नांदेड, परभणी, हिंगोलीत ‘स्वाभिमानी’चा रास्ता रोको

नांदेड, परभणी, हिंगोलीत ‘स्वाभिमानी’चा रास्ता रोको
नांदेड, परभणी, हिंगोलीत ‘स्वाभिमानी’चा रास्ता रोको

नांदेड ः दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी. सरसकट कर्जमाफी करावी आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये विविध ठिकाणी शनिवारी (ता. २०) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे अनेक मार्गावरील वाहतूक काही तास खोळंबली होती.

अल्प पावसामुळे कापूस, सोयाबीन, तूर आदी पिके हातची गेल्यामुळे शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार रुपये मदत करावी. वीजपुरवठा नियमित करावा. ऊस रिकव्हरीमध्ये बदल करावा. पीकविमा लागू करावा. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावे, आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे या तीन जिल्ह्यांत रास्ता रोको करण्यात आला.

नांदेड जिल्ह्यात अर्धापूर, नांदेड, हदगाव, भोकर, मुदखेड, देगलूर आदी तालुक्यांत रास्ता रोको करण्यात आला. भोकरफाटा (ता. अर्धापूर) येथे रास्ता रोको करत असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद इंगोले, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष हनुमंत राजगोरे, जिल्हाध्यक्ष किशनराव कदम देळुबकर, तालुकाध्यक्ष माधवराव कदम, शंकरराव राजेगोरे आदींना पोलिसांनी अटक केली.

परभणी जिल्ह्यात महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रसिका ढगे, जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांच्या नेतृत्वाखाली विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले. परभणी येथे वसमत रस्त्यावर वनामकृविच्या प्रवेशद्वारासमोर रास्ता रोको आंदोलनात केशव आरमळ, डिंगाबर पवार आदींसह शेतकरी सहभागी झाले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com