नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात जून महिन्यात ५५ मंडळांत सरासरीपेक्षा कमी पाऊस

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ५५ मंडळांमध्ये यंदा जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. या मंडळांत खरिपाच्या पेरण्यांना उशीर झाल्याची स्थिती आहे.
Nanded, Parbhani, Hingoli districts received below average rainfall in 55 circles in June
Nanded, Parbhani, Hingoli districts received below average rainfall in 55 circles in June

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ५५ मंडळांमध्ये यंदा जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. या मंडळांत खरिपाच्या पेरण्यांना उशीर झाल्याची स्थिती आहे.

बारा मे २०२० रोजीच्या शासन निर्णयानुसार पावसाच्या सरासरीत सुधारणा करण्यात आली आहे. यंदापासून जून महिन्याची नांदेड जिल्ह्याची सरासरी १५५.४ मिमी, परभणी जिल्हा १४५.३ मिमी, हिंगोली जिल्हा १६९.२ मिमी निश्चित करण्यात आली. गतवर्षीपर्यत नांदेड जिल्हा १६४.८ मि.मी, परभणी जिल्हा १२६.६ मिमी, हिंगोली जिल्हा १६८.५ मिमी एवढी जून महिन्याची पावसाची सरासरी होती.

महावेध प्रकल्पांतर्गंत प्रत्येक महसूल मंडळातील पर्जन्यमानाची आकडेवारी कृषी विभागाकडून महारेन संकेतस्थळावर देण्यात येते. त्यानुसार यंदाच्या जून महिन्यात नांदेड जिल्ह्यात सरासरी १४०.८ मि.मी (९०.६ टक्के), परभणी जिल्ह्यात १९६ मि.मी (१३५. टक्के), हिंगोली जिल्ह्यात २३५.४ मि.मी (१३९.१ टक्के) पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील ४८ मंडळांत, परभणी जिल्ह्यातील ५ मंडळांत, हिंगोली जिल्ह्यातील २ मंडळांत अशा एकूण ५५ मंडळांमध्ये जून महिन्याच्या सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला.

जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेली मंडळे (कंसात टक्के)

नांदेड जिल्हा ः नांदेड शहर (८३.३ टक्के),नांदेड ग्रामीण (६४.८), वजीराबाद (७०.२ ), तुप्पा (७९.४), वसरणी (८२), तरोडा (६३.४),अर्धापूर (८५.७), दाभड (७६.४) मुदखेड (६९.२), मुगट (६९.८), बारड (६७.६), निवघा (९०.४), तामसा  (८५.१), आष्टी (७७.४), मातुल (८९.४), किनी (८२.५), माहूर (५५.७), वानोळा (५३.६), वाई ७५.३), सिंदखेड (५३.२), किनवट (५४.२), बोधडी (४४.२), इस्लापूर (६९.४), जलधारा (६६.६), शिवणी (७६.०), मांडवी (६७.७), दहेली (६७.५), हिमायतनगर (८७.५), करखेली (७८.८), जारिकोट (९५.६), उमरी (९८.६), गोळेगाव (६८.५), कुंडलवाडी (७८), आदमपूर (५९.९), देगलूर (९७.२), खानापूर (९३.२), मरखेल (७९.६), मालेगाव (७२.६), हानेगाव (९७.३), मुखेड (९७.२), येवती (८४.८), चांडोळा (९६.१), कंधार (८५.६), कुरुला (७४.७), फुलवळ (९८.२), पेठवडज (८८.४), बारुळ (८७.२), सोनखेड (९१.९).

परभणी जिल्हा ः परभणी ग्रामीण (९३.८), पेडगाव (९१.४), झरी (८९.८), दैठणा (८७.५), पिंगळी (९५.८).

हिंगोली जिल्हा ः आंबा (८२.९ ), गिरगाव (९५.९).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com