Agriculture news in marathi; In Nandurbar district, the crop is harvested | Agrowon

नंदुरबार जिल्ह्यात पीक काढणी वेगात

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

नंदुरबार  : जिल्ह्यात खरिपाच्या हंगामातील पीक काढणीला वेग आला आहे. मध्यंतरी पावसामुळे शेतकऱ्यांची कामे ठप्प झाली होती. मात्र आता कोरडे वातावरण असल्याने खरिपाच्या पीक काढणीत शेतकरी व्यस्त दिसून येत आहे. शेतीकामे जोमात सुरू झाल्याने नंदुरबार व लगतच्या भागातील आदिवासी बांधवांचे स्थलांतर कमी झाल्याची स्थिती आहे. 

नंदुरबार  : जिल्ह्यात खरिपाच्या हंगामातील पीक काढणीला वेग आला आहे. मध्यंतरी पावसामुळे शेतकऱ्यांची कामे ठप्प झाली होती. मात्र आता कोरडे वातावरण असल्याने खरिपाच्या पीक काढणीत शेतकरी व्यस्त दिसून येत आहे. शेतीकामे जोमात सुरू झाल्याने नंदुरबार व लगतच्या भागातील आदिवासी बांधवांचे स्थलांतर कमी झाल्याची स्थिती आहे. 

नंदुरबार तालुक्‍यातील पूर्व पट्ट्यातील रजाळे, शनिमांडळ, बलवंड, सैताणे, खर्दे खुर्द, तलवाडे, वैदाणे या परिसरातील शेतकऱ्यांचे मुख्य पीक कापूस, बाजरी, ज्वारी, मिरची, मका व कांदा असून सध्या खरिपाच्या बाजरी पिकाची काढणी सुरू असून, थ्रेशर मशिनच्या साह्याने बाजरी काढणीला वेग आला आहे. या वर्षी मध्यंतरी वरुण राजाने मेहेरबान केली असून, बाजरीच्या उत्पन्नात वाढ होईल, अशी अपेक्षा आहे. 

तसेच मे महिन्यात लागवड करण्यात आलेला कापसाची पावसाअभावी वाढ खुंटली होती. त्यातच परतीचा पाऊस ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात सुरूच राहिल्याने मे महिन्यात लागवडीच्या कापूस पिकाच्या उत्पादनात मोठी घट होणार आहे. मात्र कोरडवाहू कापसाची लागवड करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे चांगलाच फायदा झाला आहे. उत्पन्नात वाढ होणार आहे. ऐन दिवाळीचा सण जवळ आला असून, शेतकऱ्याचे खरिपातील सर्वच कामे खोळंबले आहेत. मजूर विभागामार्फत करून घेत आहेत. सर्वच शेतकऱ्यांची कामे एकाच वेळी आल्याने मजूर वर्ग देखील मिळेना झाले आहे. काही बडे शेतकरी वासदरे, चाकळे, भोणे येथून आपल्या वाहनातून मजूर वर्ग आणत असून, आपली कामे आटोपण्यात व्यस्त आहे. 

मजुरांचे स्थलांतर कमी
शेतमजुरीवर अवलंबून असलेले अनेक कुटुंबे दसरा झाल्यानंतर लगतच्या गुजरात राज्यात अथवा औरंगाबाद, नगरकडे ऊसतोडणी कामासाठी कारखान्यावर ठेकेदारांमार्फत जात असत. मात्र या वर्षी पाऊस जोरदार झाला. त्यातून शेतकऱ्यांची पिकेही जोमात आहेत. शेतकऱ्यांनांही दिलासा मिळाला आहे. शेती कामे सुरू झाल्याने मजुरांना स्थानिक स्तरावर चांगला रोजगार उपलब्ध होत आहे. रोख रक्कमसह ज्वारी, बाजरी आदी धान्यही शेतकऱ्यांकडून मजुरांना दिले जाते. रोजगाराअभावी स्थलांतर करणाऱ्या अनेक कुटुंबीयांनी स्थलांतर न करता गावातच थांबण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे स्थलांतराचे प्रमाण घटणार आहे.


इतर ताज्या घडामोडी
माजी मंत्री अनिल राठोड यांचे निधननगर, : नगर शहराचे माजी आमदार, तत्कालीन युती...
माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील...लातूर : काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री...
परभणी जिल्ह्यात तीन लाख ७२ हजार हेक्टर...परभणी : ‘‘पंतप्रधान पिकविमा योजनेअंतर्गंत...
लातूर विभागात विम्याचे २१ लाख हेक्टर...उस्मानाबाद : लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी,...
'रासाका' लवकर सुरू करा, शेतकऱ्यांची...नाशिक  : गेल्या काही दिवसांपासून निफाड...
खानदेशात कांदा रोपवाटिकांची स्थिती बिकट...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांची स्थिती बिकट...
यावल, रावेरमध्ये मका पिकावर लष्करी अळी...जळगाव : यावल तालुक्यातील किनगाव, डांभुर्णी,...
नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याच्या तुरळक...नाशिक : जिल्ह्यात खरीप हंगामातील कांदा लागवडीचा...
सोलापूर जिल्ह्यात सोयाबीनच्या निकृष्ट...सोलापूर : जिल्ह्यात सोयाबीनच्या निकृष्ठ...
अकोले तालुक्‍यात भात लागवडी रखडल्यानगर : जिल्ह्यातील अकोले तालुक्‍याच्या उत्तर...
गोंदियाची पीक कर्ज वाटपात आघाडीगोंदिया : पीक कर्ज वाटपात जिल्ह्याने आघाडी घेत...
जुन्नर, नारायणगावात टोमॅटोचे दर टिकूनपुणे ः जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
प्रतिबंधित कीटकनाशकांची विक्री करू नकाअकोला ः पिकांवर कीटकनाशक फवारणी करताना होणाऱ्या...
माळशिरस, करमाळ्यात मक्याची ३० हजार...सोलापूर  ः अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती...
रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊसरत्नागिरी : जिल्ह्यात वेगवान वाऱ्यासह पडणाऱ्या...
चंद्रपूर कृषी विभाग देणार रानभाज्यांची...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर ः अळू, काटवल, सूरण, टरोटा...
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाला सुरुवातकोल्हापूर : जिल्ह्यात सोमवारी सायंकाळपासून...
असे होते ग्लायफोसेट तणनाशकाचे निसर्गात...केंद्र सरकारकडून नुकताच मसुदा आदेश प्रसिध्द...
जळगावात गवार २००० ते ४२०० रुपये...जळगाव  ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
मराठवाड्यात पावसाच्या अंदाजानुसार ऑगस्ट...एकंदरीत या वर्षी मराठवाड्यात बहुतांश भागात...