंटल तूर खरेदी करण्यात आली असे जिल्हा विपणन अधिकारी मिलिंद कापुरे यांनी सांगितले.
विदर्भ सहकारी महासंघातर्फे परभणी जिल्ह्यातील मानवत आणि गंगाखेड येथील केंद्रावर मिळून एकूण १ हजार ७१४ शेतकऱ्यांची १३ हजार १०४ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली, असे जिल्हा व्यवस्थापक भागवत सोळंके यांनी सांगितले.

खुल्या बाजारातील तुरीचे दर कमी आहेत. त्यामुळे हमीभाव खरेदी केंद्रांवर तूर विक्री करण्यासाठी तीन जिल्ह्यांतील ३५ हजारांवर शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली आहे. आजवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी ८० ते ९० शेतकऱ्यांना दररोज एसएमएस पाठवून खरेदी केंद्रांवर तूर आणण्यास सांगितले जात असे, परंतु कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येक केंद्रावरून दररोज ५ ते १० शेतकऱ्यांना एसएमएस पाठविले जात आहेत, असे सूत्रांनी सांगितले 

हरभरा विक्रीसाठी चार हजारांवर नोंदणी

हमीभावाने हरभरा खरेदीसाठी शेतकऱ्यांची आॅनलाइन नोंदणी सुरू झाली आहे. या तीन जिल्ह्यांत ४ हजार १२२ शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीसाठी नोंदणी केली आहे. हरभऱ्याची उत्पादकता जाहीर करण्यात आली आहे. पुढील महिन्यात खरेदी सुरू होऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.

जिल्हानिहाय हमीभाव तूर खरेदी स्थिती (क्विंटलमध्ये)

जिल्हा  तूर खरेदी शेतकरी संख्या
नांदेड १७५०९.४५ ३७६८
परभणी  २४९८७.५७ २९९९
हिंगोली २३५७५.९०  २३९७

 


इतर ताज्या घडामोडी
दिवे लावण्यापेक्षा पंतप्रधानांनी आशेचा ...मुंबई: दिवे लावण्यापेक्षा पंतप्रधानांनी आशेचा...
विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची ओवाळली आरतीअकोला ः ग्रामीण भागात ‘कोरोना’ची धास्ती वाढलेली...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात केळी...नांदेड : लॅाकडाऊनमुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे....
मुंबई बाजार समितीत फळांची आवक वाढली मुंबई : जीवनावश्यक वस्तूंचा योग्य पुरवठा व्हावा,...
आंब्याची वाहतूक, वितरण व्यवस्थेतील...मुंबई : एप्रिलपासून आंब्याचा हंगाम सुरू झाला आहे...
कोल्हापुरात वाहतुक बंदीचा रेशीम कोषाला...कोल्हापूर : वाहतूक बंद असल्यामुळे शेतकऱ्यांचे...
मुख्यमंत्री साहायता निधीसाठी ‘कृषी’च्या...नाशिक: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे...
खानदेशात कडब्याच्या दरांवर दबाव जळगाव : खानदेशातून परराज्यासह इतर जिल्ह्यांत कडबा...
मदत व पुनर्वसन मंत्री देणार ४० हजार...चंद्रपूर ः खऱ्या अर्थाने पालकत्वाची जबाबदारी पार...
खानदेशात धान्याची शिवार खरेदी, मार्केट...जळगाव : खानदेशात धान्याची शिवार खरेदी बंद आहे....
भंडारा बॅंक देणार १५ एप्रिलपासून...भंडारा ः ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव...
नंदुरबार जिल्ह्यात पपईची कवडीमोल दराने...नंदुरबार : लॉकडाऊनचा फटका सर्वसामान्य...
जळगाव जिल्ह्यातील बॅंका पीक कर्ज...जळगाव : जिल्ह्यात अपवाद वगळता बॅंकांनी नव्याने...
हिंगोलीत एका व्यक्तीचा कोरोना चाचणी...हिंगोली : हिंगोली येथील जिल्हा रुग्णालयात भरती...
शब-ए-बारात, डॉ. आंबेडकर जयंतीला घरुनच...मुंबईः सध्या ‘कोरोना’ने सर्वत्र धुमाकूळ घातला...
खासगी डेअरीची संकलन यंत्रणा तोकडी;...नांदेड ः ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी...
नाशिक बाजार समितीमध्ये केवळ लिलावाला...नाशिक : ‘कोरोना’ विषाणूच्या वाढत्या...
पुणे, मुंबईत भाजीपाल्याची घरपोच सुविधा पुणे ः शहरातील नागरिकांसाठी भाजीपाला पुरवठा...
पुसदमध्ये शेतकरी कंपन्यांतर्फे...यवतमाळ : ‘लॉकडाऊन’च्या पार्श्‍वभूमीवर पुसद येथे...
लातूर जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक...चापोली, जि. लातूर : ‘कोरोना’चा फैलाव...