Agriculture news in marathi In Nanded, rains hit 83,000 hectares of crops | Agrowon

नांदेडमध्ये पावसाने ८३ हजार हेक्टर पिकांना फटका

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

नांदेड : अतिवृष्टी, पूरामुळे जिल्ह्यातील नुकसानीचे क्षेत्र वाढले आहे. ११ तालुक्यातील ३८१ गावांना याचा फटका बसला.

नांदेड : अतिवृष्टी, पूरामुळे जिल्ह्यातील नुकसानीचे क्षेत्र वाढले आहे. ११ तालुक्यातील ३८१ गावांना याचा फटका बसला. यापूर्वी ३८ हजार २४२ हेक्टरवरुन आता ८२ हजार ९६० हेक्टरवरील खरिपातील पिकांचे नुकसान झाले. असा प्राथमिक अंदाज प्रशासनाने शासनाला कळविला आहे. 

जिल्ह्यात मागील रविवारपासून जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे खरिपातील सोयाबीन, कपाशी, ज्वारी, तूर या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्ह्यातील काही मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. त्यामुळे नुकसानीचा आकडा वाढला. अतिवृष्टीचे प्रमाण मुखेड तालुक्यात सर्वाधिक होते.

यासोबत देगलूर, बिलोली, नायगाव, उमरी, धर्माबाद, नांदेड, अर्धापूर, मुदखेड, हदगाव, भोकर या तालुक्यातही फटका बसला. काही मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. नदीकाठी तसेच सखल भागातील खरिपांच्या पिकांसह केळी, ऊस अशा बागायती पिकांचेही नुकसान झाले. 

दरम्यान, यापूर्वीच्या पाहणीत जिल्ह्यातील ३८१ गावांतील ३८ हजार २४२ हेक्टरवरील खरिपासह बागायती पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला होता. परंतु, नंतरही पावसाने झोडपून काढले. त्यामुळे जिल्ह्यातील नुकसानीचे प्रमाण वाढले आहे. 

एनडीआरएफच्या निकषानुसार ५६ कोटी ४१ लाख रुपये मदतीसाठी लागण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती निवारण कक्षातून मिळाली. जिल्ह्यातील शेतकरी संघटनांसह राजकीय व सामाजिक संघटनांनी शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याची मागणी केली.


इतर ताज्या घडामोडी
किसान रेल्वेने सांगलीतून हळद जाणार इतर...सांगली ः किसान रेल्वेतून शेतकऱ्यांसह, उद्योग आणि...
वऱ्हाडात पीएम किसानचे साडे तेरा कोटी...अकोला ः पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या मदतीस...
चिपळूणात साडेसात हजार शेतकऱ्यांना...रत्नागिरी ः परतीच्या पावसाने चिपळूण तालुक्यातील...
रिसोड बाजारात सोयाबीनची विक्रमी आवकवाशीम ः रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापूर जिल्ह्यात मदतीसाठी ३३५ कोटींची...सोलापूर : अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे जिल्ह्यातील...
अकोल्यात शेतकरी करणार दोन लाख क्विंटल...अकोला ः गेल्या काही हंगामापासून सोयाबीन...
संत गाडगेबाबा सूतगिरणी सुरू करावी ः...अमरावती : कापूस उत्पादकांना दिलासा देण्यासाठी...
पुणे जिल्ह्यातील सगळी धरणे तुडूंबपुणे ः चालू वर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये...
भंडाऱ्यात ७९ धान खरेदी केंद्रांना मंजुरीभंडारा ः केंद्र सरकारच्या किमान आधारभूत खरेदी...
सोलापूर जिल्ह्यात रास्त भाव दुकानांना...सोलापूर : ‘‘जिल्ह्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा...
खानदेशात ३१ हजार हेक्टरवर गव्हाची पेरणी...जळगाव ः खानदेशात यंदा गव्हाची पेरणी सुमारे दोन...
परभणी जिल्ह्यात सतरा हजार क्विंटल...परभणी : ‘‘यंदाच्या रब्बी हंगामातील पेरणीसाठी...
शेतकऱ्यांना सरकारकडून मदतीची प्रतीक्षातऱ्हाडी, जि. धुळे : वरुणराजाच्या लहरीपणामुळे पिके...
नाशिक जिल्ह्यात लिलाव बंदमुळे शेतकरी...नाशिक : मागील वर्षी हवामान बदल, अवकाळी पाऊस व...
‘कृषी स्वावलंबन योजनेसाठी ऑनलाइन अर्ज...परभणी : ‘‘बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आणि डॉ....
सोयाबीन बियाणे विक्रेत्यांविरुध्द ...अकोला ः यंदाच्या खरिपात सोयाबीन बियाणे उगवले...
शोषणाविरोधात एकवटले संत्रा उत्पादक अमरावती : व्यापाऱ्यांचा शोषणाविरोधात एल्गार...
कांदा साठा मर्यादा वाढविण्याची मागणी नाशिक: कांदा साठा मर्यादा घालून दिल्याने...
दुधाळ जनावरांच्या व्यवस्थापनाची सूत्रेगोठ्याच्या भोवतालच्या परिसरात दलदल आणि जास्त गवत...
पौष्टिक चाऱ्यासाठी बरसीम लागवड ठरते...द्विदल हिरव्या चाऱ्याची उपलब्धता हा...