नंदुरबार जिल्ह्यात मिरची लागवडीत होणार घट

नंदुरबार जिल्ह्यात मिरची लागवडीत होणार घट
नंदुरबार जिल्ह्यात मिरची लागवडीत होणार घट

नंदुरबार : देशात ओल्या लाल मिरचीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात या हंगामात मिरचीची लागवड सुमारे ३०० ते ४०० हेक्‍टरने घटण्याची शक्‍यता आहे. मिरची उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या गावांमध्ये टंचाई वाढतच गेल्याने मिरची पिकाला फटका बसणार असल्याचे सांगितले जात आहे.  नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार, शहादा व तळोदामधील काही गावांमध्ये लागवड केली जाते. जिल्ह्यात मागील हंगामात सुमारे २८०० हेक्‍टरवर मिरची लागवड झाली होती. या हंगामात हे क्षेत्र सुमारे ३०० ते ४०० हेक्‍टरने घटू शकते. लागवडीसाठी नंदुरबार तालुक्‍यातील गावे धमडाई, पथराई, पळाशी, कोळदा, शिंदे, लहान शहादे, कोठली, पाचोराबारी आदी गावांमध्ये मिरची लागवड अधिक असते. याच गावांमध्ये या हंगामात टंचाई आहे. टंचाईमुळे २०१८-१९ चा मिरची हंगाम जानेवारीतच संपला. शिवार उजाड झाले. अनेकांना मिरची पीक सोडून द्यावे लागले होते. या हंगामात सिंचनासाठी पुरेसे पाणी नसल्याने जूनपासून लागवड शक्‍य नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.  तळोदा तालुक्‍यातील बोरद, प्रतापपूर, आमलाड भागांत लागवड स्थिर राहील. तर शहादामधील औरंगपूर व परिसरातही लागवड फारशी कमी होणार नाही, असे सांगण्यात आले.  मिरचीचे क्षेत्र मात्र गुजरातमधील तापी जिल्ह्यातील निझर तालुक्‍यातील तापीकाठावरील गावांमध्ये बऱ्यापैकी राहील. त्यात निझर तालुक्‍यातील पिंपळोद, अंतुर्ली, वाका, वेलदा, सदगव्हाण आदी गावांमध्ये लागवड बऱ्यापैकी होईल, अशी माहिती मिळाली. 

मिरची लागवड पाणीटंचाईमुळे कमी होऊ शकते. शेतकरी तयारी करीत आहेत. कमी पाणी असल्याने लागवड कमी करण्याची वेळ अनेक शेतकऱ्यांवर येईल, असे चित्र तूर्ततरी दिसत आहे.  - आर. एम. पाटील, विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, कोळदा (जि. नंदुरबार)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com