agriculture news in marathi, Nanded, Parbhani, Hingoli, 1.5 lakh quintals of gram | Agrowon

नांदेड, परभणी, हिंगोलीत दीड लाख क्विंटल हरभरा खरेदी
टीम अॅग्रोवन
शनिवार, 16 जून 2018

नांदेड ः केंद्र शासनाच्या किंमत समर्थन योजनेअंतर्गत नाफेड आणि विदर्भ काॅ-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन यांच्यातर्फे नांदेड, परभणी, हिंगोली या तीन जिल्ह्यांमध्ये बुधवारपर्यंत (ता. १३) १० हजार ४४७ शेतकऱ्यांचा १ लाख ५५ हजार ६७३ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. खरेदी बंद झाल्यामुळे या तीन जिल्ह्यांतील आॅनलाइन नोंदणी केलेल्या २७ हजार ६३३ शेतकऱ्यांच्या हरभऱ्याचे मोजमाप झाले नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना भावांतर योजनेचा लाभ द्यावा लागणार आहे.

नांदेड ः केंद्र शासनाच्या किंमत समर्थन योजनेअंतर्गत नाफेड आणि विदर्भ काॅ-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन यांच्यातर्फे नांदेड, परभणी, हिंगोली या तीन जिल्ह्यांमध्ये बुधवारपर्यंत (ता. १३) १० हजार ४४७ शेतकऱ्यांचा १ लाख ५५ हजार ६७३ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. खरेदी बंद झाल्यामुळे या तीन जिल्ह्यांतील आॅनलाइन नोंदणी केलेल्या २७ हजार ६३३ शेतकऱ्यांच्या हरभऱ्याचे मोजमाप झाले नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना भावांतर योजनेचा लाभ द्यावा लागणार आहे.

आॅनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचे मोजमाप न झाल्यामुळे हरभरा खरेदीसाठी बुधवारपर्यंतची (ता. १३) मुदतवाढ देण्यात आली होती; परंतु या कालावधीत आलेल्या जोरदार पावसामुळे खरेदीत अडथळे आले. त्यामुळे वाढीव मुदतीत २ हजार ८६० शेतकऱ्यांच्या ४० हजार क्विंटल हरभऱ्याची खरेदी करता आली.
नांदेड जिल्ह्यातील नाफेडच्या आठ आणि विदर्भ मार्केटिंग काॅ-आॅपरेटिव्ह फेडरेशनच्या एका खरेदी केंद्रांवर मंगळवार (ता. २९ मे पर्यंत) २१ हजार ५३६ शेतकऱ्यांनी हरभऱ्यासाठी आॅनलाइन नोंदणी केली होती.

त्यापैकी ५ हजार ९५० शेतकऱ्यांचा ९१ हजार ३२६.२० क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. खरेदी बंद झाल्यामुळे १५ हजार ५३० शेतकऱ्यांची मोजमाप होऊ शकले नाही. परभणी जिल्ह्यातील नाफेडच्या ७ आणि विदर्भ मार्केटिंग काॅ-आॅपरेटिव्ह फेडरेशनच्या एका केंद्रावर ८ हजार ६७३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३ हजार ३८३ शेतकऱ्यांचा ४६ हजार ७५१.५० क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली; परंतु ५ हजार ४९० शेतकऱ्यांच्या हरभऱ्याचे मोजमाप झाले नाही.

हिंगोली जिल्ह्यातील नाफेडच्या ५ खरेदी केंद्रांवर ७ हजार ६७१ शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी केलेली आहे. त्यापैकी १ हजार ११४ शेतकऱ्यांचा १७ हजार ५९६ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. खरेदी बंद झाल्यामुळे ६ हजार ५५७ शेतकऱ्यांच्या हरभऱ्याची खरेदी होऊ शकली नाही. वाढीव मुदतीच्या काळात तीन जिल्ह्यातील एकूण २ हजार ८६० शेतकऱ्यांच्या ४० हजार ८३४ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. मात्र, २७ हजार ६३३ शेतकऱ्यांची हरभरा खरेदी होऊ शकली नाही.

जिल्हानिहाय हरभरा खरेदी (क्विंटलमध्ये)
जिल्हा खरेदी शेतकरी संख्या नोंदणी केलेले शेतकरी
नांदेड ९१३२६.२ ५९५० २१५३६
परभणी ४६७५१.५ ३३८३ ८८७३
हिंगोली १७५९६.५ १११४ ७६७१

 

इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत पाऊसऔरंगाबाद / जालना : औरंगाबाद, जालना या दोन...
सोलापुरातील कांदा उत्पादकांच्या...सोलापूर : राज्यातील कांदा उत्पादक...