नांदेड, परभणी, हिंगोलीत जोरदार पाऊस

नांदेड, परभणी, हिंगोलीत जोरदार पाऊस
नांदेड, परभणी, हिंगोलीत जोरदार पाऊस

नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत सोमवारी (ता. २०) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये जोरदार पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील दहा मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. दरम्यान, सोमवारी (ता. २०) दुपार पर्यंत या तीन जिल्ह्यांतील अनेक भागात संततधार पाऊस सुरू होता. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. यामुळे ओढे, नाले भरून वाहिले. पुरामध्ये पूल पाण्याखाली गेल्यामुळे अनेक ठिकाणचा संपर्क तुटला होता.

नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, शहापूर, मुदखेड, मुगट, बारड, मोघाळी, उमरी, शिंदी, धर्माबाद, चांडोळा या १० मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. मुदखेड, अर्धापूर, उमरी, नांदेड, बिलोली, लोहा, देगलूर, हिमायतनगर, भोकर, नायगांव, मुखेड, हदगांव, कंधार तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता. परभणी जिल्ह्यात पूर्णा, सेलू, जिंतूर तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता. हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, वसमत, औंढा नागनाथ तालुक्यांत पावसाचा जोर अधिक होता.

मंडळनिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये) नांदेड जिल्हा ः नांदेड शहर ४९, नांदेड ग्रामीण ५५, वजीराबाद ४६, वसरणी ५१, तरोडा ५६, तुप्पा ४२, लिंबगांव ४५, विष्णुपुरी ४४, अर्धापूर ६६, दाभड ६३, मालेगांव ४२, हिमायतनगर ३०, सरसरम २८, जवळगांव ३३, हदगांव २७, तामसा २२, मनाठा २०, पिंपरखेड २४, निवघा २९, तळणी २१, आष्टी ३८, मांडवी २०,  मुदखेड ७५, मुगट ६८, बारड ६६, भोकर ३४, मोघाळी ७५, मातुळ ३३, किनी ३२, उमरी ७४, शिंदी ६५, गोलेगांव ५०, धर्माबाद ७२, जारिकोट ३८, करखेली २५, बिलोली ४५, लोहगांव ४२, कुंडलवाडी २०, सगरोळी २७, आदमापूर ४५, देगलूर ४६, खानापूर ५२, शहापूर ८०, नायगांव ४०, नरसी २६, मांजरम ३४, बरबडा २४, कुंटूर ३६, मुखेड ३५, येवती २६, जहूर ३४, चांडोळा ७०, मुक्रमाबाद २२, कंधार २७, कुरुला २३, फुलवळ २३, पेठवडज ४०, उस्माननगर ४०, बारुळ ३८, लोहा २२, माळकोळी २७, कलंबर ३४, शेवडी ३३, सोनखेड ४८, कापसी ४६.

परभणी जिल्हा ः परभणी शहर १३, परभणी ग्रामीण १२, झरी १४, पिंगळी १३, जांब १०, सावंगी म्हाळसा २०, चारठाणा ३०, बामणी २६, सेलू १४, देऊळगांव ११, कुपटा १२, वालूर १२, चिकलठाणा १८, पालम १०, पूर्णा २९, चुडावा ४४, लिमला १६, कात्नेश्वर २०.

हिंगोली जिल्हा ः हिंगोली १०, बासंबा १२, आखाडा बाळापूर १९, डोंगरकडा २१,वारंगा फाटा २६, वाकोडी १०, पानकनेरगांव ११, वसमत १८, हट्टा २०, गिरगांव २१, कुरुंदा ३५, टेंभुर्णी १३, आंबा २६, हयातनगर २५, औंढा नागनाथ १५, जवळाबाजार १५, येळेगांव ११, साळणा १३.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com