नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम सरी

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील १४५ मंडळांत पावसाची  जोरदार हजेरी
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील १४५ मंडळांत पावसाची जोरदार हजेरी

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील १४५ मंडळांमध्ये शनिवारी (ता. २७) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत मध्यम ते जोरदार पाऊस झाला. अनेक दिवसांच्या खंडानंतर सर्वदूर पाऊस झाल्याने खरीप पिकांना जीवदान मिळाले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पहायला मिळाले. 

शुक्रवार (ता. २६) ते शनिवारी (ता. २७) सकाळपर्यंत २४ तासांत नांदेड जिल्ह्यातील १६ तालुक्यातील ७६ मंडळांत हलका ते जोरदार पाऊस झाला. हिमायतनगर तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. किनवट तालुक्यातील शिवणी मंडळात ७५ मिलिमीटर, हिमायतनगर मंडळात ७१, सरसम मंडळात ६६ मिलिमीटर पाऊस झाला. नांदेड, अर्धापूर, मुदखेड, हदगाव, किनवट, हिमायतनगर, भोकर, अर्धापूर, उमरी, नायगाव, बिलोली, मुखेड, कंधार, लोहा आदी तालुक्यातील अनेक मंडळांत पावसाचा जोर राहिला. 

परभणी जिल्ह्यातील सर्व ९ तालुक्यांतील ३९ मंडळांमध्ये पाऊस झाला. परभणी, जिंतूर, सेलू , मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड पालम, पूर्णा तालुक्यात सर्वदूर पाऊस झाला. सेलू मंडळामध्ये सर्वाधिक ४० मिलिमीटर पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील सर्व ५ तालुक्यांतील ३० मंडळांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस झाला. हिंगोली, कळमनुरी, सेनगाव, औंढा नागनाथ, वसमत तालुक्यातील अनेक मंडळांमध्ये पावसाचा जोर राहिला. 

मंडळनिहाय पाऊस (मि.मी.) 

नांदेड जिल्हा नांदेड ३२, नांदेड ग्रामीण २८, वजीराबाद ३२, वसरणी ३२, तरोडा ३०, लिंबगाव ४०, तुप्पा २९, विष्णुपुरी ३३, अर्धापूर १९, मालेगाव २५, दाभड १७, मुदखेड १६, मुगट २५, बारड २१, हदगाव ४६, तामसा ३९, मनाठा ४५, पिंपरखेड ४६, आष्टी ५२, निवघा ३४, तळणी ३५, माहूर ६, किनवट १३, इस्लापूर ४४, मांडवी ६, बोधडी २२, दहेली १३, जलधारा ३८, शिवणी ७५, हिमायतनगर ७१, सरसम ६६, जवळगाव ५८, भोकर ३०, किनी ६२, मोघाली २०, मातुल ३०, उमरी १८, सिंदी १६, गोलेगाव १८, धर्माबाद १६, जारिकोट १३, करखेली ३४, नायगाव २१, नरसी १५, मांजरम १९, बरबडा २७, कुंटूर १८, बिलोली २०, कुंडलवाडी २४, सगरोळी ३७, आदमपूर १५, लोहगाव १८, खानापूर ८, शहापूर ९, मुखेड १८, चांदोळा २२,  कंधार २८, फुलवल २४, उस्माननगर २२,बारुळ १९, पेठवडज ३७, कुरुळा ६, लोहा २१, माळकोळी १३, कलंबर ४४,शेवडी २२, सोनखेड २३, कापसी ३०.
परभणी जिल्हा परभणी २०, परभणी शहर २२, पेडगाव १९, जांब २०, सिंगणापूर २३, दैठणा १७, झरी २१, बोरी २१,जिंतूर १८,चारठाणा १९, बामणी २०, सावगी म्हाळसा ३१, आडगाव १८, सेलू ४०, देऊळगाव ३५, कुपटा ३२ वालूर १५, चिकलठाणा १९, मानवत २३, केकरजवळा २१, कोल्हा ३२, पाथरी ३७, बाभळगाव २१, हादगाव १२, सोनपेठ १२, आवलगाव १२, गंगाखेड १२, माखणी ७, महातपुरी ७, पालम २५, पूर्णा ३२, ताडकळस २८, चुडावा ४८, लिमला २३, कात्नेश्वर १८.
हिंगोली जिल्हा हिंगोली ३२, खंबाळा २०, माळहिवरा ४२, सिरसम ४२, बासंबा १३, नरसी नामदेव १६, डिग्रस १९, कळमनुरी २२, नांदापूर ३३, आखाडा बाळापूर ४९, डोंगरकडा २३, वारंगा फाटा २५, वाकोडी २२, सेनगाव २३, गोरेगाव ४४, आजेगाव २०, साखरा ४३, पानकनेरगाव ३१, हत्ता २१, वसमत १९, हट्टा २२, गिरगाव ८, कुरुंदा २०, टेंभुर्णी १४, आंबा २०, हयातनगर ३९, औंढा नागनाथ ४८, जवळा बाजार ४८, येळेगाव ३४, साळणा ३५.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com