नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत २०१७ आणि २०१८ या सलग दोन वर्षांच्या खंडानंतर यंदाच्या (२०१९) सप्टेंबर महिन्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. रब्बी पिकांच्या पेरणीसाठी जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा निर्माण झाला आहे. अनेक मंडळांतील विहिरींच्या पाणीपातळीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा गतवर्षीच्या तुलनेत रब्बी पिकांखालील क्षेत्रात वाढ अपेक्षित आहे.

यंदाच्या पावसाळ्यातील जून, जुलै, ऑगस्ट या पहिल्या तीन महिन्यांत नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला होता. परंतु, सप्टेंबर महिन्यामध्ये अनेक मंडळांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस झाल्यामुळे सप्टेंबर महिन्यात अपेक्षित सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.

पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे लघू, मध्यम, मोठ्या प्रकल्पांच्या जलाशयामध्ये उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला. ओढे, नाले, नद्या प्रवाहित झाले. बंधाऱ्यामध्ये पाणीसाठा जमा झाला. विहिरी, बोअरच्या पाणीपातळीत वाढ झाली. त्यामुळे सिंचनासाठी पाणी उपलब्ध झालेल्या भागात तसेच जमिनीत पुरेसा ओलावा उपलब्ध झाल्यामुळे रब्बी पिकांखालील क्षेत्रात वाढ होणार आहे. 

यंदाच्या सप्टेंबर महिन्यात नांदेड जिल्ह्यात सरासरीपेक्षा ८८.६२ मिलिमीटर, परभणी जिल्ह्यात सरासरीपेक्षा ८२.१७ मिलिमीटर, हिंगोली जिल्ह्यात सरासरीपेक्षा ५७.०४ मिलिमीटर जास्त पाऊस झाला आहे.

नांदेड जिल्ह्याची सप्टेंबर महिन्याची पावसाची सरासरी १९७.२ मिलिमीटर आहे. परंतु यंदाच्या सप्टेंबर महिन्यात एकूण सरासरी २८५.८२ मिलिमीटर तर यंदाच्या पावसाळ्यात सप्टेंबरअखेर एकूण ८०६.५ मिलिमीटर म्हणजेच आजवर अपेक्षित सरासरी पावसाच्या ९१.२९ टक्के तर वार्षिक सरासरीच्या ८४.८४ टक्के पाऊस झाला.

परभणी जिल्ह्याची सप्टेंबर महिन्यातील पावसाची सरासरी १८०.७४ मिलिमीटर आहे. परंतु यंदा पावसाने शुक्रवारी (ता. २०) सप्टेंबर महिन्यातील सरासरी ओलांडली. यंदाच्या सप्टेंबर महिन्यात एकूण २६२.९१ मिलिमीटर (१४५.५ टक्के) पाऊस झाला आहे. आजवर अपेक्षित पावसाच्या सरासरीच्या ७९ टक्के तर वार्षिक सरासरीच्या ७४ टक्के पाऊस झाला आहे.

हिंगोली जिल्ह्याची सप्टेंबर महिन्यातील पावसाची सरासरी १६०.१ मिलिमीटर आहे. परंतु यंदाच्या सप्टेंबर महिन्यात एकूण सरासरी २१७.१४ मिलिमीटर पाऊस झाला. यंदाच्या पावसाळ्यात सप्टेंबरअखेरपर्यंत ६२५.०७ मिलिमीटर पाऊस झाला. यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात सप्टेंबरअखेरपर्यंत ६२५.०७ मिलिमीटर झाला. आजवर तसेच वार्षिक सरासरीच्या ७०.०१ टक्के पाऊस झाला. यापूर्वी या तीन जिल्ह्यात २०१६ मधील सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला होता. 

सप्टेंबर महिन्यातील तुलनात्मक पाऊस (मिलिमीटरमध्ये)

जिल्हा सरसरी २०१६ २०१७ २०१८ २०१९
नांदेड १९७.२ ३०१ ६५.३१ ४२.६  २८५.८२
परभणी १८०.७४ ३१४.७ ८८.३  २१.८ २६२.९१
हिंगोली १६०.१ २१६.७ ९७ ७.१ २१७.१४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com