नांदेडमध्ये मनसेचे पीकविमा परताव्यासाठी धरणे

नांदेडमध्ये मनसेचे पीकविमा परताव्यासाठी धरणे
नांदेडमध्ये मनसेचे पीकविमा परताव्यासाठी धरणे

नांदेड ः जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरकसट पीकविमा परतावा मंजूर करण्यात यावा. पीककर्ज मंजूर करण्यात यावे, या मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मंगळवारी (ता. १०) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

गतवर्षीच्या खरीप हंगामात पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे पीकविमा योजनेत सहभागी शेतकऱ्यांना पीकविमा परतावा मंजूर करणे आवश्यक होते. परंतु अनेक तालुक्यांतील शेतकरी पीकविमा परताव्यापासून वंचित राहिले आहेत. यामुळे हे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सरसकट शेतकऱ्यांना पीकविमा तसेच पीककर्ज मंजूर करण्यात यावे, या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलेल्या धरणे आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष माॅन्टीसिंग जहागीरदार, रवीभाऊ राठोड, सुशील जोंधळे, प्रशांत ढांगे, माधव पावडे, चंद्रप्रकाश वारे आदींसह तालुकाध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com