नांदेड, परभणी, हिंगोलीत यंदा ७१४ क्विंटल रेशीम कोष उत्पादन

नांदेड, परभणी, हिंगोलीत यंदा ७१४ क्विंटल रेशीम कोष उत्पादन
नांदेड, परभणी, हिंगोलीत यंदा ७१४ क्विंटल रेशीम कोष उत्पादन

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत १ लाख ३६ हजार ४०० अंडीपुंजांपासून शेतकऱ्यांनी ७१४ क्विंटल ३४ किलो रेशीम कोष उत्पादन घेतले आहे. गतवर्षीच्या दुष्काळी स्थितीत पाणी कमी पडल्यामुळे या तीन जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना ८४० एकरांवर तुती लागवड मोडून टाकावी लागली. सध्या या तीन जिल्ह्यांत नवी, जुनी मिळून एकूण १९७१ एकरांवर तुती लागवड आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

नांदेड जिल्ह्यात २७७ शेतकऱ्यांनी ३२५ एकरांवर नवीन तुती लागवड केली आहे. ५१९ शेतकऱ्यांची ६३८ एकरांवर जुनी तुती लागवड आहे. दुष्काळामुळे १९५ एकरांवरील तुती लागवड मोडून टाकण्यात आली. सध्या ७९६ शेतकऱ्यांकडे ९६३ एकरांवर तुती लागवड आहे.

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहित ७८ हजार २५० अंडीपुंजापासून शेतकऱ्यांनी ४४९ क्विंटल ८४ किलो रेशीम कोष उत्पादन घेतले आहे. परभणी जिल्ह्यातील जुनी आणि नवी मिळून ४६५ एकरांवर तुती लागवड आहे. दुष्काळात ५२० एकरांवरील तुती लागवड शेतकऱ्यांनी मोडून टाकली. सप्टेंबरअखेरपर्यंत २५ हजार अंडीपुंजांपासून ११० क्विंटल रेशीम कोष उत्पादन घेतले आहे.

हिंगोली जिल्ह्यात सध्या ५२१ शेतकऱ्यांकडे ५४३ एकरांवर तुती लागवड आहे. यामध्ये २०१९-२० मध्ये ३४ शेतकऱ्यांनी ३४ एकरांवर तुती लागवड केली. रब्बी हंगामात २०० एकरांवर तुती लागवड होईल. दुष्काळामुळे सुमारे १२५ एकरांवरील तुती मोडून टाकावी लागली. चालू आर्थिक वर्षात ३६१.५ एकरांवर तुती लागवड केलेल्या शेतकऱ्यांना ३३ हजार १५० अंडीपुंजांचे वाटप करण्यात आले होते. त्यापासून १५४ क्विंटल ५० किलो रेशीमकोष उत्पादन घेतले आहे. शेतकऱ्यांना ४९ लाख ४४ हजार रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळाल्याचे हिंगोलीचे जिल्हा रेशीम विकास अधिकारी स्वप्निल तायडे यांनी सांगितले.

रेशीमकोष उत्पादन (क्विंटल)

जिल्हा तुती लागवड अंडीपुंज वाटप कोष उत्पादन
नांदेड ९६३ ७८२५०  ४४९.८४
परभणी  ४६५ २५००० ११०.००
हिंगोली ५४३   ३३१५०  १५४.५०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com