नांदेड, परभणी जिल्ह्यांत साडेचौदा हजार क्विंटलवर तूर खरेदी

Nanded, Parbhani Districts purchase over 1,4500 quintals tour
Nanded, Parbhani Districts purchase over 1,4500 quintals tour

नांदेड : विदर्भ सहकारी पणन महासंघातर्फे (व्हीसीएफ) नांदेड आणि परभणी जिल्ह्यांतील पाच खरेदी केंद्रांवर आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत शनिवारपर्यंत (ता. १४)२ हजार २३६ शेतकऱ्यांची १४ हजार ६६०.५० क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. शेतकऱ्यांना २ कोटी ७५ लाख रुपयांचे चुकारे अदा करण्यात आले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

नांदेड जिल्ह्यातील विदर्भ सहकारी पणन महासंघाच्या धर्माबाद येथील केंद्रावर १ हजार ३२० शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी ऑफलाइन अर्ज केले. त्यापैकी १ हजार ४४ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली. त्यापैकी ४५६ शेतकऱ्यांच्या २ हजार ५८३ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली. नायगाव येथील केंद्रांवर १ हजार ५०८ शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी ऑफलाइन अर्ज केले. त्यापैकी १ हजार २०४ शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी झाली. आजवर ४०२ शेतकऱ्यांची २ हजार २२.५० क्विंटल तूर खरेदी करण्यात आली.

भोकर येथील केंद्रावर १ हजार ४५० शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली. एकूण ९१ शेतकऱ्यांची ३०२ क्विंटल तूर खरेदी  झाली. नांदेड जिल्ह्यातील तीन केंद्रांवर एकूण ९४९ शेतकऱ्यांची ४ हजार ९०७.५० क्विंटल तूर खरेदी झाली. धर्माबाद,  नायगाव केंद्रांतर्गत शेतकऱ्यांना ३३ लाख रुपयाचे चुकारे मिळाले.

परभणीतील मानवत येथील केंद्रावर २ हजार २७० अर्ज आले.  त्यापैकी २ हजार ३० शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली. त्यापैकी ६६२ शेतकऱ्यांची ४ हजार ६५८ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. गंगाखेडमधील  केंद्रावर २ हजार ८९४ शेतकऱ्यांनी ऑफलाइन अर्ज केले. त्यापैकी २ हजार ४२९ शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी करण्यात आली. गंगाखेड येथे ६२५ शेतकऱ्यांची ५ हजार ९५ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. 

परभणीतील दोन केंद्रांवर १ हजार २८७ शेतकऱ्यांची ९ हजार ७५३ क्विंटल तूर खरेदी झाली.  मानवत येथील केंद्रांतर्गत २४८ शेतकऱ्यांना १ कोटी ६८ लाख रुपये आणि गंगाखेड येथे १४१ शेतकऱ्यांना ७४ लाख रुपयांचे चुकारे अदा केले, अशी माहिती विदर्भ सहकारी पणन महासंघाचे जिल्हा व्यवस्थापक भागवत सोंळके यांनी दिली.

केंद्रनिहाय तूर खरेदी स्थिती

केंद्र शेतकरी संख्या तूर खरेदी (क्विंटल
भोकर ९१  ३०२
धर्माबाद ४५६ २५८३
नायगाव ४०२ २०२२.५०
मानवत ६६२ ४६५८
गंगाखेड  ६२५ ५०९५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com