Agriculture news in marathi, Nanded, Parbhani and Hingoli districts hit cotton growers | Agrowon

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत कमी दरामुळे कापूस उत्पादकांना फटका

टीम अॅग्रोवन
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

नांदेड : पावसामुळे नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील वेचणीस आलेला कापूस भिजला. त्यामुळे ओलाव्याचे प्रमाण जास्त राहिले. परिणामी किरकोळ व्यापारी आधारभूत किंमत दरापेक्षा दोन ते अडीच हजार रुपये कमी दराने त्याची खरेदी करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये जाहीर लिलाव पध्दतीने, तसेच कापूस उत्पादक पणन महासंघ, भारतीय कापूस महामंडळाकडून (सीसीआय) अद्याप कापूस खरेदी सुरू झालेली नाही. त्यामुळे अतिवृष्टीच्या नैसर्गिक संकटानंतर आता कमी दराचा फटका कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे.

नांदेड : पावसामुळे नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील वेचणीस आलेला कापूस भिजला. त्यामुळे ओलाव्याचे प्रमाण जास्त राहिले. परिणामी किरकोळ व्यापारी आधारभूत किंमत दरापेक्षा दोन ते अडीच हजार रुपये कमी दराने त्याची खरेदी करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये जाहीर लिलाव पध्दतीने, तसेच कापूस उत्पादक पणन महासंघ, भारतीय कापूस महामंडळाकडून (सीसीआय) अद्याप कापूस खरेदी सुरू झालेली नाही. त्यामुळे अतिवृष्टीच्या नैसर्गिक संकटानंतर आता कमी दराचा फटका कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे.

यंदा नांदेड जिल्ह्यात २ लाख ३१ हजार ८१० हेक्टर, परभणी जिल्ह्यात २ लाख २ हजार ३१६ हेक्टर, हिंगोलीत ४७ हजार ८२४ हेक्टरवर कपाशीची लागवड झाली. मध्यम धाग्याच्या कापसाला प्रतिक्विंटल ५ हजार २५५ रुपये, तर लांब धाग्याच्या कापसाला प्रतिक्विंटल ५ हजार ५५० रुपयांचा दर हमाभावानुसार जाहीर करण्यात आला.

ऑक्टोबर महिन्यात सुरुवातीला खुल्या बाजारातील दर हमीभावापेक्षा दीड ते दोन हजार रुपयांनी कमी होते. परंतु, त्यानंतर बोंडातून फुटलेला कापूस पावसात भिजला. त्यामुळे सरकीला मोड फुटले. कापसाचे धागे पिवळे पडल्यामुळे दर्जा खालावला. वेचलेला कापूस उन्हात वाळवावा लागत आहे. त्यामुळे वजनात घट येत आहे. सर्वच बाजारापेठांतील किरकोळ व्यापाऱ्यांकडून कमी दर मिळतो आहे. 

खुल्या बाजारातील दर कमी असल्यामुळे पणन महासंघाच्या खरेदीला यंदा प्रतिसाद मिळू शकेल, असे सांगितले जात आहे. गेल्या आठवडाभरापासून पावसाने उघडीप दिली आहे. तरी अद्याप शासकीय खरेदीसाठी हालचाली सुरू नसल्याचे चित्र आहे.
पणन महासंघातर्फे नांदेड जिल्ह्यात भोकर आणि तामसा, परभणी जिल्ह्यांत गंगाखेड, हिंगोली जिल्ह्यांत हिंगोली येथे खरेदी केंद्र प्रस्तावित आहेत.

यंदा आणखीन काही ठिकाणी खरेदी केंद्र सुरू होऊ शकतात. ‘सीसीआय’चे नांदेड जिल्ह्यात नांदेड, किनवट, धर्माबाद, नायगाव येथे, परभणी जिल्ह्यात जिंतूर, सेलू, मानवत, सोनपेठ, ताडकळस, पूर्णा येथे, हिंगोली जिल्ह्यात वसमत, जवळा बाजार, आखाडा बाळापूर येथे ही केंद्रे प्रस्तावित आहेत. परंतु, महासंघातर्फे हमीभावाने खरेदी सुरू नसल्यामुळे खुल्या बाजारातील व्यापारी दर पाडून खरेदी करत आहेत. त्याचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे.


इतर बातम्या
कृषी, पणन कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत...पुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर केलेल्या कृषी...
मोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या ह्रदयावर...नवी दिल्ली : कृषी सुधारणा कायद्यांविरोधात...
कृषी कायद्यांविरोधात सर्व आघाड्यांवर...चंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना...
काळा पैसा बंद झाल्याने त्यांचा विरोध; ...नवी दिल्ली : ‘‘कृषी सुधारणा कायद्यांमुळे...
कृषी कायदे झुगारून लावा; काँग्रेसशासित...नवी दिल्ली   ः काँग्रेसशासित राज्यांनी...
नगर जिल्ह्यात पीक नुकसानीचे पंचनामे...नगर  ः महिनाभर सतत पाऊस पडल्याने जिल्ह्यातील...
पुणे विभागात एक लाख ३८ हजार हेक्टरवर...पुणे  ः यंदा वेळेवर पाऊस झाल्याने चारा...
पावसाचा नगरमधील १७ हजार कांदा...नगर  ः गेल्या महिनाभरात झालेल्या सततच्या...
नुकसानीबाबत परभणीतील सहा हजारांवर ...परभणी : अतिवृष्टी तसेच नाले, ओढे, नद्यांच्या...
 पावसाची विश्रांती; सिंधुदुर्गात भात...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात पावसाने विश्रांती...
पानपिंपरी, विड्याच्या पानाला...बुलडाणा  ः पानपिंपरी व विड्याचे पानमळे हे...
जत तालुक्यातील सात गावांमधील ...सांगली  ः जत तालुक्यातील सात गावांमधील...
अकोला जिल्ह्यात ८७ हजार हेक्टरवर हरभरा...अकोला  ः यंदा समाधानकारक पावसामुळे सर्वच...
सोयाबीनची उद्यापासून ऑनलाइन नोंदणीमुंबई : खरीप हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत...
हमीभावाने उडीद खरेदीही उद्यापासूनमुंबई : हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत किंमत...
ऊस वाहतूक दरात ५० टक्के वाढ द्या : ...कोल्हापूर : ऊस वाहतुकीच्या दरात ५० टक्के वाढ...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची...पुणे : गेल्या काही दिवसापासून पावसाने...
शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा :...मुंबई : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी...
कृषी विधेयकाआधीही शेतकरी स्वतः माल विकू...सोलापूर  ः केंद्र सरकारने आणलेल्या कृषी...
राहुरी विद्यापीठाच्या बदली सत्रात...पुणे : महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठात...