agriculture news in marathi, Nanded, Parbhani, Hingoli 'Swabhimani' Chakkjam | Agrowon

नांदेड, परभणी, हिंगोलीत ‘स्वाभिमानी’चे चक्काजाम

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 20 जुलै 2018

नांदेड ः दूध दरवाढीसाठी नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत विविध ठिकाणी गुरुवारी (ता. १९) स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे चक्का जाम आंदोलन करण्यात आले. नांदेड जिल्हाध्यक्ष प्रल्हाद इंगोले, किशराव देवळूबकर, हनुमंतराव राजेगोरे यांच्या नेतृत्वाखाली मालेगांव, कामठा, धामदरी आदी चक्का जाम आंदोलन करण्यात आले.

नांदेड ः दूध दरवाढीसाठी नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत विविध ठिकाणी गुरुवारी (ता. १९) स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे चक्का जाम आंदोलन करण्यात आले. नांदेड जिल्हाध्यक्ष प्रल्हाद इंगोले, किशराव देवळूबकर, हनुमंतराव राजेगोरे यांच्या नेतृत्वाखाली मालेगांव, कामठा, धामदरी आदी चक्का जाम आंदोलन करण्यात आले.

परभणी जिल्ह्यात परभणी येथील वसमत रस्त्यावरील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटना महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रसिक ढगे, जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, केशव आरमळ यांच्या नेतृत्वाखाली तसेच कोक (ता. जिंतूर) येथे माधव निर्वळ यांच्या नेतृत्वाखाली जिंतूर परभणी रस्त्यावर चक्का जाम आंदोलन करण्यात आले. गंगाखेड येथे एसटी बसच्या चाकातील हवा सोडून देण्यात आली.

हिंगोली जिल्ह्यात हिंगोली-नांदेड रस्त्यावर डोंगरकडा फाटा (ता. कळमनुरी) येथे जिल्हाध्यक्ष रावसाहेब अडकिने, युवा आघाडीचे पराग अडकिने, दिगंबर गावंडे, पंडितराव गाडे आदींच्या उपस्थितीत चक्का जाम आंदोलन करण्यात आले. चक्का जाममुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या स्वाभिमानीच्या दूध बंद आंदोलनामुळे या तीन जिल्ह्यांतील दूध पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. दूध संकलन बंद असल्यामुळे काही भागांत दूध तुटवडा निर्माण झाला आहे.


इतर बातम्या
‘कोरोना’च्या अफवेमुळे पोल्‍ट्री...पुणे ः चीनमधील कोरोना विषाणूने जगभरात भीतीचे...
मांसाहारामुळे ‘कोरोना’ अशी अफवा...नागपूर: मांसाहार कोरोना व्हायरसला कारणीभूत...
शेतकऱ्यांचे ‘नाइट लाइफ’ कधी संपेल रे भौ...पुसद, जि. यवतमाळ : ग्रामीण भागात शेतीचे प्रश्‍न...
पुणे विभागात गव्हाचा १ लाख ६८ हजार...पुणे  ः पुणे विभागात गव्हाच्या पेरण्या...
उन्हाचा चटका कायम राहणारपुणे : निरभ्र आकाशामुळे उन्हाचा ताप वाढून...
संशोधन शेतात पोचले तरच शेतकऱ्यांचा...दापोली, जि. रत्नागिरी ः विद्यापीठांमध्ये चांगल्या...
खासदार औद्योगिक महोत्सवाच्या माध्यमातून...नागपूर  ः खासदार औद्योगिक महोत्सवाच्या...
अकोला कृषी विद्यापीठात विद्यार्थ्यांचे...अकोला  : ‘कृषी’चे पदव्युत्तर शिक्षण हे...
तुरीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांची पाठनागपूर ः खरेदीनंतर चुकाऱ्यास होणारा विलंब आणि...
तीन जिल्ह्यांत तूर विक्रीसाठी २९...नांदेड  ः मराठवाड्यातील नांदेड, परभणी,...
आळसंद येथील पशुवैद्यकीय दवाखाना उद्‌...आळसंद, जि. सांगली : आळसंद (ता. खानापूर) येथे...
तीन जिल्ह्यांत सतरा लाख ४१ हजार क्विंटल...नांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...
‘ठिबक’च्या प्रस्तावासाठी २०...सोलापूर : या वर्षी ठिबक सिंचन केलेल्या...
जावळी तालुक्यात वन्यप्राण्यांकडून... मेढा, जि. सातारा : जावळी तालुक्‍यात...
कातळावरील गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीचा...सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील कांदळगाव (ता. मालवण)...
सुरक्षित प्रवासासाठी प्रवाशांना सुविधा...नाशिक : प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देऊन त्यांचा...
जोतिबाच्या खेट्यास प्रारंभ, हजारो भाविक...जोतिबा डोंगर, जि. कोल्हापूर: जोतिबाच्या खेट्यास...
महाशिवरात्रीनिमित्त पुण्यात रताळी,...पुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
नियमित कर्जदारांच्या पदरी निराशाचसांगली ः शासनाच्या कर्जमाफीच्या आदेशात अल्प...
गिरणा परिसरात कांदा लागवडीकडे कलमेहुणबारे, जि. जळगाव  ः चाळीसगाव तालुक्‍यात...