नांदेड, परभणी जिल्ह्यांत पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली

नांदेड, परभणी जिल्ह्यांत पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली
नांदेड, परभणी जिल्ह्यांत पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली

नांदेड : नांदेड, परभणी जिल्ह्यांत २०१७ आणि २०१८ या दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा पावसाने वार्षिक (जून ते ऑक्टोबर) सरासरी ओलांडली आहे. परंतु, हिंगोली जिल्ह्यात मात्र यंदासह सलग तिसऱ्या वर्षी वार्षिक सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला.

यंदा या तीन जिल्ह्यांत जून, जुलै, ऑगस्ट या पहिल्या तीन महिन्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. परंतु, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात मात्र सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. शेवटच्या दोन महिन्यांतील सततचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे काढलेल्या, कापलेल्या सोयाबीनचे, वेचणीस आलेल्या कापूस, ज्वारी, बाजरी, भाजीपाला, फळपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

यंदा नांदेड जिल्ह्यात ६.०४ टक्के, परभणीत २.९७ टक्के जास्त पाऊस झाला. परंतु, हिंगोली जिल्ह्यात १९.१६ टक्के पावसाची तूट आली आहे. लघू, मध्यम, मोठ्या प्रकल्पांमध्ये मुबलक पाणीसाठा निर्माण झाल्यामुळे पिण्यासह सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. जून ते ऑक्टोबर या कालावधीत नांदेडमध्ये पडणाऱ्या पावसाची वार्षिक सरासरी ९५५.५५ मिलिमीटर आहे. यंदा ऑक्टोबरअखेरपर्यंत १०१३.३५ मिलिमीटर म्हणजेच वार्षिक सरासरीच्या १०६.०४ टक्के पाऊस झाला.

परभणी जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ७७४.६२ मिलिमीटर आहे. या वर्षी ऑक्टोबरअखेरपर्यंत  ७२१.७१ मिमी म्हणजेच वार्षिक सरासरीच्या (८०.८४ टक्के) पाऊस झाला. २०१९ मध्ये ७९७.७१ मिमी (१०२.९७ टक्के) म्हणजेच वार्षिक सरासरीपेक्षा २.९७ टक्के जास्त पाऊस झाला. ऑक्टोबर महिन्यात ५२.९१ मिमी पाऊस अपेक्षित असताना यंदा प्रत्यक्षात २२१.९४ मिमी (४१९.५ टक्के) पाऊस झाला.

हिंगोली जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ८९०.३४ मिलिमीटर आहे. जिल्ह्यात २०१६ मध्ये वार्षिक सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला होता. त्यानंतर यंदापर्यंत सलग तीन वर्षे सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. गतवर्षी ऑक्टोबरअखेरपर्यंत ६७०.१४ मिलिमीटर म्हणजेच ७५.०८ टक्के पाऊस झाला होता. २०१९ मध्ये ७२१.७१ मिलिमीटर (८०.८४ टक्के) पाऊस झाला म्हणजेच वार्षिक पावसात १९.१६ टक्के तूट आली आहे.

यंदा जून ते ऑक्टोबरमधील पाऊस (मि.मी)

जिल्हा सरासरी  प्रत्यक्ष पाऊस टक्केवारी
नांदेड ९५५.५५ १०१३.३५ १०६.०४
परभणी  ७७४.६२   ७९७.६५ १०२.९७
हिंगोली ८९०.३४   ७२१.७१   ८१.७३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com