नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात यंदा जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. पुरेशा पावसाअभावी जमिनीत ओलावा नसल्याने या जिल्ह्यांतील खरिपाच्या पेरण्या रखडल्या आहेत. पाणीटंचाई , जनावरांच्या चाऱ्याची समस्या कायम आहे. गतवर्षी (२०१८) च्या जून महिन्यात या तीन जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला होता.

नांदेड जिल्ह्याची जून महिन्याची पावसाची सरासरी १६४.८ मिलिमीटर आहे. यंदाच्या जून महिन्यात प्रत्यक्षात सरासरी ६९.३१ मिलिमीटर (४२.०५ टक्के) आहे. गतवर्षी (२०१८) च्या जून महिन्यात जिल्ह्यात सरासरी २५४.७ मिलिमीटर (१५४.२ टक्के) पाऊस झाला होता.

परभणी जिल्ह्याची जूनमधील पावसाची सरासरी १२६.६ मिलिमीटर आहे. प्रत्यक्षात ७८.९६ मिलिमीटर (६२.४टक्के) पाऊस झाला. गतवर्षी तो १६९.२५ मिलिमीटर (१३३.६ टक्के) इतका होता.  हिंगोलीची जून महिन्याची पावसाची सरासरी १६८.५ मिलिमीटर आहे. यंदा प्रत्यक्षात ६७.५४ मिलिमीटर (४० टक्के) पाऊस झाला. गतवर्षी (२०१८) जून महिन्यात २४२.४२ मिलिमीटर (१५४ टक्के) पाऊस होता

नांदेड, हिंगोली जिल्ह्यांत पाऊस

 नांदेड, हिंगोली जिल्ह्यांतील १० तालुक्यांत सोमवारी (ता. १) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस झाला. परभणी जिल्ह्यात मात्र बहुतांश भागात उघडीप होती. या तीन जिल्ह्यांतील काही मंडळे वगळता बहुतांश भागात अद्याप मोठा पाऊस झाला नसल्याची स्थिती आहे.  

जमिनीत अजून पुरेशा प्रमाणात ओलावा नाही. परंतु गेल्या काही दिवसांपासून पावसाळी वातावरण आहे. पावसाच्या आशेवर शेतकऱ्यांनी मूग, सोयाबीन, तूर, उडीद आदी पिकांची पेरणी सुरू केली आहे. हळद लागवडही सुरू झाली आहे. सोमवारी (ता. १) सकाळी आठपर्यंत नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, मुदखेड, भोकर, हिमायतनगर, हदगाव, माहूर, किनवट या तालुक्यांत हलका ते मध्यम पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, वसमतमध्ये पाऊस झाला.

जूनमधील तुलनात्मक पर्जन्यमान (मि.मी)

जिल्हा सरासरी  २०१८ २०१९
नांदेड १६४.८ २५४.७ ६९.३१
परभणी १२६.६  १६९.२४ ७८.९६
हिंगोली १६८.५ २४२.४  ६७.५४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com