Agriculture news in marathi, Nanded tops Marathwada in crop sowing registration | Page 2 ||| Agrowon

पीक पेरा नोंदणीत नांदेड मराठवाड्यात अव्वल

टीम अॅग्रोवन
बुधवार, 13 ऑक्टोबर 2021

नांदेड : ‘‘ई पीक पाहणी कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांनी खरिपातील पिकांचा पेरा ऑनलाइन नोंदला आहे. यात मराठवाड्यात नांदेड अव्वल ठरले आहे.

नांदेड : ‘‘ई पीक पाहणी कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांनी खरिपातील पिकांचा पेरा ऑनलाइन नोंदला आहे. यात मराठवाड्यात नांदेड अव्वल ठरले आहे. पेरा नोंदणीची मुदत दोन दिवसात संपत आहे. त्यामुळे शिल्लक शेतकऱ्यांनी लवकर नोंदणी करावी’’, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांनी केले.

राज्य सरकारने यावर्षी ई-पीक पाहणी अ‌ॅप सुरु करून पीक पेरा नोंदणीचा कार्यक्रम शेतकरी स्तरावर राबविण्याचा निर्णय घेतला. महसूल विभाग आणि कृषी विभागाच्या वतीने ई-पीक पाहणी हा संयुक्त प्रकल्प राबवण्यात येत आहे. या पीक पाहणीची सुरवात १५ ऑगस्टला झाली.

या काळात अतिवृष्टी, पूरस्थितीमुळे नोंदणीच्या कामाला गती आली नाही. त्यामुळे प्रारंभी ३० सप्टेंबरपर्यंत, तर यानंतर १४ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. 

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत १९ लाख ६२ हजार ६४ पेरा नोंदणी झाली आहे. नांदेड जिल्ह्यात आजपर्यंत तीन लाख ५२ हजार ६९१ नोंदी झाल्या आहेत. या नोंदणी मराठवाड्यात सर्वाधिक आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर लातूर व तिसऱ्या स्थानी उस्मानाबाद जिल्हा आहे. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरा नोंदणीला प्रतिसाद दिल्याबद्दल डॉ. विपिन यांनी समाधान व्यक्त केले. उर्वरित शेतकऱ्यांनी दोन दिवसात नोंदणी करावी, असे आवाहन 
त्यांनी केले. 

मराठवाड्यातील नोंदी

नांदेड - ३,५२,६९१, लातूर - ३,०३,०७०, उस्मानाबाद - २,५६,०३८, जालना - २,४०,६१२, बीड - २,३५,०८२, औरंगाबाद - २,१६,७७८, हिंगोली - १,८७,१६३, परभणी - १,४०,६३०.  


इतर ताज्या घडामोडी
युवकांनी ग्रामीण विकासाचे शिलेदार... नाशिक : ‘‘आधुनिक काळातील युवकांनी उच्च...
पदोन्नतीतील कृषिसहसंचालकात सोलापूरच्या...सोलापूर ः राज्याच्या कृषी विभागाने वर्ग एकमधील...
‘पांडुरंग’चे भालेकर यांना सर्वोत्कृष्ट ...सोलापूर ः मांजरीच्या वसंतदादा शुगर...
नाशिक : डांगसौंदाणे येथे उपबाजार आवार...नाशिक : सटाणा बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील...
पाइप कालव्याद्वारे ६० टक्के पाणी बचत...मालेगाव, जि. नाशिक : दहिकुटे लघू पाटबंधारे...
जळगाव ः भरडधान्य खरेदी खानदेशात रखडतच जळगाव ः  खानदेशात भरडधान्य खरेदी मागील २०...
नांदेडमध्ये खरेदीदारांविरोधात अडत्यांचा...नांदेड : हळद खरेदीदार अडत्यांना दोन...
रब्बीसाठी खानदेशात आवर्तन सुटले गिरणा,...जळगाव ः  खानदेशात विविध प्रकल्पांमधून मागील...
उसाच्या थकीत रकमेसाठी शेतकऱ्यांचा...चोपडा, जि.जळगाव : चोपडा शेतकरी सहकारी साखर...
परभणी जिल्ह्यात ‘पोकरा’अंतर्गत योजनांचा...परभणी ः जिल्ह्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
कोल्हापूर बाजार समितीत शिवसेनेतर्फे...कोल्हापूर : ‘‘शेतकऱ्यांना बंदुकीची भाषा...
पीकविमा न मिळाल्यास अन्नत्याग आंदोलनऔरंगाबाद: ‘‘आमचा फळपीक विमा  व इतर पिकांचा...
रयत क्रांतीचा बडोदा बँकेवर आक्रोश मोर्चानांदेड : बँक ऑफ बडोदा शाखेकडून मुखेड तालुक्यातील...
सांगली जिल्हा बँकेच्या थकबाकी वसुलीसाठी...सांगली : जिल्हा बँकेची थकबाकी सुमारे ६५० कोटीहून...
मकर संक्रांतीसाठी सांगलीत गुळाची आवक...सांगली : संक्रांतीनिमित्त सांगली बाजार समितीत...
पुणे जिल्हा बँकेवर राष्ट्रवादीचे वर्चस्वपुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या...
शेतकऱ्यांनाही थंडी जाणवते भाऊ!जलालखेडा, जि. नागपूर ः नरखेड तालुक्यात रब्बी...
‘मँगोनेट’ अंतर्गत सात वर्षांत ४, ५६६... रत्नागिरी : हापूसची परदेशात निर्यात होऊन येथील...
‘जलजीवन मिशन’च्या कामात सातारा अग्रेसरसातारा : जलजीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यात २३७...
नाशिकमधील उन्हाळ कांद्याचा साठा अखेरीकडेनाशिक : फेब्रुवारी २०२१पासून उन्हाळ कांद्याची...