नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत पावसाळ्यातही पाण्यासाठी हाल

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत पावसाळ्यातही नागरिकांचे पाण्यासाठी हाल
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत पावसाळ्यातही नागरिकांचे पाण्यासाठी हाल

नांदेड : यंदाच्या पावसाळ्याच्या पहिल्या महिन्यात अत्यंत कमी पाऊस झाला. त्यामुळे जलस्रोत अद्याप कोरडे आहेत. नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २९६ लोकवस्त्यांवरील पाणीटंचाईची समस्या जैसे थे आहे. टंचाईग्रस्त लोकवस्त्यांवर २९८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. दरम्यान, आजवरच्या पावसामुळे या तीन जिल्ह्यांतील एकूण ४७ टॅंकर कमी झाल्याची माहिती मिळाली. 

नांदेड जिल्ह्यात जून महिन्यात १६१ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. पावसामुळे १० टॅंकर कमी झाले. सध्या ८४ गावे आणि ६१ तांडे असे एकूण १४५ लोकवस्त्यांवरील १ लाख ९५ हजार १५० लोकांसाठी ९ शासकीय आणि १४२ खासगी असे एकूण १५१ टॅंकर सुरू आहेत. यामध्ये लोहा नगर परिषदेअंतर्गत ९ टॅंकरचा समावेश आहे. सध्या मुखेड तालुक्यात सर्वाधिक ६० टॅंकर सुरू आहेत.

नांदेड तालुक्यात २० टॅंकर, भोकर तालुक्यात २, उमरी तालुक्यात ३, हदगावात ५, हिमयातनगरमध्ये १, नायगावात ५, देगलूरमध्ये ६, कंधारमध्ये १०, लोहा तालुक्यात २७, लोहा नगर परिषदेअंतर्गत ९, किनवटमध्ये ३, माहूरमध्ये १ टॅंकर सुरू आहे. टंचाईग्रस्त गावातील १ हजार १९१ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

परभणी जिल्ह्यात जून महिन्यात १०६ टॅंकर सुरू होते. पावसामुळे येथील ३० टॅंकर बंद झाले. तरीही अजून ६० गावे आणि १४ तांड्यांवरील १ लाख ७४ हजार ६७७ नागरिकांना ७६ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. सध्या परभणी तालुक्यात ३ टॅंकर, जिंतूरमध्ये १० टॅंकर, सेलूमध्ये १२, मानवतमध्ये ६, पाथरीत १, सोनपेठमध्ये ३, गंगाखेडमध्ये १२, पालममध्ये १७, तर पूर्णा तालुक्यात १२ टॅंकर सुरू आहेत. एकूण टंचाईग्रस्त गावांतील ४३८ विहिरी अधिग्रहित आहेत. 

हिंगोलीत पाणीटंचाई हिंगोली जिल्ह्यात जून महिन्यात ७८ टॅंकर सुरू होते. सध्या ७७ लोकवस्त्यांवर ७१ टॅंकर सुरू आहेत. यामध्ये हिंगोली तालुक्यातील ३१ टॅंकर, कळमनुरीत ११, वसमतमध्ये ३ , औंढा नागनाथमध्ये १०, सेनगावातील १६ टॅंकरचा समावेश आहे. टंचाईग्रस्त गावातील ५३८ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com