टाळेबंदीमुळे अडकलेले नांदेडचे ३८ मजूर पुण्याहून रवाना

पुणे : ‘‘टाळेबंदीच्या काळात अडकलेल्या नांदेड जिल्ह्यातील ३८ मजूरांना सर्व प्रक्रिया पूर्ण करुन तीन वाहनांमधून शुक्रवारी (ता.८) पुण्यातून स्वगृही पाठविण्यात आले’’, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.
Nanded stuck due to lockout 38 laborers leave Pune
Nanded stuck due to lockout 38 laborers leave Pune

पुणे : ‘‘टाळेबंदीच्या काळात अडकलेल्या नांदेड जिल्ह्यातील ३८ मजूरांना सर्व प्रक्रिया पूर्ण करुन तीन वाहनांमधून शुक्रवारी (ता.८) पुण्यातून स्वगृही पाठविण्यात आले’’, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. 

मजुरांना पाठविण्यापूर्वी नवल किशोर राम व नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी समन्वय साधून याबाबत एकमेकांना परवानगी दिली. नांदेड जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आल्यानंतर या कामगारांची कोरोनाबाबत वैद्यकीय तपासणी करुन त्यांच्या वाहनांना जाण्यासाठी परवानगी देण्यात आली. ग्रामीण मुळशी तालुक्यामध्ये टाळेबंदी शिथिल केल्यामुळे उद्योगधंदे सुरु आहेत. हाताला मिळणारे काम खंडित होणार नाही, याची त्यांना कल्पना देण्यात आली. मात्र, हे मजूर थांबण्यासाठी तयार नसल्यामुळे, त्यांना रवाना करण्यात आले. 

प्रशासनाकडून योग्य ती दक्षता घेऊन सामाजिक अंतराची मर्यादा पाळून त्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली. या ३८ प्रवाशांना नांदेड जिल्ह्यात पाठविण्यासाठी कासार आंबोली ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, तलाठी पासलकर, मंडळ अधिकारी सुहास कांबळे यांनी नियोजन केले. मुळशी तालुक्याचे तहसीलदार अभय चव्हाण व पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी या तीनही वाहनांतील मजूरांना प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com