agriculture news in marathi Nandurbar Chille crop gets damage due to heavy Rain | Page 2 ||| Agrowon

नंदुरबारच्या मिरचीला अतिपावसाचा फटका; काढणी सुरू, दर टिकून

टीम अॅग्रोवन
बुधवार, 30 सप्टेंबर 2020

नंदुरबार : जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या मिरची पिकाला अतिपावसाचा फटका बसला आहे. काढणी सुरू झाली असून उत्पादनावर परिणाम दिसत असल्याने दर टिकून आहेत. सध्या जागेवरच २५ ते ३० रुपये प्रतिकिलोचे दर मिळत आहेत. 

नंदुरबार : जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या मिरची पिकाला अतिपावसाचा फटका बसला आहे. काढणी सुरू झाली असून उत्पादनावर परिणाम दिसत असल्याने दर टिकून आहेत. सध्या जागेवरच २५ ते ३० रुपये प्रतिकिलोचे दर मिळत आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये किमान पाच व कमाल १२ रुपये प्रतिकिलोचे दर मिळाले होते.

यंदा उत्पादनावर निसर्गाच्या लहरीपणाच परिणाम झाला आहे. कारण जून, जुलैमध्ये पावसाने ताण दिला. जूनमध्ये १२ ते १३ दिवस प्रचंड ऊन पडत होते. जुलैमध्येदेखील १३ ते १५ दिवस ऊन पडले. यामुळे पिकाची हवी तशी वाढ झाली नाही. मग ऑगस्टमध्ये सतत पाऊस सुरू होता. सप्टेंबरमध्ये सुमारे २९ दिवस सतत पाऊस झाला. जोरदार व अतिजोरदार पाऊस झाला. प्रतिकूल व अस्थिर वातावरणामुळे मिरची पिकाला फटका बसला. यामुळे काढणीचा हंगाम लांबणीवर पडला आहे. फुले गळून पडली. सप्टेंबरमध्येच काढणीला वेग येतो. पण सध्या पीक व्यवस्थित नसल्याने काढणी रखडत सुरू आहे.

अतिपावसाने पीक पिवळे पडले आहे. वाढ खुंटली आहे. अनेक रोपांमध्ये आकस्मिक मर रोगाची समस्या दिसली आहे. जिल्ह्यात नंदुरबार तालुका मिरची लागवडीत आघाडीवर आहे. तालुक्यातील कोठली, चौपाळे, पळाशी, धमडाई भागाला मोठा फटका अतिपावसामुळे बसला आहे. गेल्या वर्षी एक-दोन दिवसाआड एक एकरात १० ते १२ क्विंटल हिरवी मिरचीची काढणी ऑक्टोबरमध्ये केली जात होती. परंतु यंदा एक एकरात दोन दिवसाआड पाच ते सहा क्विंटल मिरचीच काढणीला उपलब्ध होत आहे. उत्पादन कमी येत आहे. नंदुरबार तालुक्यातील कोळदे, शिंदे, नाशिंदे, लहान शहादे, बामडोद, भागातही मिरची पिकाची स्थिती बिकट आहे.

बाजार समितीत आवकही नगण्य
गेल्या वर्षी मिरचीला जागेवरच प्रतिकिलो पाच ते १२ रुपये प्रतिकिलोचे दर मिळत होते. यंदा जागेवरच २० ते ३० रुपये प्रतिकिलोचे दर मिळत आहे. दर्जेदार मिरचीला चांगले दर आहेत. जागेवरच अधिक खरेदी सुरू असल्याने नंदुरबार बाजार समितीमधील आवकही कमी झाली आहे. बाजार समितीत नगण्य आवक सध्या सुरू आहे. प्रतिदिन ५० ते ६० क्विंटल मिरचीची आवक गेल्या पंधरवड्यात झाली आहे.

या पावसाळ्यात वातावरण सतत अस्थिर राहीले. सुरवातीला पावसाचा मोठा खंड प्रत्येक महिन्यात होता. मग अतिपाऊस झाला. यामुळे पिकात मर रोग आला. पिकाची वाढ खुंटली असून, काढणी हवी तशी नाही.
- सागर पाटील, शेतकरी, कोठली (जि.नंदुरबार) 


इतर अॅग्रो विशेष
जोरदार पावसाचा अंदाज पुणे ः राज्यात पुढील पाच ते सहा दिवस काही ठिकाणी...
राज्यांचा निर्धार नि केंद्राची माघार‘जीएसटी’ अंतर्गत राज्यांना द्यावयाच्या...
भुकेला भारतजागतिक भूक निर्देशांक-२०२० नुकताच प्रसिद्ध झाला...
बिजोत्पादनातून ‘गौरीनंदन’ची उलाढाल...नगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर (ता. नेवासा) येथील...
पाऊस ओसरला; शेतीकामांत अडथळे पुणे ः गेल्या दोन दिवसांत पावसाने काहीशी...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद २...कोल्हापूर: ‘स्वाभिमानी’ची यंदाची व १९ वी ऊस परिषद...
ओला दुष्काळ जाहीर करुन तातडीने मदत द्या...मुंबई: परतीच्या पावसाने मराठवाडा आणि पश्चिम...
बढत्या देताना गैरव्यवहाराकडे दुर्लक्ष पुणे: राज्याच्या कृषी खात्यातील अधिकाऱ्यांना...
उन्हाळ कांद्याची आवक घटली; दरात सुधारणा नाशिक: उन्हाळ कांद्याच्या मागील वर्षी मोठ्या...
`विकेल ते पिकेल’ संकल्पनेत भरिताची...जळगाव ः ‘विकेल ते पिकेल’ संकल्पनेत जिल्ह्यात...
‘जॉईंट ॲग्रेस्को’ ऑनलाइन होणार अकोला ः खरीप हंगामापूर्वी होणारी राज्यातील चार...
किसान रेल्वेने शेतमाल वाहतुकीवर ५०...नागपूर ः किसान रेल्वेच्या माध्यमातून...
मुख्यमंत्री ठाकरे, शरद पवार ...मुंबई: राज्यातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा...
जोरदार पावसाची शक्यता पुणे ः कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात...
पूरक व्यवसायातून स्वयंपूर्णतेचा धडादुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन आणि परसबागेतील...
डोळ्यातल्या पाण्याचे मोलऑ क्टोबरचा दुसरा पंधरवाडा चालू आहे. मूग, उडीद,...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात हजारो हेक्टर...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीचा...
मराठवाड्यातील पाऊस ओसरला, नुकसानीचे...औरंगाबाद  ः मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत...
पिकांच्या नुकसानीचे पंचनामे गतीने करा ः...मुंबई: अतिवृष्टी, वादळी पावसामुळे पिकांचे नुकसान...
हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी जिल्हानिहाय...परभणी ः राज्यात हंगाम सन २०२०-२१ मध्ये किंमत...