agriculture news in marathi, Nanded, Parbhani, Hingoli in heavy rain | Page 2 ||| Agrowon

नांदेड, परभणी, हिंगोलीत मृगाची दमदार सुरवात
टीम अॅग्रोवन
शनिवार, 9 जून 2018

नांदेड ः यंदा मृग नक्षत्राची सुरवात दमदार पावसाने झाल्यामुळे नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. शुक्रवारी (ता. ८) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये या तीन जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस झाला. शुक्रवारी (ता. ८) दुपारी एकपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू होता. नांदेड जिल्ह्यातील तामसा (ता. हदगाव) येथे सर्वाधिक ११२ मिलिमीटर पाऊस झाला.

नांदेड ः यंदा मृग नक्षत्राची सुरवात दमदार पावसाने झाल्यामुळे नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. शुक्रवारी (ता. ८) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये या तीन जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस झाला. शुक्रवारी (ता. ८) दुपारी एकपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू होता. नांदेड जिल्ह्यातील तामसा (ता. हदगाव) येथे सर्वाधिक ११२ मिलिमीटर पाऊस झाला.

नांदेड जिल्ह्यातील हदगाव (८४ मिमी), तामसा (११२ मिमी), धर्माबाद (८६ मिमी), बिलोली (८० मिमी), लोहगांव (७० मिमी) या पाच मंडलांमध्ये अतिवृष्टी झाली.
यंदा मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर दमदार पावसाला सुरवात झाली आहे. येत्या काही दिवसांत चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे खरिपाची पेरणी वेळेवर होण्याची शक्यता दिसू लागल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. बी-बियाणे, खते आदी निविष्ठा खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी वाढली आहे. मशागतीची कामे वेगात सुरू आहेत. अनेक तालुक्यात शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड सुरू केली आहे.

नांदेड जिल्ह्यामधील ७४ मंडलांमध्ये पाऊस झाला. नांदेड, अर्धापूर, हदगाव, हिमायतनगर, भोकर, उमरी, धर्माबाद, बिलोली, नायगाव, मुखेड, लोहा तालुक्यात जोरदार पाऊस झाला. माहूर, किनवट तालुक्यात पावसाचा जोर कमी होता. परभणी जिल्ह्यातील १६ मंडलांमध्ये पाऊस झाला. पूर्णा, पालम, गंगाखेड तालुक्यात जोरदार पाऊस झाला. अन्य तालुक्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील २३ मंडलांमध्ये पावसाने हजेरी लावली. कळमनुरी, वसमत, हिंगोली तालुक्यात मध्यम ते जोरदार पाऊस झाला.

मंडलनिहाय पाऊस (मिमीमध्ये) ः नांदेड शहर ४०, नांदेड ग्रामीण २६, वजीराबाद ४२, वसरणी ४१, तरोडा २५, तुप्पा ४०, लिंबगाव ३७, विष्णुपुरी ५७, अर्धापूर २२, मालेगाव ३१, दाभड २१, हदगाव ८४, तामसा ११२, हिमायतनगर ३१, मोघाळी ३१, धर्माबाद ८६, करखेली ३४, जारिकोट २८, नायगाव २७, नरसी ३२, मांजरम ३२, कुंटूर २९, बरबडा २४, येवती १८, चांडोला १५, मुक्रमाबाद ३५, बारड ३८, उमरी २७, सिंदी ३९, गोलेगाव २५, , बिलोली ८०, लोहगाव ७०, कुंडलवाडी २५, सगरोळी १८, आदमापूर ३०, देगलूर १७, खानापूर १७, शहापूर ४५, मालेगाव १५, लोहा ३१, मालकोळी ४०, कलंबर ५०, शेवडी ३१, सोनखेड ३३, कापसी ३०, परभणी जिल्हा ः पूर्णा १४, चुडावा २७, पालम १९,चाटोरी १७, बनवस २०, गंगाखेड ३९, माखणी ३०. हिंगोली जिल्हा ः कळमनुरी १६, नांदापूर ४८, आखाडा बाळापूर ४१, डोंगरकडा २५, वारंगा फाटा २२, गिरगांव ३७, कुरुंदा ४०, टेंभुर्णी १९, आंबा ४३, हयातनगर १८.

इतर ताज्या घडामोडी
कर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ...जळगाव  : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली....
पुणे विभागात खरिपाची नऊ लाख ८० हजार...पुणे  ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने...
कुठे गेला कृत्रिम पाऊस ; सरकारने...बदनापूर / भोकरदन, जि. जालना ः अर्धे राज्य...
रासप ५७ जागांची मागणी करणार : महादेव...हिंगोली  : आगामी विधानसभा निवडणुकीत...
मुंबई बाजार समितीच्या निवडणुकीची ‘...पुणे  ः चटई निर्देशाकांसह कोट्यवधी...
अकोला जिल्ह्यात ‘आत्मा’चा कारभार...अकोला  ः राज्याच्या कृषी विभागात कधीकाळी...
कऱ्हाडमधील ९९ शाळांना बसला महापुराचा...कऱ्हाड, जि. सातारा  : महापुरामुळे...
गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७९७...गडचिरोली  ः या वर्षी अतिवृष्टीमुळे...
जळगावात गवार २५०० ते ४६०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...
तणनाशकांची कार्यपद्धती, निवडकता पिकातील तणनियंत्रण हे अत्यंत महत्त्‍वाचे आणि...
नगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली...नगर  ः जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी गोदावरी...
पूरबाधित क्षेत्रातील उसाचे व्यवस्थापन पुराच्या पाण्याचा कालावधी, पाण्याचा गढूळपणा आणि...
संत्रा फळपिकावरील तपकिरी कुज व्यवस्थापन लिंबू वर्गीय फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतो....
नत्राच्या दुहेरी समस्यांवर मात...जागतिक पातळीवर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी...
डाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया...सोलापूर  : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब...
जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन...जळगाव  ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
औरंगाबाद जिल्ह्यात पावसाअभावी टोमॅटोचे...औरंगाबाद :  जिल्ह्यातील टोमॅटोचे आगार...
अकोला जिल्ह्यातील पाच पशुवैद्यक दवाखाने...अकोला  ः जिल्हा परिषदेअंतर्गत चालविल्या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २३ धरणे भरलीसिंधुदुर्ग : मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील २३...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील अनेक...