नांदेड, परभणी, हिंगोलीत निर्बंधमुक्ती आंदोलन

Nanded, Parbhani, Free movement in Hingoli
Nanded, Parbhani, Free movement in Hingoli

नांदेड, परभणी, हिंगोली ः शेतकरी संघटनेतर्फे शरद जोशी यांच्या स्मृतिदिनानिमित्त राज्यव्यापी निर्बंधमुक्ती आंदोलनाअंतर्गत गुरुवारी (ता. १२) सकाळी १० ते ४ या वेळेत नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत विविध ठिकाणी धरणे आंदोलन तसेच निदर्शने करण्यात आले.

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती, वीजबिल मुक्ती देण्यात यावी. गेल्या वर्षी जाहीर झालेल्या दुष्काळाची मदत, तसेच या वर्षी पावसामुळे पिकांच्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी. जगभरात संशोधित जीएम तंत्रज्ञानाचे तयार असलेले बियाणे वापराची परवानगी शेतकऱ्यांना देण्यात यावी. एफएक्यूची अट न लावता सर्व शेतीमालाची सर्वच बाजार समित्यांमधून खरेदी करण्यात यावी, आदी मागण्यांसाठी विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले.

नांदेड जिल्ह्यात वसमत फाटा, कुंडलवाडी, हादगाव, नरसी आदी ठिकाणी माजी प्रदेशाध्यक्ष गुणवंतराव पाटील हंगरगेकर, गोरख पाटील, शिवाजी शिंदे, भीमराव पाटील, धोंडीबा पवार, दासराव कातोरे, बाबूराव नरवाडे, व्ही. डी. शिरपूरकर, आदींसह शेतकरी धरणे आंदोलनात सहभागी झाले होते.

परभणी जिल्ह्यात शेतकरी संघटना न्यासचे कार्याध्यक्ष गोविंद जोशी, जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख यांच्या नेतृत्वाखालील जिंतूर तालुक्यातील बोरी, पुंगळा, बामणी या तीन ठिकाणी सेलू, मानवत, पाथरी, परभणी, सोनपेठ, पूर्णा, गंगाखेड या तालुक्यांमध्ये गुरुवारी (ता. १२) सकाळी १० ते दुपारी ४ या कालावधीत शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी लोकशाही मार्गाने शांततेत धरणे आंदोलन करण्यात आले.

हिंगोली जिल्ह्यातील अनेक गावात धरणे आंदोलन तसेच निदर्शने करण्यात आली. जिल्हाध्यक्ष देवीप्रसाद ढोबळे, ज्येष्ठ कार्यकर्ते ब. ल. तामसकर, राजू कुटे, उत्तमराव वाबळे, अ. ना. पातुरकर, आदींसह शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.

यावेळी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांमार्फत शासनाकडे पाठवीत आले. या सर्व मागण्यांबाबत येत्या दहा दिवसांत सरकारने सकारात्मक भूमिका न घेतल्यास रविवारी (ता. २२) शेतकरी संघटना राज्यभर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या वेळी देण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com